You are currently viewing गुरु परिवर्तन २०२० : ऋषभ राशी किंवा ऋषभ लग्न

वरील चंद्र राशी कुंडली किंवा लग्न कुंडली ऋषभ राशी आणि ऋषभ लग्नाची आहे. जर आपण ऋषभ राशीचे आहात किंवा ऋषभ लग्नाचे आहात तर खाली दिलेले गुरु च्या बदलाचे विषय हे आपल्याला दिनांक २०/११/२०२० ते २०/११/२०२१ पर्यंत मिळतील.

दिलेला लेख वाचायच्या अगोदर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून गुरु बदलाचे बेसिक परिणाम वाचून घ्या.

मला समजलेला ज्योतिष मधील गुरु ग्रह

https://shreedattagurujyotish.com/mala-samazalela-jyotish-madhil-guru/

गुरु चा मकर राशीत प्रवेश : दिनांक २० नोव्हेंबर २०२० ते २० नोव्हेंबर २०२१

https://shreedattagurujyotish.com/guru-cha-makar-rashit-pravesh-from-20november-2020-to-20-november-2021/

आपल्या ऋषभ राशी किंवा ऋषभ लग्नाच्या व्यक्तींच्या कुंडलीत गुरु हा मागील एक वर्षे धनु राशीत म्हणजे जिथे ९ लिहिला आहे कुंडलीच्या अष्ठम स्थानी येथे गुरु होता. आता तो आपल्या कुंडलीत अष्ठम स्थान सोडून भाग्य स्थानी आला आहे जिथे १० लिहिले आहे शनी च्या राशीत आणि शनी च्या बरोबर येथे तो दिनांक २१/११/२०२१ पर्यंत राहील.

गुरु आणि शनी ची युती

गुरु आणि शनी ची युती आपल्या भाग्य स्थानी जी आहे त्यात आपल्याला भागयाबद्दल नवीन नवीन बदल करावेसे वाटतील आणि ते तुम्ही जरूर कराल. गुरु जेव्हा गोचरीने भाग्यात येतो तेव्हा भाग्योदयासाठी व्यक्ति उत्सुक होतो. अणि भाग्योदयाच्या ज्या ज्या गोष्टी ह्या पूर्वी अडकल्या होत्या त्यात जे जे अडथळे येत होते त्यात हा नीच गुरु आपल्याला नवीन ताकद निर्माण करेल कारण तो शनी बरोबर आहे पूर्ण एक वर्ष.

गुरु आणि शनी ची दृष्टी

गुरु आणि शनी ची दृष्टी हि आपल्या पराक्रमावर जीथे ४ लिहिले आहे तेथे ह्यांची ७ वि दृष्टी येत आहे म्हणून ह्या वर्षी काही नवीन पराक्रम दाखविण्याची उत्सुकता असेल पण त्याचा प्लॅन ६ एप्रिल च्या अगोदर करा. ह्यामुळे भावंडं हा विषय असू शकतो ह्या वर्षी काही त्यांना होणारे त्रास किंवा त्यांच्याबद्दलचे काही विषय हे असू शकतात २० नोव्हेंबर २०२१ पर्यंत. ह्या वर्षी ऋषभ लग्नाच्या सर्वाना अध्यतिमीकतेचि काही आस लागेल धार्मिक स्थळांना भेटी होतील.

जर तुमच्या पत्रिकेत गुरु वक्री असेल (लग्न कुंडलीच्या वर ग्रहांची माहिती असते त्यात गुरु च्या समोर (व) लिहिले आहे का पहा कॉम्पुटर कुंडलीत) तर दिनांक २०/६/२०२१ ते १८/१०/२०२१ भाग्योदयासाठी काहीतरी जम्पिंग निर्णय घ्याल नक्की.

गुरु ची ५ वि दृष्टी

गुरु ची ५ वि दृष्टी हि प्रथम स्थानावर जिथे २ लिहिले आहे पण तेथे दिनांक २४/९/२०२० ला जो राहू आला आहे तो १८ महिन्यासाठी म्हणून स्वतःला प्रेसेंट करण्यासाठी तुमची धावपळ होऊ शकते. नवीन नवीन कल्पनांना ऊत येईल. त्यात तुम्हाला समाजाची पर्वा न करता काही निर्णय घ्यावे लागतील अशी परिस्थिती आली तर जरूर घ्या.

गुरु ची ९ वि दृष्टी

गुरु ची ९ वि दृष्टी हि तुमच्या पत्रिकेत जिथे ६ नंबर आहे तेथे येत आहे जिथून तुमचे ज्ञान संतती आणि शिक्षण पाहिले जाते ह्यात जास्त ऍक्टिव्हेट व्हाल. जर शिक्षण सुरु असेल तर त्यात एखादा अडथळा येऊ शकतो पण त्यात तुम्ही पुन्हा नवीन काही करण्यासाठी उभे राहाल. शिक्षणाच्या बाबतीत एखादा निर्णय नक्की होईल ह्या वर्षी. संतान चा विषय असेल तर त्यात सुद्धा हा कालावधी उत्तम आहे काही तरी नवीन ट्रीटमेंट करून घ्याल आणि आपले स्वप्न पूर्ण कराल.

