You are currently viewing वृषभ राशी/ लग्न : राहू परिवर्तन ३० ऑक्टोबर २०२३ ते १८ मे २०२५

वृषभ राशी/ लग्न : राहू परिवर्तन ३० ऑक्टोबर २०२३ ते १८ मे २०२५

राहू-केतू राशी परिवर्तन : ३० ऑक्टोबर २०२३ ते १८ मे २०२५

राहू चे १८ महिन्याचे मीन राशीतून जे भ्रमण होत आहे त्याचे टाइम टेबल वरील लिंक मध्ये वाचून घ्या.

वृषभ राशी आणि लग्न साठी हे मीन राशीतून होणारे भ्रमण पुढे देत आहे.

जर आपली राशी वृषभ असेल किंवा आपली राशी दुसरी कोणतीही असेल पण जर आपले लग्न वृषभ असेल तर खाली दिलेले विवेचन हे आपल्यासाठी आहे.

वर दिलेली कुंडली इमेज हि वृषभ राशी किंवा वृषभ लग्नाची आहे. जर आपली वृषभ राशी नसली तरी जर वृषभ लग्न असेल तर आपली लग्न कुंडली हि अशी असू शकेल.

नोट — मी इथे चांगले आणि वाईट दोन्ही बाजू मांडेन. आपल्याला राशी कुंडली आणि लग्न कुंडली दोन्ही चेक करावी लागेल. ह्यासाठी आपली राशी कोणती आणि आपले लग्न कोणते हे आपणास माहित हवे. आपण दोन्ही पोस्ट वाचल्यानंतर (आपले लग्न आणि आपली राशी) जर राशी कुंडलीत आणि लग्न कुंडलीत एखादा विषय हा दोन्ही ठिकाणी चांगला असेल तर ती गोष्ट पॉसिटीव्ह समजावी आणि दोन्ही ठिकाणी वाईट असेल तर काळजी घ्यावी लागेल. तरी सुद्धा आपल्या मूळ कुंडलीत राहू जिथे जन्माच्या वेळी आहे ते पाहूनच फायनल डिसिजन घ्यावे हि विनंती. जे विषय इथे मांडण्यात येतील त्या घटना घडण्यासाठी आपली परिस्थिती आणि आपले वय त्यास सूट होत असतील तरच त्या घडतील नाहीतर घडणार नाही.

नोट — २५/३/२००५ ते १२/१०/२००५ ह्या कालावधीत राहु १८ वर्षापूर्वी मीन राशीतून भ्रमण करत होता त्यावेळी शनी कर्क राशीतून भ्रमण करत होता — राहू ची ७ वि दृष्टी ज्या स्थानावर येत होती तिथेच शनी आपली ३ री दृष्टी टाकत होता. आणि ते स्थान ५ वे स्थान होते जिथे शनी आणि राहू दोघे एकदम पाहत होते त्या स्थानाला. २५/३/२००५ पासून च्या १८ महिन्याच्या कालावधीत वृषभ राशी आणि वृषभ लग्नाला ५ व्या स्थानावरून संतान, बौद्धिक पातळीची कामे, बौद्धिक कौशल्य, शिक्षण व्यवस्था, खेळ, एन्जॉयमेंट, प्रेम, प्रेम देणे घेणे – ह्यातील एक तरी विषय खूप चांगला किंवा खूप वाईट गेलाच असेल आठवून पहा. आणि शक्य झाले तर कॉमेंट करा.

आता पुढे …….चांगले चांगले काय होईल ते पाहू

दिनांक ३० ऑक्टोबर २०२३ ते १८ मे २०२५ पर्यंत राहू मीन राशीत आहे आणि आपल्या वृषभ राशी कुंडलीत किंवा वृषभ लग्न कुंडलीत मीन राशी हि कुंडलीच्या ११ व्या (लाभ स्थानी येत आहे) हे स्थान इच्छापूर्तीचे, इनकमिंग चे, आणि लाभाचे (प्रॉफिट मार्जिन) चे आहे. ह्यात जेव्हा १८ महिन्यासाठी राहू येत आहे तेव्हा हे विषय आपल्या समोर असू शकतील. मागील काही महिन्यात ज्या इच्छा पेंडिंग असतील त्यांना हा विषय सुटू शकेल.
वृषभ राशी किंवा वृषभ लग्नाच्या व्यक्तींना ह्या कालावधीत अनेक संधी प्राप्त होतील त्यात आपण आपल्या इच्छा पूर्ण करण्याकरिता अति अग्रेसिव्ह असतील. आपणास त्यात लाभ सुद्धा होइल. मात्र आपण जरा सांभाळून सुद्धा राहणे आवश्यक आहे कारण इथे राहू जास्त मोठ्या मोठ्या इमेज आपल्या समोर टाकेल आणि आपल्या हद्दीत नसलेल्या मोठ्या मोठ्या इच्छा तो आपल्या मनात टाकू शकतो हे केव्हा होईल जेव्हा आपल्या जन्म पत्रिकेत जन्माचा राहू चांगला नसेल पण तरी सुद्धा जर आपण कंट्रोल केलात तरी काही नुकसान होणार नाही

