You are currently viewing सिंह राशी/ लग्न — राहू परिवर्तन ३० ऑक्टोबर २०२३ ते १८ मे २०२५

सिंह राशी/ लग्न — राहू परिवर्तन ३० ऑक्टोबर २०२३ ते १८ मे २०२५

राहू-केतू राशी परिवर्तन : ३० ऑक्टोबर २०२३ ते १८ मे २०२५

राहू चे १८ महिन्याचे मीन राशीतून जे भ्रमण होत आहे त्याचे टाइम टेबल वरील लिंक मध्ये वाचून घ्या.

सिंह राशी आणि सिंह लग्न साठी हे मीन राशीतून होणारे भ्रमण पुढे देत आहे.

जर आपली राशी सिंह असेल किंवा आपली राशी दुसरी कोणतीही असेल पण जर आपले लग्न सिंह असेल तर खाली दिलेले विवेचन हे आपल्यासाठी आहे.

वर दिलेली कुंडली इमेज हि सिंह राशी किंवा सिंह लग्नाची आहे. जर आपली सिंह राशी नसली तरी जर सिंह लग्न असेल तर आपली लग्न कुंडली हि अशी असू शकेल.

नोट — मी इथे चांगले आणि वाईट दोन्ही बाजू मांडेन. आपल्याला राशी कुंडली आणि लग्न कुंडली दोन्ही चेक करावी लागेल. ह्यासाठी आपली राशी कोणती आणि आपले लग्न कोणते हे आपणास माहित हवे. आपण दोन्ही पोस्ट वाचल्यानंतर (आपले लग्न आणि आपली राशी) जर राशी कुंडलीत आणि लग्न कुंडलीत एखादा विषय हा दोन्ही ठिकाणी चांगला असेल तर ती गोष्ट पॉसिटीव्ह समजावी आणि दोन्ही ठिकाणी वाईट असेल तर काळजी घ्यावी लागेल. तरी सुद्धा आपल्या मूळ कुंडलीत राहू जिथे जन्माच्या वेळी आहे ते पाहूनच फायनल डिसिजन घ्यावे हि विनंती. जे विषय इथे मांडण्यात येतील त्या घटना घडण्यासाठी आपली परिस्थिती आणि आपले वय त्यास सूट होत असतील तरच त्या घडतील नाहीतर घडणार नाही.

नोट —– २५/३/२००५ ते १२/१०/२००५ ह्या कालावधीत राहु १८ वर्षापूर्वी मीन राशीतून भ्रमण करत होता त्यावेळी शनी कर्क राशीतून भ्रमण करत होता — राहू ची ७ वि दृष्टी ज्या स्थानावर येत होती तिथेच शनी आपली ३ री दृष्टी टाकत होता. आणि ते स्थान २ रे स्थान होते (जिथे जिथे ८ नंबर ची वृश्चिक राशी असेल आपल्या पत्रिकेत) शनी आणि राहू दोघे एकदम पाहत होते त्या स्थानाला. २५/३/२००५ पासून च्या १८ महिन्याच्या कालावधीत सिंह राशी आणि सिंह लग्नाला २ ऱ्या स्थानावरून – धन (पैसा), वाणी, कुटुंब, कुटुंबातील सर्व विषय आणि उजवा डोळा – ह्यातील एक तरी विषय खूप चांगला किंवा खूप वाईट गेलाच असेल आठवून पहा. शक्य झाले तर कॉमेंट करा.

आता पुढे …….ह्याचे परिणाम काय होईल ते पाहू

दिनांक ३० ऑक्टोबर २०२३ ते १८ मे २०२५ पर्यंत राहू मीन राशीत आहे आणि आपल्या सिंह राशी कुंडलीत किंवा सिंह लग्न कुंडलीत मीन राशी हि कुंडलीच्या ८ व्या (अष्टम) स्थानी येत आहे ह्या स्थानावरून आयुष्यातील सर्व प्रकारचे अचानक होणारे अपघात, पीडा पहिल्या जातात, इथूनच मृत्यू बद्दल (आयु) आकलन केले जाते, इथून कमी मेहनतीचा पैसा सुद्धा पहिला जातो, गूढ (गुप्त) गोष्टी बद्दल सर्व काही चेक केले जाते, वारसा हक्काने मिळणारे सर्व प्रकारचे लाभ, कमरेच्या खालील भागाचे रोग, गुप्तांग, आकस्मित धन, ऑपेरेशन आणि शारीरिक मानसिक सर्व प्रकारच्या व्यक्तीला होणाऱ्या पीडा चेक केल्या जातात.
ह्या ठिकाणी वरील कालावधीत इथे राहू येत आहे म्हणून जर हे वरील विषय आता ऍक्टिव्हेट होणार.
उदारणार्थ जर कुणाचे ऑपेरेशन पेंडिंग असेल तर त्यावर तो व्यक्ती आता अग्रेसिव्ह होईल, वारसा हक्काचे सर्व विषय आता पुढे येऊन राहू आपल्याला त्यात आपला हक्क मिळवून देण्याची ताकद देतो, राहू इथे गूढ ज्ञानाबद्दल आकर्षण निर्माण करेल जसे तंत्र मंत्र ह्या गोष्टीत व्यक्तीला आकर्षण जाणवेल, मूळव्याध, युरीन इन्फेकशन, सारखे आधी काही इशू असतील तर त्यावर लक्ष ठेवावे लागेल. अचानक धनलाभ होणाऱ्या मार्गात अग्रेसिव्ह होऊ शकता पण जरा जपून कारण इथून राहू बिना मेहनतीचा पैसा मिळविण्यासाठी व्यक्तीला अग्रेसिव्ह करतो.

