You are currently viewing शनी चे कुंभ राशीतून भ्रमण २०२३

शनी चे कुंभ राशीतून भ्रमण २०२३ | SHANI TRANSIT IN AQUARIUS 2023

३ राशींना साडेसाती २ राशींना अडीचकी

दिनांक १७/१/२०२३ पासून शनी कुंभ राशीत जात आहे. शनी एका राशीत साधारण २.५ वर्षे असतो त्या प्रमाणे जेव्हा आपल्या मागील राशीत शनी येतो तेव्हा तुम्हाला साडेसाती सुरु होते. जर तुमची राशी मीन आहे आणि १७ जानेवारी २०२३ ला जेव्हा शनी कुंभ राशीत येईल तेव्हा मीन राशीला साडेसाती सुरु होईल.

आपल्या राशीत जेव्हा शनी येतो तेव्हा शनी चा 2nd पार्ट सुरु असतो आणि जेव्हा तो आपल्या राशीच्या पुढील राशीत जातो तेव्हा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरु असतो. ( SATURN TRANSIT)

धनु राशी ची आता पर्यंत साडेसाती अशी होती

  • २/११/२०१४ ते २६/१/२०१७ –1st पार्ट (शनी वृश्चिक राशीत)
  • २६/१/२०१७ ते २४/१/२०२० – 2nd पार्ट (शनी धनु राशीत)
  • २४/१/२०२० ते १७/१/२०२३ 3rd पार्ट ( शनी मकर राशीत) —– साडेसाती संपली

मकर राशी ची आता पर्यंत सुरु असलेली साडेसाती

  • २६/१/२०१७ ते २४/१/२०२० – 1st पार्ट (शनी धनु राशीत)
  • २४/१/२०२० ते १७/१/२०२३ 2nd पार्ट ( शनी मकर राशीत)
  • १७/१/२०२३ ते २९/३/२०२५ 3rd पार्ट ( शनी कुंभ राशीत) —- साडेसाती संपेल

कुंभ राशी ची साडेसाती

२४/१/२०२० ते १७/१/२०२३ 1st पार्ट ( शनी मकर राशीत)
१७/१/२०२३ ते २९/३/२०२५ 2nd पार्ट ( शनी कुंभ राशीत)
२९/३/२०२५ ते २३/२/२०२८ 3rd पार्ट ( शनी मीन राशीत) —- साडेसाती संपेल

शनी जेव्हा कुंभ राशीत १७/१/२०२३ ते २९/३/२०२५ पर्यंत असेल तेव्हा अडीचकी (लहान पनौती) हि कर्क राशी आणि वृश्चिक राशीला असेल. ह्या आधी शनीचे जेव्हा मकर राशीतुन भ्रमण होते तेव्हा मिथुन आणि तुला राशीसाठी अडीचकी होती २४/१/२०२० ते १७/१/२०२३.

अडीचकी चा नियम

चंद्र राशीपासून जेव्हा शनी ४ थ्या किंवा ८ व्या राशीतून भ्रमण करत असतो तेव्हा त्या राशीला अडीचकी म्हणजे शनीची लहान पनौती सुरु असते.– जी साडेसातीचाच एक प्रकार असतो पण साडेसात वर्षात जे शनीला साडेसातीत कार्याचे असते ते तो त्या राशी साठी अडीच वर्षात करत असतो म्हणून घटना ह्या जलद गतीने होतात. चांगल्या किंवा वाईट दोन्ही.

थोडक्यात शनी च्या एका राशीतून भ्रमण करत असताना १२ राशींपैकी ३ राशीला साडेसाती असते आणि वरील प्रमाणे २ राशींना अडीचकी सुरु असते.

नोट – शनी कुंभ राशीत असताना ह्या पाच राशींना कसा परिणाम देईल ह्यावर लिहिण्याचा प्रयत्न असेल.

धन्यवाद…..!

Leave a Reply