राहूची ३ ऱ्या स्थानावर ५ वि दृष्टी

राहू वरील दिलेल्या कालावधीत मीन राशीत असताना कुंडली इमेज मध्ये दाखविल्याप्रमाणे तिथून तो तिसऱ्या स्थानाला पाहणार आहे. म्हणजे जिथे ४ नंबर लिहिले आहे. म्हणजे हे स्थान आता आपले ऍक्टिव्हेट राहू करणार. चांगले असे होईल कि ह्या स्थानाबद्दलचे जे जे विषय असतील जे आधी पेंडिंग होते ते सर्व सुटतील. जसे ह्या स्थानाचे विषय — पराक्रम करून दाखविणे, एखाद्या विषयात खूप धावपळ करून सक्सेस होणे, एखाद्या प्रॉपर्टीची विक्री करणे, एका शहरातून दुसऱ्या दुसऱ्या शहरात सतत जाणे, जास्त समाजाशी कम्युनिकेट (सोशिअल) होणे , लहान भावंडे हे विषय आपल्यासमोर नक्की येतील. आणि त्यात काही इशू असतील तर हिरहिरीने सोडवाल सुद्धा.

राहु ची ५ व्या स्थानवार ७ वी दृस्टि

कुंडली इमेज मध्ये पहा राहु ११ व्या स्थानातून ५ व्या स्थानवार आपली ७ वी दृस्टि देत आहे जिथे ६ नंबर लिहिले आहे ज्या स्थानावरून पत्रिकेत बर्थ चाईल्ड, कन्सिव्ह , संततीचे सर्व विषय, बौद्धिक क्षमता, खेळ प्रेम (प्रेम देणे घेणे) पाहतात. ह्यापैकी एकतरी विषय आपल्या आयुष्यात ह्या १८ महिन्यात होणार हे नक्की. ज्यांना आधीच कुणावर प्रेम झाले आहे त्यात ते आता अति अग्रेसिव्ह होतील. पण जास्त रिऍक्ट होऊ नका तेथे केतू हा प्रेमाचे कटिंग करू शकतो जर तुमच्या जन्म पत्रिकेत केतू चांगला नसेल तर प्रेमात त्रास होईल. एखाद्या नवीन प्रेमात पडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही पण ते पुढे २ वर्षापर्यंत चालेल असे नाही तेव्हा सांभाळून. ज्यांना आधीच संतती ला जन्म देण्याचा विषय असेल त्यात ते आता अति धावपळ करतील. पण त्याच ठिकाणी केतू हा काही मेडिकल प्रोसेस करूनच देईल. ज्या विद्यार्थ्यांचे विद्यालयीन शिक्षण असेल त्यातील एखादा विषय सोडून देऊन सिस्टिम च्या बाहेरील विषयाच्या अभ्यासाची ओढ निर्माण करेल.

राहू ची ७ व्या स्थानावर ९ वी दृष्टी

कुंडली इमेज मध्ये राहू जिथे आहे तिथून तो पत्रिकेतील सप्तम स्थानावर दृष्टी टाकत आहे. वृषभ राशी किंवा वृषभ लग्नाच्या व्यक्तींसाठी पुढील १८ महिने हे ह्या स्थानावरील घटनांचा जास्तीत जास्त परिणाम दिसू शकतो ह्याचे कारण कि ह्या स्थानावर शनी सुद्धा दशम (कर्म) स्थानातून सप्तम स्थानावर १० वी दृष्टी देत आहे. दोन दोन पाप ग्रह जर एकाच स्थानावर ठराविक कालावधीसाठी ऍक्टिव्ह असतील तर त्याचे परिणाम हे बोल्ड दिसून येतात.
पत्रिकेत सप्तम स्थानावरून वैवाहिक सुख, विवाह च्या बाबतीत असलेले सर्व प्रश्न, वैवाहिक पार्टनर, बिझिनेस मधील पार्टनशीप, रोज मिळणारा पैसा, व्यापार ह्या सर्व गोष्टी पहिल्या जातात.

