You are currently viewing राहू केतू राशी परिवर्तन २०२० : मिथुन राशी आणि मिथुन लग्न

राहू केतू राशी परिवर्तन २०२० खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आधी हे वाचून नंतर खालील आपल्या राशीचे आणि लग्न स्थानाचे फळ वाचावे हि विनंती.

राहुचा वृषभ राशीत आणि केतूचा वृश्चिक राशीत प्रवेश

https://shreedattagurujyotish.com/rahu-aani-ketu-bhraman-23-september-2020/

२३ सप्टेंबर २०२० ते पुढील १८ महिने मिथुन राशी ला राहूचे भ्रमण हे पत्रिकेच्या बाराव्या स्थानी आहे आणि केतू चे भ्रमण सहाव्या स्थानी आहे.

ज्यांची राशी मिथुन राशी आहे त्यांची हि चंद्र कुंडली आहे आणि खालील राहू केतू चे भ्रमण ह्यावर केलेले विवेचन हे आपल्यासाठी आहे.
आणि ज्यांची कोणतीही राशी असली तरी आपली जर लग्न कुंडली वरील कुंडली प्रमाणे असेल जिथे ३ ने सुरुवात होते तर खाली दिलेले विवेचन हे आपल्यासाठी आहे. तुमच्या मूळ लग्न कुंडलीत येथे राहू नसला तरी आणि असला तरी लग्न कुंडली अशीच असेल तरी हे लिखाण वाचून घ्यावे.

वरील पत्रिकेत जिथे २ लिहिले आहे हे पत्रिकेचे १२ वे स्थान आहे आणि इथे राहू चे १८ महिन्यासाठी असलेले वास्तव्य थोड़े खर्चीक पडू शकते आपल्याला. माझ्या मते खर्च होणार तर पैसा येणार म्हणून होणार तर हे पॉसिटीव्ह समजा.

१२ वे स्थान हे व्ययाचे (मायनस) चे , गुंतवणुकीचे, मोक्षाचे आहे. ह्या तीन विषयात आपण गुंतून राहाल पुढे १८ महिन्यात.

जसे जर मिथुन राशी आणि लग्न वाले काही बिझिनेस मन असतील तर अधिकाधिक गुंवतणूक करण्यासाठी उत्सुक राहतील. आपला पैसा कुठेतरी गुंतवावा असे त्यांना वाटेल, हा एक उत्तम निर्णय असू शकतो तुमच्या हिमतीचा पण जरा जपून करावे. राहू ज्या स्थानात असतो त्याची लालच सुद्धा लावतो हा. पण तुम्ही गुंतवणूक करावी कारण जर काहीच केले नाही तर तसेहि तो काही दुसरे मायनस करू शकतो.

राहू ची ७ वी दृष्टी हि परीकेत जिथे ८ लिहिले आहे त्या पत्रिकेच्या रोग स्थानावर येत आहे. ह्या स्थानावरून रोग, जॉब, कर्ज, शत्रू, कॉम्पिटिशन , तुम्ही इतरांना देणारी सर्व्हिस पाहतात. राहू ज्या स्थानावर नजर टाकतो त्या स्थानावरील विषयांत तो व्यक्तीला धावपळीत ठेवेल.

ह्यासाठी मिथुन लग्न आणि मिथुन राशीच्या व्यक्तींना त्यांच्या वयोमानानुसार ती ती फळे पुढील १८ महिन्यासाठी मिळतील विषय हे वरील असू शकतील.

उदाहरण जर जॉब असेल तर आधीच्या जॉब मध्ये काही तरी चेंजेस दिसतील. किंवा एखादा जॉब सोडून दुसरा करावा लागेल. ह्या १८ महिन्यात आपण दिलेल्या सर्व सर्व्हिसेस मध्ये आपल्याला फार मेहनत करावी लागेल .

कॉम्पिटिशन मध्ये आपण अग्रेसर असाल. कर्जातून बाहेर पडता येणार नाही किंवा नवीन कर्ज घ्यावे लागेल. रोग संबंधित काही शारीरिक पीडा ह्या अपचन किंवा पोटाच्या असू शकतील. किंवा त्वचा बाबतीत सुद्धा हे दिसेल. ज्यांना डोळ्याचे त्रास झाले आहेत त्यांना ह्या १८ महिन्यांत जास्त ट्रीटमेंट करावी लागेल खास डावा डोळा. ८ नंबर हि मंगळाची शत्रू राशी आहे म्हणून वरील विषयात आपल्याला थोडे जपावे लागेल.

