You are currently viewing गुरु राशी परिवर्तन २०२१ : मिथुन राशी/मिथुन लग्न

गुरु राशी परिवर्तन २०२१ मिथुन राशी/मिथुन लग्न- गुरु २० नोव्हेंबर २०२१ ला कुंभ राशीत जात आहे १३ एप्रिल २०२२ पर्यंत गुरु कुंभ राशीत असेल. त्यावरील त्याचे नक्षत्रीय भ्रमण आणि इतर विवेचन वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://shreedattagurujyotish.com/guru-rashi-parivartan-2021-jupiter-transit-in-kumbh-rashi-in-marathi/

गुरु राशी परिवर्तन २०२१ मिथुन राशीमिथुन लग्न

वरील कुंडली हि मिथुन राशीची चंद्र कुंडली आहे आणि मिथुन राशीची लग्न कुंडली आहे.

आपली चंद्र कुंडली मिथुन राशी किंवा लग्न कुंडली मिथुन असेल (मग राशी किंवा लग्न वेगवेगळे असले तरी) खाली दिलेले सर्व काही आपल्यासाठी आहे.

मिथुन राशी/लग्नाच्या कुंडलीत गुरु हा नवम / भाग्य स्थानात येत आहे. हे स्थान आपल्या भाग्याचे आहे.. गुरु १४४ दिवस ह्या स्थानातून भ्रमण करेल तेव्हा तो वक्री होणार नाही ह्याच राशीत संपूर्ण मार्गी असेल. तेव्हा जर आपल्या पत्रिकेत जन्मतः गुरु ची स्थिती उत्तम असेल तो वक्री नसेल तो ० ते ५ किंवा २७ ते २९.५९ डिग्री पर्यंत नसेल. गुरुवर कोणत्याही पापग्रहांची दृष्टी नसेल. आणि दशा महादशा उत्तम असेल तर ह्या कुंभ राशीतील गुरु आपल्या ह्या भाग्य स्थानी चांगले फळ देईल.

वरील कुंडलीत जिथे ९ नंबरच्या धनु राशीला आणि १२ नंबर च्या मीन राशीला सर्कल केला आहे त्या गुरु च्या दोन राशी आहेत.
धनु राशी हि आपल्या पत्रिकेत सप्तम स्थानी येते जेव्हा ह्या स्थानाचा स्वामी भाग्य स्थानी जातो आहे तेव्हा आपल्या जोडीदाराकडून आपल्याला विशेष काहीतरी सहकार्य मिळेल. कुणाचे मंगल कार्य ह्या आधी बरीच वर्षे अडकले असेल तर आता उत्तम दिवस आहेत. ह्या १४४ दिवसात हा विषय मार्गी लावावा. जे जे मिथुन राशी/ लग्नाचे व्यापारी आहेत त्यांना काही बदल करून चांगले अनुभव येतील. नवीन संधी व्यापारात मिळेल. पार्टनर चांगले परिणाम देतील. आपल्या स्किल चा उपयोग करून चांगले रिझल्ट आणू शकाल.

गुरु ची १२ नंबर ची मीन राशी कर्म स्थानी येत आहे म्हणून कर्म स्थानाचा मालक मागील स्थानी भाग्यात भ्रमण करणार असल्यामुळे आपल्या करिअर मधील बदल ह्या समयी असतील. पण ते आधी थोडे त्रासाचे होऊ शकतील.

हेही वाचा : गुरु राशी परिवर्तन २०२१ : वृषभ राशी/वृषभ लग्न

गुरु ची ७ वी दृष्टी

गुरु ची ७ वी दृष्टी हि ५ नंबर च्या सिंह राशीवर येत आहे (जिथे बाण आहे) ते स्थान आपले हे स्थान हे भावंडे, शेजारी पाजारी, आपला पराक्रम, कम्युनिकेशन , धावपळ ह्या विषयीचे आहे. जर आपण ऑनलाईन काही व्यवसाय करीत असाल तर खूप उत्तम परिणाम दिसतील, पराक्रम चांगला दिसेल. इथे आपला बऱ्याच जणांशी संपर्क होईल आणि आपण प्रसिद्धीच्या झोतात असू शकता. लहान भावंडांची प्रगती दिसेल, वरील सर्व विषयी इथे चांगले परिणाम दिसतील.

गुरु ची ५ वी दृष्टी

गुरु ची ५ वी दृष्टी हि जिथे ३ नंबर मिथुन राशी आहे त्यावर येत आहे. जिथे बाण आहे हे स्थान हे स्थान आपल्या व्यक्तिमत्वाचे चे आहे. ह्या १४४ दिवसात आपले व्यक्तिमत्व खुलून दिसेल. स्वतःसाठी पॉसिटीव्ह धावपळ कराल. गुरु ची हि दृष्टी कोणत्याही संकटापासून आपले रक्षण करेल.

