Table of Contents
वृश्चिक राशी/ लग्न — राहू परिवर्तन ३० ऑक्टोबर २०२३ ते १८ मे २०२५
राहू चे १८ महिन्याचे मीन राशीतून जे भ्रमण होत आहे त्याचे टाइम टेबल वरील लिंक मध्ये वाचून घ्या.
वृश्चिक राशी आणि वृश्चिक लग्न साठी हे मीन राशीतून होणारे भ्रमण पुढे देत आहे.
जर आपली राशी वृश्चिक असेल किंवा आपली राशी दुसरी कोणतीही असेल पण जर आपले लग्न वृश्चिक असेल तर खाली दिलेले विवेचन हे आपल्यासाठी आहे.
वर दिलेली कुंडली इमेज हि वृश्चिक राशी किंवा वृश्चिक लग्नाची आहे. जर आपली वृश्चिक राशी नसली तरी जर वृश्चिक लग्न असेल तर आपली लग्न कुंडली हि अशी असू शकेल.
नोट — मी इथे चांगले आणि वाईट दोन्ही बाजू मांडेन. आपल्याला राशी कुंडली आणि लग्न कुंडली दोन्ही चेक करावी लागेल. ह्यासाठी आपली राशी कोणती आणि आपले लग्न कोणते हे आपणास माहित हवे. आपण दोन्ही पोस्ट वाचल्यानंतर (आपले लग्न आणि आपली राशी) जर राशी कुंडलीत आणि लग्न कुंडलीत एखादा विषय हा दोन्ही ठिकाणी चांगला असेल तर ती गोष्ट पॉसिटीव्ह समजावी आणि दोन्ही ठिकाणी वाईट असेल तर काळजी घ्यावी लागेल. तरी सुद्धा आपल्या मूळ कुंडलीत राहू जिथे जन्माच्या वेळी आहे ते पाहूनच फायनल डिसिजन घ्यावे हि विनंती. जे विषय इथे मांडण्यात येतील त्या घटना घडण्यासाठी आपली परिस्थिती आणि आपले वय त्यास सूट होत असतील तरच त्या घडतील नाहीतर घडणार नाही.
नोट — २५/३/२००५ ते १२/१०/२००५ ह्या कालावधीत राहु १८ वर्षापूर्वी मीन राशीतून भ्रमण करत होता त्यावेळी शनी कर्क राशीतून भ्रमण करत होता — राहू ची ७ वि दृष्टी ज्या स्थानावर येत होती तिथेच शनी आपली ३ री दृष्टी कर्क राशीतून टाकत होता. आणि ते स्थान ११ वे स्थान होते (जिथे जिथे ६ नंबर ची कन्या राशी असेल आपल्या पत्रिकेत) शनी आणि राहू दोघे एकदम पाहत होते त्या स्थानाला. २५/३/२००५ पासून च्या १८ महिन्याच्या कालावधीत वृश्चिक राशी आणि वृश्चिक लग्नाला ११ व्या (लाभ) ह्या स्थानाचे म्हणजे सर्व प्रकारच्या इच्छापूर्ती, लाभ, मोठा भाऊ, सून आणि कान ह्या प्रकारचे विषय पहिले जातात. ह्यातील एक तरी विषय खूप चांगला किंवा खूप वाईट गेलाच असेल आठवून पहा. शक्य झाले तर कॉमेंट करा.
आता पुढे …….ह्याचे परिणाम काय होईल ते पाहू
दिनांक ३० ऑक्टोबर २०२३ ते १८ मे २०२५ पर्यंत राहू मीन राशीत आहे आणि आपल्या वृश्चिक राशी कुंडलीत किंवा वृश्चिक लग्न कुंडलीत मीन राशी हि कुंडलीच्या ५ व्या (पंचम) स्थानी येत आहे ह्या स्थानावरून बर्थ चाईल्ड, कन्सिव्ह , संततीचे सर्व विषय, बौद्धिक क्षमता, खेळ प्रेम (प्रेम देणे घेणे) पाहतात. राहू ह्या स्थानातून भ्रमण करत असताना ह्या वरील विषयातील जे जे विषय आधी आपल्याकडे होते त्यात तुम्ही अग्रेसिव्ह होऊन ते मिळविण्याचा प्रयत्न जरूर कराल. जर कुणाला संततीचे विषय असतील तर राहू इथे मेडिकल च्या साहाय्याने नवीन तंत्रज्ञानाने चाईल्ड बर्थ करून देण्याची ताकद दाखवितो. ह्याचे कारण तो आधीच्या सर्व परंपरा मोडतो. मात्र जे नॉर्मल कन्सिव्ह होऊन ९ महिन्याच्या प्रोसेस मध्ये आहेत त्यांनी जपावे. मिसकॅरेज होण्याचे प्रमाण जास्त होऊ शकेल जर आपल्या पत्रिकेत ५ वे स्थान निगेटिव्ह असेल तर. जर कुणाकडे प्रेमाबद्दल चे विषय असतील तर मात्र इथे तो किती सफलता देईल ह्यात शंका आहे.
