You are currently viewing राहू राशी परिवर्तन २०२२ मिथुन राशी / मिथुन लग्न

राहू राशी परिवर्तन २०२२ मिथुन राशी / मिथुन लग्न- RAHU/KETU TRANSIT FOR MITHUN RASHI

राहू/केतू परिवर्तन २०२२

वरील लिंक मध्ये ज्या प्रमाणे महत्वाचे पॉईंट राहू केतूच्या बदलाचे दिले आहेत त्याच प्रमाणे फक्त आता इथे मिथुन राशी आणि मिथुन लग्न ह्यावर राहू केतू च्या भ्रमणाचा (भासमानाचा) विचार करू.

राहू राशी परिवर्तन २०२२- मिथुन राशी / मिथुन लग्न
राहू राशी परिवर्तन २०२२ मिथुन राशी / मिथुन लग्न

मिथुन राशी आणि मिथुन लग्न म्हणजे आपली राशी जरी मिथुन नसली पण लग्न मिथुन असेल तर किंवा आपले लग्न मिथुन नसले पण राशी मिथुन असली तर खाली दिलेले विवेचन हे आपल्या साठी असेल.

मिथुन राशि अणि मिथुन लग्नाच्या पत्रिकेत राहु लाभ स्थानी १८ महिने मेष राशीत असेल. आणि केतू पाचव्या स्थानी तुला राशीत असेल लाभ आणि पंचम स्थानातील जी जी फळे आहेत ती ती फळे ह्या जातकांना मिळतील त्यांच्या प्रत्येक सुरु असलेल्या क्षेत्राशी निगडित व्यवहार आणि आचारविचार असतील.

विद्यार्थ्यांना फार धावपळ दिसेल ह्या १८ महिन्याच्या कालावधीत. एखादे व्यत्यय अडचणी दिसतील. करिअर क्षेत्रातील वयातील जातकांना पैसा पैसा आणि पैसा मिळाल्याशिवाय राहणार नाही. अचानक लाभ जाणवतील. मुलाच्या शिक्षणाची काळजी वाढेल. एखादा निर्णय घेण्यासाठी अचानक घटना घडतील. मुलांच्या बाबतीत धावपळ दिसेल.

संतती साठी धावपळ करण्यासाठी हा काळ मिथुन राशीसाठी योग्य नाही.तरी सुद्धा आपल्या मूळ पत्रिकेतील योग पाहावा.
अध्यात्मिकपण वाढेल. नोकरीत असाल तर परिवाराकडे लक्ष जास्त देत असताना जॉब वर कमी लक्ष होईल किंवा गैरहजेरी वाढेल पण त्याचा काही वाईट परिणाम होताना दिसणार नाही.

  • १२/४/२०२२ ते १५/६/२०२२ पर्यंत राहू मेष राशीतल्या कृतिका नक्षत्राचे फळ देणार आहे. तेव्हा मिथुन राशी किंवा लग्न च्या व्यक्तींना ह्या काळात घर न घेण्याचा सल्ला दिला जाईल उलट घर विकत असाल तर उत्तम. मूळ पत्रिकेत ज्या स्थानात तुमचा रवी लिहिला असेल त्या स्थानाची धावपळ होईल. पण इथे जर पाहायचे झाल्यास पराक्रम करण्यासाठी घरापासून दूर जाण्याचा हाच काळ असेल. भावंडांशी वाद विवाद होण्याचा कालावधी आहे सांभाळावे.
  • १५/६/२०२२ ते २१/२/२०२३ पर्यंत राहू मेष राशीतल्या भरणी नक्षत्रात असेल आणि त्याचे फळ हे मिथुन राशी किंवा मिथुन लग्नाच्या व्यक्तींना पुढील प्रमाणे मिळेल. मुलांच्या शिक्षणासाठी पैसा खर्च होईल. ज्यांना बाहेर जावेसे वाटत असेल तर त्यांनी ह्या कालावधीत प्रयत्न करावा. नोकरीत जास्त गैरहजेरी ह्याच कालावधीत दिसेल.
  • २१/२/२०२३ ते ३०/१०/२०२३ पर्यंत राहू मेष राशीतल्या अश्विनी नक्षत्रात असेल आणि त्याचे फळ हे मिथुन राशी किंवा मिथुन लग्नाच्या व्यक्तींना पुढील प्रमाणे असेल. ह्या कालावधीत आपल्याला जॉब किंवा आरोग्यासाठी धावपळ दिसेल. मोठे निर्णय इथे नको.
  • केतू तुला राशीत १२/४/२०२२ पासून ते १८/१०/२०२२ पर्यंत विशाखा नक्षत्राचे फळ देणार आहे. त्यामुळे मिथुन राशी/लग्न च्या व्यक्तींना इथे विवाह आणि वैवाहिक विषय दिसतील. इथे पार्टनरशिप करता येईल जर योग असेल तर.
  • केतू तुला राशीत १८/१०/२०२२ पासून ते २६/६/२०२३ पर्यंत स्वाती नक्षत्राचे फळ देणार आहे. त्यामुळे हा काळ संततीसाठी निर्णय घेण्याचा काळ असेल. पण जरा जपून घाई करू नये. शिक्षणासाठी हा काळ उत्तम नाही. जास्त मेहनत करावी लागेल.
  • केतू तुला राशी २६/६/२०२३ ते ३०/१०/२०२३ पर्यंत चित्रा नक्षत्राचे फळ देणार आहे. त्यामुळे ह्या कालावधीत नोकरीतील बदल दिसतील. पण प्रमोशन होईल पैसा मिळण्याचा हाच कालावधी असेल.

उपाय — मिथुन लग्न आणि राशीच्या व्यक्तींनी राहू बदलासाठी उपाय म्हणून प्रत्येक बुधवारी गणेशाला दुर्वा वाहवा आणि गायीला हिरवा चारा घालावा लाभ होतील.

धन्यवाद…..!

Leave a Reply