गुरु ची ९ वी दृष्टी

गुरु ची ९ वी दृष्टी जिथे ७ नंबर ची तुला राशी आहे जिथे बाण आहे तेथे येत आहे. हे स्थान आपल्या संतान सुखाचे आहे आपल्या ज्ञानाचे आहे. ह्या स्थानावर गुरु ची भाग्यातून दृष्टी म्हणजे विद्यार्थ्यांसाठी उत्तम आहे ह्या १४४ दिवसात त्याचे चांगले परिणाम दिसतील. ह्यांना संतान संबंधित काही इशू असतील त्यांची ह्या काळात जास्त प्रयत्न करून हा विषय मार्गी लावावा असा सल्ला देण्यात येतो. आपले स्वतःचे स्किल ह्या काळात डेव्हलोप करण्याची हि संधी उत्तम आहे.

काळजीचे काही मुद्दे

मिथुन लग्न आणि मिथुन राशीच्या कुंडली चार्ट मध्ये जिथे क्रॉस केला आहे त्या स्थानातील काळजी किंवा सावधानता आपल्याला बाळगावी लागेल.
गुरु पासून चे ८ वे घर हे ६ नंबर चे असेल हे स्थान आपल्या प्रॉपर्टीज मातृसुखाचे आणि स्वतःच्या सुखाचे आहे. ह्यात आपली थोडी धावपळ आणि काळजी दिसते. मोठे निर्णय नको.

जिथे १० नंबर मकर राशी आहे ते गुरु पासून चे मागील स्थान आपल्या अष्टम स्थानी येत आहे. परिवाराच्या संपत्ती चे वाद विवाद इथे होऊ शकतील त्यातून काही मिळते असे दिसत नाही. उलट त्रास होतील.

जिथे ४ नंबर लिहिले आहे ते स्थान आपल्या धनाचे आणि कुटुंबाचे आहे. त्यामुळे कौटुंबिक समस्या आणि पैसा ह्याबद्दल थोडी चिंता असेल. आईच्या तब्येतीकडे विशेष लक्ष देणे.

गुरु चे नक्षत्रीय भ्रमण

गुरु चे धनिष्ठा नक्षत्रातून भ्रमण

२१ नोव्हेंबर २०२१ ते २ जानेवारी २०२२ पर्यंत गुरु मंगळाच्या धनिष्ठा नक्षत्रातून भ्रमण करेल. हे भ्रमण मिथुन राशीसाठी उत्तम आहे कारण मंगळाची दोन स्थान ६/११ ऍक्टिव्हेट होणार आहेत त्याने आपल्या सर्व सर्व्हिसेस मध्ये आपण चांगली प्रगती करून लाभ घेऊ शकाल.ह्या काळात पैसा मिळेल.

मंगळ ५ डिसेंबर पर्यंत तुला राशीत असेल आणि गुरु तेथून मंगळावर आपली ९वी दृष्टी टाकत आहे. संतान संबंधित काही निर्णय उत्तम घेऊ शकाल. विद्यार्थाना उत्तम संधी येतील.

५ डिसेंबर २०२१ पासून २०२१ पासून मंगळ १७ जानेवारी पर्यंत हाच मंगळ वृश्चिक राशीत आपल्या सहाव्या स्थानी जात आहे म्हणून गुरु ६ व्या स्थानाचे फळ जास्त देईल आणि लाभ स्थानाचे फळ सुद्धा. इथे जॉब संबंधित निर्णय मार्गी लागतील. जॉब चे प्रश्न सुटून त्यात लाभ होतील. काही पहिल्यापासून चे आजारपण कुणाला असेल तर त्यात आपण चांगली ट्रीटमेंट करू शकाल त्यात लाभ होताना दिसत आहेत.

गुरु चे शततारका नक्षत्रातून भ्रमण

गुरु २ जानेवारी २०२२ ते २ मार्च २०२२ पर्यंत शततारका नक्षत्रातून भ्रमण करेल तेव्हा तो राहू च्या नक्षत्रातून भ्रमण करीत असल्यामुळे राहूचे फळ देण्यास सुरुवात करेल. मिथुन राशीच्या लग्न आणि राशी कुंडलीत सध्या राहू हा बाराव्या स्थानावरून भ्रमण करत असेल वरील कालावधीत आपल्याला परदेश गमन साठी हा काळ उत्तम असेल. जन्मस्थानातील वास्तव्यास असलेल्या व्यक्तींना काही प्रमाणात त्रास होताना दिसत आहे. जर आपण जन्मस्थापासून दूर असाल तर हा काळ उत्तम असेल. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्यासाठी खर्च होण्याचा हा पिरियड असेल.

गुरु चे पूर्वाभाद्रपदा नक्षत्रातून भ्रमण

२ मार्च २०२२ ते १३ एप्रिल २०२२ पर्यंत गुरु चे पूर्वभाद्रपदा नक्षत्रातून भ्रमण असेल. पूर्वभाद्रपदा हे गुरुचेच नक्षत्र असल्यामुळे हा काळ आपणासाठी सर्वात उत्तम असेल. ह्या काळात आपल्याला नशिबाची उत्तम साथ लाभेल वरील सर्व विषय इथे आपल्याला चांगले परिणाम देतील. गुरु च्या भ्रमणातील सर्वात उत्तम काळ हा असेल.

धन्यवाद…..!

Leave a Reply