You are currently viewing राहू केतू राशी परिवर्तन २०२०- ऋषभ राशी आणि वृषभ लग्न

राहू केतू राशी परिवर्तन २०२० खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आधी हे वाचून नंतर खालील आपल्या राशीचे आणि लग्न स्थानाचे फळ वाचावे हि विनंती.

राहुचा वृषभ राशीत आणि केतूचा वृश्चिक राशीत प्रवेश

https://shreedattagurujyotish.com/rahu-aani-ketu-bhraman-23-september-2020/
ऋषभ राशी आणि वृषभ लग्न
ज्यांची राशी वृषभ आहे त्यांची हि चंद्र कुंडली आहे आणि खालील राहू केतू चे भ्रमण ह्यावर केलेले विवेचन हे आपल्यासाठी आहे.
आणि ज्यांची कोणतीही राशी असली तरी आपली जर लग्न कुंडली वरील कुंडली प्रमाणे असेल जिथे २ ने सुरुवात होते तर खाली दिलेले विवेचन हे आपल्यासाठी आहे. तुमच्या मूळ लग्न कुंडलीत येथे राहू नसला तरी आणि असला तरी लग्न कुंडली अशीच असेल तरी हे लिखाण वाचून घ्यावे.

२३ सप्टेंबर २०२० ते पुढील १८ महिने वृषभ राशी ला राहूचे भ्रमण हे पत्रिकेच्या पहिल्या स्थानी आहे आणि केतू चे भ्रमण सातव्या स्थानी आहे.

पत्रिकेचे पहिले स्थान हे त्याचे स्वतःचे व्यक्तिमत्व असल्यामुळे जीवनातल्या सर्व ऍक्टिव्हिटीज येथून सुरु असतात. चंद्र कुंडलीत येथेच चंद्र असतो आणि चंद्रकुंडलीतल्या चंद्रावरून राहूचे भ्रमण हे मन सतत स्वतःला स्वतःच्या ऍक्टिव्हिटीज सतत प्रेझेन्ट करण्यासाठी धावेल हे पुढील १८ महिने दिसेल.

त्यात काही ऍक्टिव्हिटीज तुम्ही बिनधास्त कराल. ज्यात तुमचे धैर्य वाढेल सुद्धा. पण अति सावध राहा येथील राहू हा तुमच्यात अति भ्रामक कल्पना देऊ शकतो. त्यामुळे ज्यात आत्तापर्यंत तुम्ही तुमच्या स्वप्नांची वाट पाहत होतात त्यात काहीही करून पुढे जाण्याचा प्रयत्न कराल.

मग त्यासाठी काही परंपरा रूढी सुद्धा मोडाव्या लागल्या तरी चालतील असे होत राहील तुमच्या बरोबर. काही प्रमाणात हे सर्व करता तुमच्या आरोग्यात काही विशेष कुरबुरी दिसतील. त्यावर सुद्धा लक्ष ठेवणे कारण जर आधीचे काही आजार असतील तर त्यात काही निदान निघणार नाही. आणि त्या आजारांसाठी तुम्ही त्रस्त असाल पुढे १८ महिने तरी. जर काही आजाराचं नसेल तर तुम्ही जास्त स्ट्रॉंग सुद्धा ह्याच राहू मुळे असाल.

राहू ची ५ वी दृष्टी जिथे ६ लिहिले आहे त्या कन्या राशीवर आहे. हे पत्रिकेचे ५ वे स्थान आहे. पत्रिकेच्या ५ व्या स्थानावरून ज्ञान , संतती , शिक्षण ,प्रेम पहिले जाते.

अशा अवस्थेत पुढील १८ महिने वृषभ राशीच्या विद्यार्थाना थोडे कठीण जाणार आहे. ह्या १८ महिन्यात थोडी जास्त मेहनत घ्यावी लागेल. जेव्हा काही विद्यार्थी काही नवीन शिकण्याचा प्रयत्न करतील तेव्हा त्यांना आपले घर जन्मभूमी इथून दूर जावे लागेल.

आणि आपण जर विद्यार्थी नसाल तर आपल्या नोकरीच्या ठिकाणी आपली नको असलेल्या ठिकाणी ट्रान्सफर होऊ शकते. किंवा नवीन कामाची जबाबदारी पडेल.

आपण जर व्यवसाय करत असाल तर नवीन काही तरी करण्याची उत्सुकता भासू शकते. आणि त्यात यश मिळेल सुद्धा.

वृषभ राशीच्या पालकांना मुलांच्या बाबतीत काही निर्णय घ्यावे लागतील त्यांच्या शिक्षणाबद्दल किंवा करिअर बद्दल आणि ते निर्णय आत्तापर्यंत तुम्ही घेतलेले नसतील आणि वेगळे काही असतील तर तयार व्हा ते घेण्यासाठी नव्हे ते घ्यावेच लागतील.

प्रेमात असणाऱ्या वृषभ राशी आपले प्रेम सक्सेस करून दाखवतील आपल्या बुद्धी कौशल्यावर. त्यात ते अति उत्सुक होण्याचा संभव असेल पण काही वेळेला काही रिलेशन सुद्धा तोडावे लागत आहे असे दिसते.

ज्या वृषभ राशीच्या स्त्रिया ह्या सध्या माता बनण्यास जात आहेत आणि त्याचे ५ महिने झाले नसतील तर अशाना जास्त जपावे लागेल.
६ महिने आणि त्यापेक्षा जास्त असतील तरी खास काळजी घ्यावी.

चंद्र कुंडलीत आणि वृषभ राशीच्या लग्न कुंडलीत राहू ची ७ वी दृष्टी

जिथे ८ लिहिले आहे तिथे मंगळाची वृश्चिक राशी आहे आणि त्यात केतू आहे.

