You are currently viewing राहू केतू राशी परिवर्तन २०२० : कन्या राशी आणि कन्या लग्न

राहू केतू राशी परिवर्तन २०२० खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आधी हे वाचून नंतर खालील आपल्या राशीचे आणि लग्न स्थानाचे फळ वाचावे हि विनंती.

राहुचा वृषभ राशीत आणि केतूचा वृश्चिक राशीत प्रवेश

https://shreedattagurujyotish.com/rahu-aani-ketu-bhraman-23-september-2020/

२३ सप्टेंबर २०२० ते पुढील १८ महिने कन्या राशी आणि कन्या लग्नाला राहूचे भ्रमण हे पत्रिकेच्या भाग्य स्थानी (पत्रिकेचे ९ वे स्थान) आहे तिथे ऋषभ राशी आहे क्रमांक २ आणि केतू चे भ्रमण तिसऱ्या स्थानी आहे जिथे ८ वृश्चिक राशी आहे.

कन्या राशी आणि कन्या लग्न
ज्यांची राशी कन्या राशी आहे त्यांची हि चंद्र कुंडली आहे आणि खालील राहू केतू चे भ्रमण ह्यावर केलेले विवेचन हे आपल्यासाठी आहे.
आणि ज्यांची कोणतीही राशी असली तरी आपली जर लग्न कुंडली वरील कुंडली प्रमाणे असेल जिथे ६ ने सुरुवात होते तर खाली दिलेले विवेचन हे आपल्यासाठी आहे. तुमच्या मूळ लग्न कुंडलीत येथे राहू नसला तरी आणि असला तरी लग्न कुंडली अशीच असेल तरी हे लिखाण वाचून घ्यावे.

राहू भाग्य स्थानी हे कन्या राशी आणि कन्या लग्नाला फार सूंदर आहे ज्यांना आत्तापर्यंत आपल्या भाग्याची काळजी होती ती मिटेल. ज्यांना बाहेर जाण्यास काही अडथळे निर्माण होत होते ते येथील राहू आल्याने पूर्ण होतील.

भाग्योदय म्हणजे हेल्थ शिक्षण करिअर विवाह आणि प्रॉपर्टीज च्या गोष्टी पूर्ण होणे. तर इथे उच्च शिक्षण घेण्यास कन्या राशी साठी खूप चांगले दिवस आहेत. करिअर मध्ये नवीन काही तरी डेव्हलोपमेंट नक्की दिसेल. ज्या कन्या राशीचा विवाह ह्या कालावधीत होईल विवाहात काही वेगळेपण दिसू शकतो.

जे कन्या राशीचे आणि कन्या लग्नाचे विधुर विधवा आहेत त्यांना हा कालावधी जीवनात काही नवीन सुरुवात करण्यास उत्तम आहे. मात्र ह्यात परंपरा रूढी ह्यांना छेद नक्की द्यावा लागेल हे करताना.

राहू जेव्हा नवम स्थानात येतो तेव्हा परंपरा रूढी धर्म या विरोधात त्या व्यक्तीला काही नवीन करावेसे वाटेल. म्हणून पुढील १८ महिने तुम्ही ह्यात सहभागी होऊ शकता. काही गोष्टी चांगल्या दिसतात चांगल्या साठी होतील.

राहू ची ७ वी दृष्टी

राहू ची ७ वी दृष्टी पराक्रमावर आहे जिथे ८ लिहिले आहे आणि तिथे केतू सुद्धा आहे. त्यामुळे आपल्याला भाग्य आणि पराक्रम वर जास्त ऍक्टिव्हिटीज मिळतील ह्या १८ महिन्यात. राहू ची पत्रिकेच्या ३ ऱ्या स्थानावर दृष्टी म्हणजे तुम्ही आपल्या शहरातून दुसऱ्या शहरात प्रगती करण्यास नक्की प्रवृत्त व्हाल.

ह्या दृष्टी मुळे कन्या राशी आणि कन्या लग्न च्या व्यक्तींना भाऊ बहिणी असतील तर त्यांना त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांच्यासाठी धावपळ सुद्धा दिसेल.