राहू ची ९ वी दृष्टी

राहू ची ९ वी दृष्टी पत्रिकेत अष्टम स्थानावर आहे जिथे १० लिहिले आहे हि शनीची मकर राशी आहे.
ह्या स्थावर राहूची दृष्टी अचानक काही पैशासंबधित मोठे व्यवहार करावे लागतील. जे काही प्रॉपर्टीज बद्दल असू शकतील.

ह्या राहूच्या दृष्टीने छोट्या मोठ्या अपघातापासून सावध राहावे. हे जन्म पत्रिकेतील ह्या स्थानाचा मालक शनी जिथे असेल त्यावरून जास्त चांगले समजेल.

राहू ची ५ वी दृष्टी

राहू ची ५ वी दृष्टी आपल्या स्वतःच्या कन्या राशीवर ६ नंबर वर आहे जिथून मातृ सुख आणि प्रॉपर्टीज चे विषय आणि पर्सनल सुखे पहिली जातात. ह्यामुळे पुढील १८ महिन्यांत ह्या विषयी काही घडामोडी घडू शकतात. हे विषय घडले तर एकच लक्षात असू द्यात कि निर्णय घेताना कोणतीही घाई नको. सावकाश निर्णय घ्यावे लागतील. मातृ सुखाबद्दल चांगले रिझल्ट मिळणार नाहीत म्हणून काही वेळी मातृ स्थानाला किंवा मातृ सुखाला मुकावे लागेल.

केतू हा ६ व्या स्थानी मंगळाच्या वृश्चिक राशीत आहे. जिथे ८ लिहिले आहे. ज्यांचा जॉब सुटला असेल त्यांना बरीच मेहनत ह्या १८ महिन्यांत करावी लागेल. एकतर जॉब लांब असेल किंवा जवळ असेल तर त्यात २ वेळा तरी बदल दिसतील.

केतू ची ७ वी दृष्टी हि जिथे राहू आहे वृषभ राशीवर २ नंबर वर येत आहे. त्यामुळे कदाचित आपल्याला अचानक काही अशा आजारांसाठी पैसा खर्च करावा लागेल जे आजार मागच्या १८ महिन्यांत होते ते निर्णय झटपट घ्यावे लागतील.

केतू ची ९ वी दृष्टी हि धन स्थान आणि कुटुंब स्थानावर येत आहे जिथे ४ लिहिले आहे. त्यामुळे मनाच्या राशीवर जर केतूची दृष्टी असेल तर सतत मन धन आणि कुटुंबाची चिंता वाढवत राहील आणि धनाबद्दल चे अचानक निर्णय घ्यावे लागतील.

केतू ची ५ वी दृष्टी कर्म स्थानावर जिथे १२ लिहिले आहे म्हणून पुढील १८ महिन्यांत करिअर साठीची विशेष धावपळ दिसण्यात येईल. जे एकाच ठिकाणी बरीच वर्षे आहेत त्यांच्या कामात किंवा जागेबद्दल ट्रान्सफर होऊ शकते.

एकंदरीत हे मिथुन राशीचे राहू केतुचे भ्रमण आपल्याला पैसा देणारच पण तो कुटूंब, आजार आणि कर्म ह्यासाठी खर्च होण्याची जास्त शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा खालील उपाय करत राहावेत.

उपाय

  • सर्व मिथुन राशी आणि मिथुन लग्न वाल्यानी रोज एकदा गणेश अथर्वशीर्ष जरूर वाचावे.
  • पर्स मध्ये मोराचे पीस ठेवावे.
  • रात्री झोपताना स्वतःच्या उशीखाली हिरव्या कपड्यात एक मुठी बडीशोप ठेवावी. (कव्हर मध्ये घालून ठेवली तरी चालेल खराब झाल्यास बुधवारी बदलत राहावी)
  • हिरवा चारा गायीला बुधवारी देत राहावा.
  • आणि किन्नर ला बुधवारी जमेल तेव्हढी मदत करत राहावी.

ज्या मुला मुलींच्या पत्रिकेत शुक्र किंवा राहू महादशा असेल आणि शुक्र मंगळाच्या राशीत किंवा वृषभ राशीत असेल तर अशा मुलांवर जास्त लक्ष द्यावे.

नोट — वरील सर्व आपली जन्मपत्रिका न पाहता आणि इतर सर्व ग्रहांची स्थिती न पाहता एक विवेचन आहे अधिक शुक्ष्मता हि आपली स्वतःची पत्रिका सांगू शकेल एखाद्या तद्न्य ज्योतिषाकडून. तेव्हा हे सर्व मिथुन राशीच्या आणि मिथुन लग्नाच्या पत्रिकेवरील कॉमन भाकीत समजावे हि विनंती.

धन्यवाद…..!

Leave a Reply