राहूची १२ व्या स्थानावर ५ वी दृष्टी

राहू वरील दिलेल्या कालावधीत मीन राशीत असताना कुंडली इमेज मध्ये दाखविल्याप्रमाणे तिथून तो बाराव्या स्थानाला पाहणार आहे. म्हणजे जिथे ४ नंबर लिहिले आहे. म्हणजे हे स्थान आता आपले ऍक्टिव्हेट राहू करणार. चांगले असे होईल कि ह्या स्थानाबद्दलचे जे जे विषय असतील जे आधी पेंडिंग होते ते सर्व सुटतील. १२(व्यय स्थान) हे स्थान लॉसेस चे, परदेश गमन चे, गुंतवणुकीचे आहे.
परदेश गामांचे विषय आता सुटण्यासारखे असतील, करिअर मध्ये बाहेरील कंपन्यांकडून लाभ होतील, पैसा मिळेल, बाहेर जाऊन कुणाला नोकरी व्यवसाय करायचा असेल तर इथे हा कालावधी उत्तम समजावा, गुंतवणूक करताना मात्र सावधान राहावे. किती आणि कुठे करत आहोत ह्यावर लक्ष असू द्यात. जन्म स्थानातील कोणतीही गुंतवणूक इथे चांगले फळ देणार नाही.

राहु ची दुसऱ्या स्थानवार ७ वी दृस्टि

कुंडली इमेज मध्ये पहा राहु ८ व्या स्थानातून २ ऱ्या स्थानवार आपली ७ वी दृस्टि देत आहे जिथे ६ नंबर लिहिले आहे ज्या स्थानावरून धन (पैसा), वाणी, कुटुंब, कुटुंबातील सर्व विषय आणि उजवा डोळा पहिला जातो. राहू ची कुटुंब आणि पैसा ह्यावर आठव्या स्थानातून आलेली दृष्टी हि चांगली नव्हे. ह्या दोन्ही विषय आपणास त्रास होऊ शकेल. कुटुंबासाठी पैसा वाया जाण्याचा हा कालावधी आपणास जपून निर्णय घेण्यास सल्ला दिला जातो. कुटुंबापासून ज्या सिंह राशी आणि लग्नाच्या व्यक्तीत लांब असतील त्यांना हा त्रास कमी दिसेल. कुटुंब स्थानावर राहू ची दृष्टी असताना कुटुंबामध्ये वाणी वर सय्यम ठेवावा काही गोष्टी हाथाबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. वरील कालावधीत कुणाला पैसा उधार देऊ नये पुन्हा मिळण्याची शक्यता कमी आहे .

राहू ची ४ थ्या स्थानावर ९ वी दृष्टी

कुंडली इमेज मध्ये राहू जिथे आहे तिथून तो पत्रिकेतील चौथ्या स्थानावर दृष्टी टाकत आहे. सिंह राशी किंवा सिंह लग्नाच्या व्यक्तींसाठी पुढील १८ महिने हे ह्या स्थानावरील घटनांचा जास्तीत जास्त परिणाम दिसू शकतो.जिथे ८ नंबर लिहिले आहे ह्याच स्थानावर शनी ची १० वी दृष्टी सुद्धा येत आहे त्यामुळे अति सावधान. जे जे विषय खाली देत आहे त्या विषयी अति कष्ट होण्याचे नाकारता येत नाही. त्या विषयात जरी फायदा होत असेल तरी तो तात्पुरता होणार असेल कायम स्वरूपी नव्हे. ह्या स्थानातील विषय – घरातील वातावरण , मातृ सुख, जन्म स्थान, सर्व पर्सनल सुखे , प्रॉपर्टीज, वाहन.
आईच्या तब्येतीकडे किंवा तिच्याबरोबरच्या संबंधांवर नात्यावर लक्ष ठेवा. घरातील वातावरण बिघडणार नाही, प्रॉपर्टी मध्ये काही नुकसान होणार नाही ह्यावर सुद्धा लक्ष ठेवावे लागेल. इथे कोणत्याही आगीपासून आणि इलेकट्रीक उपकरणांमुळे घरातील नुकसान होणार नाही ह्याची काळजी घ्यावी. घराचे नवीन बांधकाम शक्यतो काढू नये. अडथळे नक्की. जुन्या घरातील टॉयलेट ह्या कालावधीत रिपेअर करण्याचा प्रयत्न करू नये शक्यतो टाळावे.

वरील सर्व बॅलन्स करण्यासाठी उपाय — आपण सिंह राशीचे आहात किंवा सिंह लग्नाचे आहात तर एक गोष्ट लक्षात असू द्यात आपल्या मूळ जन्म पत्रिकेत राहू ची स्तिथी कितीही चांगली असली तरी राहू आपल्या राशीच्या मालकाला म्हणजे सूर्याला नेहमी ग्रहण लावतो त्यामुळे फायद्यापेक्षा नुकसान अधिकच समजावे लागते त्यामुळे आपण जर सिंह राशीचे असाल तर कोणत्याही प्रकारची सूर्य उपासना, गायत्री मंत्र करावे लागेल आणि जर आपण सिंह लग्नाचे असाल तर गौ सेवा भरपूर कारवाई लागेल आपल्या मानसन्मानासाठी.
सिंह राशी आणि लग्न व्यक्तींनी गहू आणि गूळ प्रत्येक रविवारी गायीला देत जावे हा एक उत्तम उपाय असू शकेल. ह्या कालावधीत रविवारी मिठाचे दिवस सेवन करू नये निदान ६ महिने तरी करून पाहावे.

धन्यवाद।
श्री दत्तगुरु ज्योतिष
९८२१८१७७६८
७५०६७३७५१९

Leave a Reply