You are currently viewing राहू राशी परिवर्तन २०२२ मीन राशी / मीन लग्न

राहू राशी परिवर्तन २०२२ मीन राशी / मीन लग्न- RAHU/KETU TRANSIT FOR MEEN RASHI / MEEN LAGNA

राहू/केतू परिवर्तन २०२२

वरील लिंक मध्ये ज्या प्रमाणे महत्वाचे पॉईंट राहू केतूच्या बदलाचे दिले आहेत त्याच प्रमाणे फक्त आता इथे मीन राशी आणि मीन लग्न ह्यावर राहू केतू च्या भ्रमणाचा (भासमानाचा) विचार करू.

राहू राशी परिवर्तन २०२२ मीन राशी / मीन लग्न
राहू राशी परिवर्तन २०२२ मीन राशी / मीन लग्न

मीन राशी आणि मीन लग्न म्हणजे आपली राशी जरी मीन नसली पण लग्न मीन असेल तर किंवा आपले लग्न मीन नसले पण राशी मीन असली तरी खाली दिलेले विवेचन हे आपल्या साठी असेल.

मीन राशी अणि मीन लग्नाच्या पत्रिकेत राहु पराक्रम/तृतीय स्थानी १८ महिने मेष राशीत असेल आणि केतू भाग्य/नवम स्थानी मीन राशीत असेल पराक्रम आणि भाग्य स्थानातील जी जी फळे आहेत ती ती फळे ह्या जातकांना मिळतील त्यांच्या प्रत्येक सुरु असलेल्या क्षेत्राशी निगडित व्यवहार आणि आचारविचार असतील.

विद्यार्थ्यांना — राहू द्वितीय (धन / कुटुंब) स्थानातून भ्रमण करत असताना विद्यार्थ्यांना १८ महिन्यात आपल्या शिक्षण व्यवस्थेसाठी बरच पैसा खर्च करावा लागेल असे दिसते. कुटुंब स्थानातील एखादी समस्या विद्यार्थ्यांना सामोरे जाऊन शिक्षण पूर्ण करावे लागेल पण ते होण्यासारखे असेल कारण मीन राशीत गुरु वर्षभर असणार आहे.

करिअर क्षेत्रातील वयातील जातकांना द्वितीय (धन / कुटुंब) स्थानातील राहू उत्तम फार खर्चिक ठेवेल. बराच साठवलेला पैसा हा इथे खर्च होऊ शकेल कुटुंबासाठी मोठे खर्च कराल. करिअर मध्ये हा राहू धन सुद्धा देत आहे.

राहू केतू नक्षत्रीय फळ

  • १२/४/२०२२ ते १५/६/२०२२ पर्यंत राहू मेष राशीतल्या कृतिका नक्षत्राचे फळ देणार आहे. तेव्हा इथे ह्या कालावधीत आपणास खर्च बरेच होतील. ह्या कालावधीत मोठी गुंतवणूक कराल. कर्ज घ्याल. एखाद्या आधीपासूनच्या आजारांवर खर्च इथेच होईल. मात्र पैसा मिळेल. नोकरी व्यववसायासाठी उत्तम.
  • १५/६/२०२२ ते २१/२/२०२३ पर्यंत राहू मेष राशीतल्या भरणी नक्षत्रात असेल आणि त्याचे फळ हे मीन राशी किंवा मीन लग्नाच्या व्यक्तींना पुढील प्रमाणे मिळेल. ह्या कालावधीत आपणास मृत्यूतूल्य कष्ट दिसतील. जर आधीपासून काही आजार असेल त्यास दुर्लक्ष करू नये. वाहन हळू चालवावे. प्रथमातील गुरु रक्षण करेल. करिअर मध्ये बराच पराक्रम करण्याच्या संधी दिसतील. वारस हक्काकडून पैसा मिळेल.
  • २१/२/२०२३ ते ३०/१०/२०२३ पर्यंत राहू मेष राशीतल्या अश्विनी नक्षत्रात असेल आणि त्याचे फळ हे मीन राशी किंवा मीन लग्नाच्या व्यक्तींना पुढील प्रमाणे असेल. कुटुंबा पासून लांब जाण्यास हा कालावधी उत्तम असेल. घरातील एखाद्या वाद विवादासाठी हिस्सा घ्याल. नवीन काही नोकर व्यववसायासाठी इथे निर्णय घ्यावा लागेल. किंवा बदली होण्याचे प्रकार दिसतील.
  • केतू तूळ राशीत १२/४/२०२२ पासून ते १८/१०/२०२२ पर्यंत विशाखा नक्षत्राचे फळ देणार आहे. जर आधीपासून कोणते ऑपेरेशन होण्याचे थांबले असले तर ते इथे होऊ शकेल. अपघातापासून सावधान. अचानक पैसा येण्याचे संभव नाकारता येत नाहीत.
  • केतू तूळ राशीत १८/१०/२०२२ पासून ते २६/६/२०२३ पर्यंत स्वाती नक्षत्राचे फळ देणार आहे. इथे मीन राशी लग्नाच्या व्यक्ती पैशाचे मोठे व्यववहार कराल. ह्यात कुणाला उधार उसने देऊ नये. पुन्हा मिळणार नाहीत. व्यवहार लिखित करावेत. नोकरी व्यववष्यात असणाऱ्याना हा काळ उत्तम आहे. पण कामे भरपूर करावी लागतील.
  • केतू तूळ राशीत २६/६/२०२३ ते ३०/१०/२०२३ पर्यंत चित्रा नक्षत्राचे फळ देणार आहे. इथे मीन राशी किंवा लग्न वाल्याना कुटुंबातील एका व्यक्तीसाठी धावपळ करावी लागेल. त्यासाठी पैसा खर्च होईल. पहिल्या स्थानातील गुरु असल्यामुळे काळजी करू नये.

उपाय – मीन लग्न आणि राशीच्या व्यक्तींनी राहू बदलासाठी उपाय म्हणून रोज केसर आणि सरस्वती वंदना म्हणावी त्याबरोबर रोज हनुमान चालीसा आपले रक्षण करेल.

धन्यवाद…..!

Leave a Reply