राहू केतू राशी परिवर्तन २०२० खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आधी हे वाचून नंतर खालील आपल्या राशीचे आणि लग्न स्थानाचे फळ वाचावे हि विनंती.
राहुचा वृषभ राशीत आणि केतूचा वृश्चिक राशीत प्रवेश
https://shreedattagurujyotish.com/rahu-aani-ketu-bhraman-23-september-2020/
२३ सप्टेंबर २०२० ते पुढील १८ महिने कुंभ राशी आणि कुंभ लग्नाला राहूचे भ्रमण हे पत्रिकेच्या चतुर्थ स्थानी (पत्रिकेचे ४ थे स्थान) आहे जिथे ऋषभ राशी आहे क्रमांक २ आणि केतू चे भ्रमण दशम स्थानी आहे जिथे ८ वृश्चिक राशी आहे.
राहू आपल्या पत्रिकेत जिथे २ लिहिले आहे ते पत्रिकेचे चतुर्थ स्थान आहे आणि ह्यावरून मातृ सुख, प्रॉपर्टीज, पर्सनल सुख, वाहन सुख पाहतात. वरील विषय हे पुढील १८ महिने आपल्यासमोर येऊ शकतील.
जसे आईच्या सुखात काही त्रास होऊ शकतात किंवा आई साठी काही धावपळी निर्माण होतील. प्रॉपर्टीज घेण्याचे विचार जास्त असू शकतील त्यात डेरिंग करत असाल तर सावधान कारण जसे दिसेल तसे न मिळण्याचे जास्त संकेत आहेत.
वाहन सुखात व्यत्यय आहेत आणि पर्सनल सुखासाठी थोडी काळजी वाटेल. पण ह्या सर्व गोष्टीत तुम्ही काही तरी नवीन करत असाल तर काही होणार नाही खास अशा गोष्टी कि तुम्ही आत्तापर्यंत आईजवळ होतात आणि घरात होतात आणि आता घरापासून दूर जात असाल तर जास्त त्रास नाही हे लक्षात घ्या.
लहान मुलांच्या प्राथमिक शिक्षणात इथे अडथळे येऊ शकतील ज्या पालकांची राशी लग्न पत्रिका अशी असेल.
Table of Contents
राहू ची ७ वी दृष्टी
राहू ची ७ वी दृष्टी कर्म स्थानावर येत आहे. जिथे ८ नंबर वृश्चिक राशी आहे आणि केतू सुद्धा त्या स्थानी आहे. करिअरच्या बाबतीत तुम्ही निर्णय घेण्यास घाई करू शकता कारण काही करिअर मार्गात धावपळी होऊन तुम्हाला तसे करावे लागेल.
इथे अजिबात घाई करू नये हा सल्ला. पत्रिकेत मंगळाची स्थिती पाहून निर्णय घ्यावा. जर तुम्ही व्यवसायिक असाल तर बऱ्याच संधी चालून येतील वेळ पुरणार नाही कर्म करण्यासाठी आणि तुम्ही काही अंशी कन्फयुज्ड व्हाल.
हे करताना घरातील काही सुखांची काळजी लागू शकते त्यात काही विषय रंगू शकतील.
पण घरापासून दूर असाल तर त्यात न्यूनता कमीपणा असेल जास्त समस्येला तोंड द्यावे लागणार नाही.
राहू ची ९ वी दृष्टी
राहू ची ९ वी दृष्टी जिथे शनी ची मकर राशी १० नंबर आहे तिथे येत आहे. हे स्थान शैय्या सुखाचे , परदेशात राहण्याचे, मोक्षाचे, गुंतवणुकीचे असल्यामुळे ह्या विषयी पुढील गोष्टीत तुम्ही ऍक्टिव्ह राहाल.