मागील २०२१-२२-२३ ऑक्टोबर पर्यंत जे जे वरील विषय आपल्याबद्दल वैवाहिक सुखाचे पेंडिंग आहेत ते क्लिअर होण्यास आपण प्रयत्न करून त्यात सक्सेस मिळवाल. उदारणार्थ – जर कुणाचे लग्न होत नसेल तर आता होण्यास हरकत नाही. खास करून ज्यांचा प्रेम विवाह होणे आहे त्यांना हा कालावधी फार फार महत्वाचा असेल. ज्यांचा डिवोर्स पेंडिंग असेल त्यांनी आता प्रयत्न करण्यास हरकत नाही.
ज्या व्यक्ती बिझिनेस मध्ये आधीपासून काही पार्टेर्शीप करीत आहेत त्यांना हा विषय आता जास्त रंग आणेल चांगला किंवा वाईट हे आपल्या मूळ पत्रिकेच्या राहू केतू आणि शनी वर अवलंबून असेल. पण जे जे विषय आपल्या जीवनात पुढील १८ महिने ह्या स्थानावरून येणार आहेत ते विषय आपणास फायदा किंवा तोटा हे नक्की देणार आणि ते विषय आपल्यासमोर असणार हे नक्की. काही जणांना इथे व्यापार करावासा वाटेल हे सुद्धा तितकेच खरे कारण रोज मिळणारा अधिक पैसा हे मिळविण्याची संधी उपलब्ध करून देणार आहेत लाभातून राहू आणि कर्म स्थानातून शनी.
वरील दिलेले विषय वैवाहिक सुखातले जर आपल्याकडे नसतील आणि सर्व व्यवस्थित चालले असेल तरी खूप काळजी घ्यावी कारण इथे दोन दोन पापग्रह ऍक्टिव्हेट होणार आहेत.
ज्या मुलामुलींच्या पत्रिकेत विधुर योग विधवा योग आहे त्यांनी वरील उपाय जरूर करावा जर आधीपासून आपल्या पार्टनर च्या तब्येतीत काही इशू असतील तर कारण हे एक मारक स्थान आहे आणि त्या स्थानावर राहू शनी ची दृष्टी आहे. जास्त काळजी करू नये सरळ देवी उपासनेत राहावे जर आपल्याकडे असा विषय असेल तर.

वरील सर्व बॅलन्स करण्यासाठी उपाय — आपण वृषभ राशीचे आहात किंवा वृषभ लग्नाचे आहात म्हणून राहू आणि शनी हे आपणास पूर्ण लाईफ साठी जास्त ऍक्टिव्हेट चांगल्या गोष्टीने करतील हे नक्की. पण जर आपल्या पत्रिकेत ह्याची स्थिती उत्तम नसेल आणि वरील सर्व विषय हे आपणास कठीण वाटत असतील तर त्यासाठी शिव उपासना हा एक मार्ग खूप चांगला असेल. ओम सोम सोमाय नमः हा मंत्र नॉर्थ वेस्ट फेसिंग करून रोज ५/१० मिनिटे किंवा सोमवारी ५ माळा जाप करावा. आणि मंगळवारी/शुक्रवारी दुर्गा चालीसा, किंवा देवी कवच किंवा कोणत्याही देवीचे स्तोत्र हे आपणास ह्यातून नक्की बाहेर काढण्यास मदत करेल.

एक लक्षात घ्या कि राहू वृषभ राशी आणि वृषभ लग्नाच्या व्यक्तींना हे १८ महिने खूप पॉसिटीव्ह आहे तेव्हा ज्या ज्या समस्या आपल्या वरील स्थानांच्या असतील त्या सोडवायला घ्या नक्की फायदा होईल.

जर एकदम आपल्या स्वतःच्या जन्मपत्रिकेवरून ह्या राहूचे १८ महिन्याचे फळ जाणून घ्यायचे असेल तर निष्णात ज्योतिषांची मदत जरूर घ्या.

धन्यवाद।
श्री दत्तगुरु ज्योतिष
९८२१८१७७६८
७५०६७३७५१९

Leave a Reply