राहू ची ९ वी दृष्टी

राहू ची नववी दृष्टी पंचम स्थानावर जिथे १० नंबर शनी ची मकर राशी येत आहे. ज्या कन्या राशी आणि कन्या लग्न वाल्याना आत्तापर्यंत जर संतान सुख मिळाले नसेल आणि काही वेगळ्या ट्रीटमेंट करून कन्सिव्ह करायची असेल तर ह्यासारखी संधी नाही. ह्या १८ महिन्यात करून घ्या रिझल्ट आपल्या समोर असेल. कारण नोव्हेंबर महिन्यात गुरु ह्याच स्थानी मकर राशी नीच राशीत जात आहे. म्हणून परंपरेच्या वेगळ्या ट्रीटमेंट करून हा प्रोसेस कम्प्लिट करून घ्या. हा मोलाचा सल्ला देण्यात येतो.

बाकी ह्याच्या राशी आणि लग्नाच्या शैक्षणिक विध्यार्थ्यांना सुद्धा असे काही नवीन कोर्सेस वगैरे करावे अशी इच्छा झाली तर शिकून घ्यावे पण जन्म स्थानात नाही. ज्यांचे कन्या राशी आणि कन्या लग्न आहे आणि प्रेमसंबंध सुरु आहेत त्यात तुम्ही निर्णय घ्याल आणि एकतर बाजूला व्हाल नाहीतर सक्सेस व्हाल.

राहू ची ५ वी दृष्टी

राहू ची ५ वी दृष्टी लग्न स्थानावर जिथे ६ आहे अशा स्वतःच्या राशीवर येत असल्यामुळे आपण खूप पॉसिटीव्ह असाल स्वतःच्या प्रयत्नांसाठी. आणि ऍक्टिव्हिटी सुद्धा कराल मात्र काही वाद विवाद टाळून हे करणे हितावह ठरेल.

केतू आणि केतूच्या दृष्ट्या

केतू पराक्रम स्थानी येऊन तो ५ व्या दृष्टीने विवाह स्थानावर जिथे १२ लिहिले आहे. त्यामुळे वैवाहिक विषयात थोडे त्रासाचे होऊ शकते. जे कन्या राशी आणि कन्या लग्नाच्या व्यक्ती बिझिनेस मध्ये पार्टनर शिप मध्ये काम करतात त्यांना त्रास होण्याची हि चिन्हे आहेत पुढील १८ महिने.

केतू ची ७ वी दृष्टी भाग्यावर जिथे २ लिहिले आहे तिथे येत आहे इथे राहू ची ७ व्या दृष्टी सारखी फळे मिळतील.

केतू ची ९ वी दृष्टी लाभ स्थानावर येत आहे त्यामुळे तिथे ४ नंबर ची कर्क राशी असल्यामुळे काही प्रमाणातील लाभ हे अडकून राहू शकतात. किंवा पुढे दिसणाऱ्या इच्छा ह्या पूर्ण होण्यास लांबणीवर होऊ शकतात. जर तुमच्या स्वतःच्या पत्रिकेत केतू चांगल्या स्थितीत नसला तरच हे होईल नाहीतर नाही.

उपाय

कन्या राशी आणि कन्या लग्नासाठी राहू च्या भ्रमणासाठी काही उपाय देत आहे.

  • प्रत्येक बुधवारी गायीला हिरवे मूग + गूळ खाऊ घालणे किंवा गायीला हिरवा चारा देणे.
  • हनुमान चालीसा चे पठण बुधवारी खास हनुमंताच्या देवळात करणे.
  • रोज किंवा बुधवारी सर्वात उत्तम उपाय गणेश अथर्वशीर्ष म्हणणे.

हे वरील दिलेले उपाय आपल्याला हे राहू केतू चे भ्रमण चांगले फळ देऊन जाईल.

नोट : वरील सर्व आपली जन्मपत्रिका न पाहता आणि इतर सर्व ग्रहांची स्थिती न पाहता एक विवेचन आहे अधिक शुक्ष्मता हि आपली स्वतःची पत्रिका सांगू शकेल एखाद्या तद्न्य ज्योतिषाकडून. तेव्हा हे सर्व कन्या राशीच्या आणि कन्या लग्नाच्या पत्रिकेवरील कॉमन भाकीत समजावे हि विनंती.

धन्यवाद…..!

Leave a Reply