झोप कमी होईल आपली पुढील १८ महिन्यात, जर आपण व्यापारी असाल तर गुंतवणूक कराल आणि त्यासाठी जास्त मेहनत करण्याची तयारी ठेवाल. अध्यात्मिक असाल तर त्यापासून दूर होण्याचे संकेत दिसतील. किंवा कमी होईल. ज्या व्यक्ती परदेश गमन करण्यास इच्छुक असतील त्यांचे काम होईल.
राहू ची ५ वी दृष्टी
राहू ची ५ वी दृष्टी अष्टमावर येत आहे जिथे ६ लिहिले आहे. ज्यांचे काही ऑपेरेशन पुढे ढकलले असेल तर ह्या वेळेत होण्याचा संभव आहे. असे नसेल तर छोट्या मोठ्या अपघातांना जपून राहा पण त्यात तुमचे खूप कमी नुकसान होईल.
कोणते एखादे क्लेम मिळायचे बाकी राहिले असेल तर ते ह्या पुढील १८ महिन्यात मिळेल.
काही अचानक पैसा मिळण्याचे संकेत असतील. किंवा त्यात ऍक्टिव्हेट व्हाल.
केतू आणि केतूच्या दृष्ट्या
केतू आपल्या पत्रिकेत कर्म स्थानी आहे जिथे मंगळाची वृश्चिक राशी ८ नंबर आहे. त्यामुळे करिअर मध्ये जास्त बिझी राहाल. त्यासाठी चारी ठिकाणी धावपळ करण्यासाठी प्रवृत्त व्हाल. इथे राहू च्या ७ व्या दृष्टीपर्यन्तची वरील फळे सारखी मिळतील.
केतूची ५ वी दृष्टी धन स्थानावर कुटुंब स्थानावर १२ नंबर वर येत आहे. त्यामुळे घरात कोणी आजारी असेल तर त्यासाठी पैसा खर्च होऊ शकतो. किंवा कुटुंबासाठी पैसा खर्च होण्याचे संकेत दिसतात. जर आपल्या घरात धनु आणि मीन राशीच्या व्यक्ती असतील तर खास तुम्हाला तसे दिसू शकते. पण इथे पैसा मिळेल काळजी नाही.
केतू ची ९ वी दृष्टी जिथे ४ नंबर ची कर्क राशी चंद्राची आहे तिथे येते. तुम्ही इतरांना जी सर्व्हिस देत आहात त्यात जास्त मेहनत दिसेल.
जर आपण जॉब करत असाल तर काही त्रास इथे होण्याचे संकेत असतील. सांभाळून निर्णय घ्यावा लागेल. बदली ट्रान्सफर दिसेल काही जणांना. जर आपण स्त्रिया असाल कुंभ राशी आणि कुंभ लग्नाच्या तर घरातील काही जबाबदाऱ्या येतील त्यामुळे काही करिअर आणि जॉब सोडू शकण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण सध्या ह्या १८ महिने निर्णय घेऊ नका असा सल्ला देण्यात येतो.
उपाय
कुंभ लग्न आणि राशीच्या व्यक्तींना खालील उपाय देतो ते पुढील १८ महिने करावेत
- शिव उपासना जास्तीत जास्त पॉसिटीव्ह रहाल. (अभिषेक आणि मंत्र जप)
- प्रत्येक शनिवारी पिंपळाला जल घालावे अणि राईच्या तेलाचा दिवा लावावा.
- मुंग्याना साखर पीठ एक चमचा कोणत्याही झाडाच्या आजूबाजूला घालावे मुळात (खोड) घालु नये.
नोट : वरील सर्व आपली जन्मपत्रिका न पाहता आणि इतर सर्व ग्रहांची स्थिती न पाहता एक विवेचन आहे अधिक शुक्ष्मता हि आपली स्वतःची पत्रिका सांगू शकेल एखाद्या तद्न्य ज्योतिषाकडून. तेव्हा हे सर्व कुंभ राशीच्या आणि कुंभ लग्नाच्या पत्रिकेवरील कॉमन भाकीत समजावे हि विनंती.
धन्यवाद…..!