प्रेम संबंध

ज्या ऋषभ राशी आणि लग्न वाले प्रेमात असतील तर २०/६/२०२१ ते १४/९/२०२१ ह्या काळात निर्णय होतील.

ऋषभ राशीच्या लग्नाच्या सर्वांचे विवाह ठरण्याचे प्रकार आणि विवाह होण्याचे योग नक्की ह्या वर्षी आहेत प्रयत्न करण्यास हरकत नाही.

ज्यांचे विवाह रखडले आहेत त्या सर्वाना हा काळ अति उत्तम आहे फक्त एव्हढेच कि काही तरी सामाजिक नियम डावलून विवाह करण्याची वेळ आली तर ते आत्ताच करून घ्यावेत.

वैवाहिक सुख

वैवाहिक जीवनातले काही विषय हे मागे जे पेंडिंग राहिले होते ते ह्या वर्षी ६ एप्रिल २०२१ च्या आधी करून घ्या. तुमच्या पत्रिकेतील ७ व्या स्थानातल्या केतूच्या भ्रमणामुळे काही विषय तसेच राहण्याचा संभव आहे.

गुरुचे उपाय

ऋषभ राशी आणि ऋषभ लग्न वाल्याना गुरुचे उपाय म्हणजे प्रत्येक गुरुवारी कोणत्याही गरीब विध्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करावी जसे वह्या पुस्तके पाटी पेन्सिल पेन वगैरे. शनिवारी पिंपळाला जल अर्पण करणे हा उत्तम उपाय आहे.

गुरु च्या नक्षत्र भ्रमणाचे ऋषभ राशी आणि ऋषभ लग्नावर होणारे परिणाम देतो

  • २०/११/२०२० ला जेव्हा गुरु मकर राशीत प्रवेश करेल तेव्हा तो उत्तराषाढा नक्षत्री असेल आणि तो ह्या नक्षत्री दिनांक ६/१/२०२१ पर्यंत असेल. ह्यात वाहन घेणे, घर घेणे, घरातील काही विषय, आईची तब्येत चे विषय, थोडे त्रासदायक होतील त्यात त्या त्या वयोमानाप्रमाणे समजावे आणि आधीच्या घटना त्याबद्दल काही ऍक्टिव्हेट असाव्यात. पण ह्याच पिरियड मध्ये हे विषय मिटवा.
  • पुढे ७/१/२०२१ पासून तो ४/३/२०२१ पर्यंत गुरु श्रवण चंद्राच्या नक्षत्री असेल — ह्यात आपल्या हातून होणाऱ्या पराक्रम बद्दल चे विषय आणि काही भाऊ बहिणीच्या बद्दल चे विषय असतील. ह्यात पैशाला थोडे त्रासदायक होऊ शकते. खर्च होतील.
  • ५/३/२०२१ पासून गुरु २२/५/२०२१ पर्यंत धनिष्ठा मंगळाच्या नक्षत्रात असेल – वैवाहिक सुखातल्या विषयी तुम्ही ऍक्टिव्ह असाल, बाहेरगावी जाण्यासंबंधित घटना घडू शकतात,
  • २२/५/२०२१ पासून गुरु २०/७/२०२१ पर्यंत शततारका राहूच्या नक्षत्री असेल.— ह्यात हेल्थ कडे अति लक्ष द्यावे. कमी वादविवादात राहावे असा सल्ला देण्यात येतो.
  • २०/७/२०२१ पासून गुरु पुन्हा धनिष्ठा नक्षत्री येईल आणि पुढे २/१/२०२२ पर्यंत गुरु ह्याच नक्षत्री असेल. पण मकर मधून २०/११/२०२१ ला निघेल आणि कुंभेत असेल पुढे. — ह्यात व्यापारी असाल तर पार्टनर कडून काही त्रास झाल्यावर विचार कराल आणि जर वैवाहिक असाल तर लाईफ पार्टनर कडून झालेले त्रास ह्यावर तोडगा काढाल. विवाह झाला नसेल तर तो होण्याचा ठरण्याचा संभव अति आहे.

गुरु चे हे भ्रमण आपल्या सर्वाना उत्तम ज्ञान आरोग्य आणि धन देऊन सुखी करो हीच प्रार्थना.

धन्यवाद…..!

This Post Has One Comment

  1. Jayashri Nalawade

    Best 👌 information

Leave a Reply