You are currently viewing राहू राशी परिवर्तन २०२२ वृषभ राशी / वृषभ लग्न

राहू राशी परिवर्तन २०२२ वृषभ राशी / वृषभ लग्न- RAHU/KETU TRANSIT FOR VRUSHABH RASHI

राहू/केतू परिवर्तन २०२२

वरील लिंक मध्ये ज्या प्रमाणे महत्वाचे पॉईंट राहू केतूच्या बदलाचे दिले आहेत त्याच प्रमाणे फक्त आता इथे वृषभ राशी आणि वृषभ लग्न ह्यावर राहू केतू च्या भ्रमणाचा (भासमानाचा) विचार करू.

राहू राशी परिवर्तन २०२२- वृषभ राशी / वृषभ लग्न
राहू राशी परिवर्तन २०२२- वृषभ राशी / वृषभ लग्न

वृषभ राशी आणि वृषभ लग्न म्हणजे आपली राशी जरी वृषभ नसली पण लग्न वृषभ असेल तर किंवा आपले लग्न वृषभ नसले पण राशी वृषभ असली तर खाली दिलेले विवेचन हे आपल्या साठी असेल.

वृषभ राशि अणि वृषभ लग्नाच्या पत्रिकेत राहु बाराव्या स्थानी १८ महिने मेष राशीत असेल. आणि केतू सहाव्या स्थानी तुला राशीत असेल बाराव्या आणि सहाव्या स्थानातील जी जी फळे आहेत ती ती फळे ह्या जातकांना मिळतील त्यांच्या प्रत्येक सुरु असलेल्या क्षेत्राशी निगडित व्यवहार आणि आचारविचार असतील.

विद्यार्थ्यांना उत्तम संधी प्राप्त होतील. बाहेर जाऊन शिक्षण घेण्यासाठी जिद्द आणि ताकद मिळेल. करिअर क्षेत्रातील वयातील जातकांना ट्रान्सफर शी सामना करावा लागेल. नोकरी धंदा बदल होण्याची चिन्हे असतील. कोर्ट केस ज्या जातकांकडे आहेत त्यात ह्या १८ महिन्यात खूप धावपळ होईल आणि त्यासाठी परिणाम लगेच मिळणार नाहीत.

कर्ज घेत असाल तर त्याच कार्यासाठी उपयोग कमी होताना दिसेल ज्यासाठी घेतले आहे ते काम पूर्णत्वाकडे जाताना अडचणी येतील.
आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष नको. पैसा खर्च होताना दिसेल.

नोकरीतील दगदग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. घरापासून जवळ असणारे जॉब त्रासदायक किंवा टिकताना कठीण होतील. लांबच्या प्रवासाचे जॉब किंवा बिझिनेस सफल कराल किंवा त्यात कमी अडचणी येतील. वरील १८ महिन्याच्या कालावधीत सेविंग्स कमी होईल. किंवा असलेले डिपॉझिट्स तोडावे लागेल. तेव्हा खर्चिक गोष्टींकडे लक्ष द्यावे.

  • १२/४/२०२२ ते १५/६/२०२२ पर्यंत राहू मेष राशीतल्या कृतिका नक्षत्राचे फळ देणार आहे. तेव्हा वृषभ राशी किंवा लग्न च्या व्यक्तींना ह्या काळात घरातील व्यक्तींच्या साठी धावपळी निर्माण होण्याचे संकेत आहेत. त्यासाठी आपणास धावपळ होत असेल तर वेळ काढावा लागेल असे दिसते. घर खरेदी चे निर्णय पुढे घेण्यास हरकत नाही. इथे सुख स्थानाच्या राशीच्या नक्षत्रात राहू चे भ्रमण म्हणजे स्वतःच्या सुखासाठी फार झगडावे लागेल.
  • १५/६/२०२२ ते २१/२/२०२३ पर्यंत राहू मेष राशीतल्या भरणी नक्षत्रात असेल आणि त्याचे फळ हे वृषभ राशी किंवा वृषभ लग्नाच्या व्यक्तींना पुढील प्रमाणे मिळेल. इथे आरोग्याचे त्रास जाणवू शकतील दुर्लक्ष नको. पती पत्नींमध्ये आधीपासून काही भांडणे सुरु असतील तर दुरावा निर्माण होईल. पण करिअर मधील व्यक्तींना हा काळ उत्तम आहे प्रमोशन साठी. पैसा मिळेल. स्वतःला जे पाहिजे ते मिळवू शकाल.
  • २१/२/२०२३ ते ३०/१०/२०२३ पर्यंत राहू मेष राशीतल्या अश्विनी नक्षत्रात असेल आणि त्याचे फळ हे वृषभ राशी किंवा वृषभ लग्नाच्या व्यक्तींना पुढील प्रमाणे असेल. ह्या कालावधीत आपल्याला आराम करता येणार नाही. फेब्रुवारी पर्यंतच्या जबाबदाऱ्या आता आपल्याला अधिक जाणवतील. एखादी कोर्ट केस असेल तर धावपळ ह्या वेळी दिसेल. पैसा इथे सुद्धा मिळेल पण तो खर्च होताना दिसेल.
  • केतू तुला राशीत १२/४/२०२२ पासून ते १८/१०/२०२२ पर्यंत विशाखा नक्षत्राचे फळ देणार आहे. त्यामुळे वृषभ राशी/लग्न च्या व्यक्तींना इथे मुलांसाठी शिक्षणासाठी खर्च करावा लागेल. संतती प्रश्न असतील तर इथे निर्णय घेत असाल तर विचारपूर्वक घ्या धावपळ दिसते पैसा खर्च होण्याचा कालावधी समजावा.
  • केतू तुला राशीत १८/१०/२०२२ पासून ते २६/६/२०२३ पर्यंत स्वाती नक्षत्राचे फळ देणार आहे. त्यामुळे हा काळ गुंतवणुकीचे फळ देईल. आरोग्यासाठी मोठे निर्णय इथे घ्याल. बाहेर जाऊन शिक्षण घेण्यासाठी उत्तम. स्पर्धा परीक्षेसाठी हा काळ उत्तम आहे.
  • केतू तुला राशी २६/६/२०२३ ते ३०/१०/२०२३ पर्यंत चित्रा नक्षत्राचे फळ देणार आहे. त्यामुळे ह्या कालावधीत विवाह आणि वैवाहिक सुखाच्या बद्दल सर्व घटना घडतील चांगल्या किंवा वाईट दोन्ही. ज्यांचा घटस्फोट होत नव्हता तो निर्णय इथे होईल. ज्याचा विवाह होत नव्हता त्यांचा विवाह किंवा त्याबद्दलचे निर्णय इथे होतील.

उपाय — वृषभ लग्न आणि राशीच्या व्यक्तींनी राहू बदलासाठी उपाय म्हणून शिवाच्या उपासनेत प्रत्येक सोमवारी शिव अभिषेक करावा. आणि लहान मुलींना शैक्षणिक मदत करावी. गरजू विधवा महिलांना मदत करणे खूप चांगले होईल.

धन्यवाद…..!

Leave a Reply