७ वे स्थान हे विवाह सुखाचे स्थान असते आणि डेली वेजेस इथूनच पहिले जातात, आणि बिझिनेस पार्टनर चे स्थान सुद्धा हेच असते. वरील विषय हे फार थोडे अवघड जातीत त्या त्या वृषभ राशीच्या वैवाहिक सुखात किंवा जर तुम्ही काही व्यवसायिक असाल तर. कारण इथे केतू सुद्धा आहे.

तुमच्या पत्रिकेत पहिल्या स्थानाला जिथे २ लिहिले. जिथून तुम्ही स्वतः आहात तिथे ७ व्या दृष्टीने
जिथे ४ लिहिले आहे पत्रिकेचे धावपळीचे स्थान जिथे आधीच चंद्राची कर्क राशी आहे तिथे ९ व्या दृष्टीने जिथे १२ लिहिले आहे त्या ठिकाणी गुरु ची राशी आहे ते लाभ स्थान प्रॉफिट चे स्थान आहे त्यावर ५ व्या दृष्टीने पाहत आहे.

म्हणून वैवाहिक जीवनात आणि कोणत्याही प्रॉफिट साठी खास व्यवसायात सावध राहा. ह्या केतुमुळे काही दगाफटका होऊ शकतो ह्या १८ महिन्यात. पण हे जर आधीच्या १८ महिन्यात विषय असतील तर होतील नाहीतर नाही.

राहू ची ९ वी दृष्टी भाग्यस्थानावर

राहू ची ९ वी दृष्टी हि भाग्य स्थानावर येत आहे आहे. म्हणून ह्या पुढील १८ महिन्यात तुम्ही भाग्योदय होण्यासाठी काही तरी नक्की कराल. भाग्योदय म्हणजे हेल्थ , शिक्षण , करिअर , विवाह , संतती, आणि प्रॉपर्टीज.

वृषभ राशींना ह्याआधी ह्यापैकी काही गोष्टीत अडथळा आला असेल तर तुम्ही स्वतः ऍक्टिव्हेट होऊन वरील विषयात जे जे राहिले असेल ते आपल्या भाग्य उजळण्यासाठी प्रयत्न कराल.

उदारणार्थ — जर एखाद्या वृषभ राशीला संतान झाली नसेल मागील ५/१० वर्षांपासून आणि ती प्रयत्न करत असेल तर ती IVF IVI करून नवीन कोणत्या तरी मार्गाचा अवलंब करून आपली स्वप्ने पूर्ण करेल नक्की आणि त्यात तिला यश मिळेल.

करिअर मध्ये सुद्धा असेच समजावे कि जर करिअर होताना ह्याआधी तुम्हाला काही जमले नसेल तर नवीन काही तरी करण्याचा प्रयत्न कराल तुम्ही जे तुमच्या साच्यात परंपरेत रूढीत नसेल असे.

काही वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी सल्ला कि जसे दिसते तसे नसते ह्याची प्रचिती तुम्हाला ह्या १८ महिन्यात दिसू शकते त्यासाठी एकदम हुरळून गेलात तर समजा हा राहू आपल्या डोक्यात शिरला आहे. मग तो तुम्हाला खूप खार्चिक ठेऊ शकतो. काही वेळी तो तुम्हाला रिलेशन मध्ये कटुता आणू शकतो, मानसिक त्रास देऊ शकतो. काळजी घ्यावी. पैसा मिळेल त्यासाठी ह्या राशीच्या लोकांनी अजिबात काळजी करू नये पण आपल्या शकलेने तो पैसा योग्य ठिकाणी लागणार नाही ह्याची भीती आहे.

वृषभ राशींच्या काही मुलीमुले ह्या पुढील १८ महिन्यात लग्न करत असतील आणि त्यांचे लग्न रूढी परंपरा रीती रिवाज ह्याने झाले असेल तर हा राहू पुढील १८ महिन्यासाठी त्रासाचा असू शकतो. पण ह्यासाठी मूळ जन्म पत्रिका योग्य रित्या चेक करून घ्यावी ज्याने पुढे किती वेळ हा त्रास असेल हे कळेल. किंवा काहीच त्रास होणार देखील नाही जर तिथे राहू ची पोजिशन उत्तम असेल तर.

उपाय

राहू केतू साठी काही उपाय देत आहे ते पुढील १८ महिन्यासाठी असतील.

  • प्रत्येक सोमवारी शिव पिंडीवर दूध पाण्याने अभिषेक करावा. मानसिक शांती लाभेल.
  • बुधवारी विद्यार्थ्यांनी सरस्वती वंदना जरूर म्हणावी ह्याने बुद्धी भरकटणार नाही ह्या विद्यार्थी दशेत सर्व वृषभ राशींनी ह्या १८ महिन्यात रोज अंघोळीच्या पाण्यात एक दोन थेम्ब गोमूत्र टाकावे आणि अंघोळ करावी. आणि गणेशाला दुर्वा घालावा.

नोट — वरील सर्व आपली जन्मपत्रिका न पाहता आणि इतर सर्व ग्रहांची स्थिती न पाहता एक विवेचन आहे अधिक शुक्ष्मता हि आपली स्वतःची पत्रिका सांगू शकेल एखाद्या तद्न्य ज्योतिषाकडून. तेव्हा हे सर्व वृषभ राशीच्या आणि वृषभ लग्नाच्या पत्रिकेवरील कॉमन भाकीत समजावे हि विनंती.

धन्यवाद…..!

This Post Has One Comment

  1. Jayashri Nalawade

    It’s very best 👌 👍 information

Leave a Reply