विद्यार्थी दशेतील मुलांना हा राहू रेगुलर शिक्षणातून नवीन शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करेल. किंवा त्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे.
राहूची ९ व्या स्थानावर ५ वी दृष्टी
राहू वरील दिलेल्या कालावधीत मीन राशीत असताना कुंडली इमेज मध्ये दाखविल्याप्रमाणे तिथून तो नवव्या (भाग्य) स्थानाला पाहणार आहे. म्हणजे जिथे ४ नंबर लिहिले आहे. म्हणजे हे स्थान आता आपले ऍक्टिव्हेट राहू करणार. चांगले असे होईल कि ह्या स्थानाबद्दलचे जे जे विषय असतील जे आधी पेंडिंग होते ते सर्व सुटतील. ह्या स्थानावरून पत्रिकेत आयुष्यातील मोठे केलेले चेंजेस जे भाग्याच्या डेव्हलोपमेंटसाठी असतात, वडिलांचे विषय, प्रवास, तीर्थ यात्रा, सन्यास, उच्च शिक्षण, गुरुवर्य पहिले जातात. जन्म स्थानापासून दूर जाऊन जे जे विषय आपल्या फायद्याचे असतील त्यात नक्की निर्णय घेऊन आपल्या डेव्हलोपमेंट चा निर्णय घेण्याची हीच वेळ असेल.
विद्यार्थी दशेतील मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी सुद्धा हा काळ जन्म स्थानापासून दूर जाऊन घेण्याचा उत्तम असेल. वडिलांच्या आरोग्याविषयी काळजी दिसेल. जर आधी काही विषय असतील तर त्यात धावपळ होईल.
राहु ची ११ व्या स्थानवार ७ वी दृस्टि
कुंडली इमेज मध्ये पहा राहु ६ व्या स्थानातून बाराव्या स्थानवार आपली ७ वी दृस्टि देत आहे जिथे ६ नंबर लिहिले आहे हे कुंडलीचे लाभ स्थान आहे. इच्छापूर्तीचे स्थान आहे . मोठा भाऊ, सून आणि कान ह्या प्रकारचे विषय इथून पहिले जातात. ह्या १८ महिन्याच्या कालावधीत आपण ज्या ज्या इच्छा पूर्ण व्हायच्या बाकी आहेत त्यात तुम्ही अग्रेसिव्ह व्हाल आणि त्यात जास्त प्रयत्न कराल.
राहू ची प्रथम स्थानावर ९ वी दृष्टी
कुंडली इमेज मध्ये राहू जिथे आहे तिथून तो पत्रिकेतील तिसऱ्या स्थानावर दृष्टी टाकत आहे. वृश्चिक राशी किंवा वृश्चिक लग्नाच्या व्यक्तींसाठी पुढील १८ महिने हे ह्या स्थानावरील घटनांचा जास्तीत जास्त परिणाम दिसू शकतो.जिथे ८ नंबर लिहिले आहे ह्याच स्थानावर शनी ची कुंभ राशीतून १० वी दृष्टी सुद्धा येत आहे त्यामुळे अति सावधान. जे जे विषय खाली देत आहे त्या विषयी अति चांगली किंवा वाईट धावपळ होण्याचे नाकारता येत नाही. प्रथम स्थानाचे विषय आहेत – व्यक्तिमत्व,(प्रेसेंटेशन) स्वभाव, मस्तिष्क, विवेक, शील, विनम्रता, हेल्थ, बॉडी लँग्वेज, निवटीविटी, पॉसिटीव्हिटी.- ह्यातील एक तरी विषय आता ऍक्टिव्हेट होऊ शकेल. ह्या वेळी आपल्या हेल्थ ची काळजी जरूर घ्यावी.
वरील सर्व बॅलन्स करण्यासाठी उपाय — आपण वृश्चिक राशीचे आहात किंवा वृश्चिक लग्नाचे असाल राहू च्या विषयी च्या कोणत्याही त्रासाबद्दल हनुमंताची सेवाच हि कामी येते . तुमच्या राशी चा मालक हा मंगळ आहे म्हणून हनुमंत आणि श्री गणेश ह्या देवतांची मंगळवारी कोणत्याही पद्धतीने केलेली भक्ती हि ह्या कालावधीत जास्तीत जास्त उपयोगी होईल.
धन्यवाद।
श्री दत्तगुरु ज्योतिष
९८२१८१७७६८
७५०६७३७५१९