नृप योग कसा होतो
कुंडलीत कोणतेही ३ ग्रह स्वराशीचे किंवा उच्च असतील किंवा कुंडलीत कोणतेही ३ किंवा त्यापेक्षा अधिक ग्रह दिगबली होऊन बसले असतील किंवा दशम स्थानी ३ किंवा त्यापेक्षा अधिक ग्रह असतील तर नृप योग होतो.
हे पाहण्यासाठी खाली दिलेली माहिती उपयोगात आणू शकता.
स्वराशी ग्रह कसे पाहावे
- रवी ५ नंबर च्या सिंह राशीत
- चंद्र ४ नंबर च्या कर्क राशीत
- मंगळ १ किंवा ८ नंबर च्या मेष किंवा वृश्चिक राशीत
- बुध ३ किंवा ६ नंबर च्या मिथुन किंवा कन्या राशीत
- गुरु ९ किंवा १२ नंबर च्या धनु किंवा मीन राशीत
- शुक्र २ किंवा ७ नंबर च्या वृषभ किंवा तुला राशीत
- शनी १० किंवा ११ नंबर च्या मकर किंवा कुंभ राशीत असतील तर आपल्या पत्रिकेत हे ग्रह कोठेही लिहिले असू देत ते स्वराशीचे आहेत.
हेही वाचा :- जेल योग कसा बनतो पत्रिकेत ?
उच्च राशीतील ग्रह कसे पाहावे
- रवी मेष राशीत १ नंबर बरोबर लिहिला असेल
- चंद्र वृषभ राशीत २ नंबर
- मंगळ मकर राशीत १० नंबर
- बुध कन्या राशीत १ ते १५ डिग्री ६ नंबर मध्ये
- गुरु कर्क राशीत ४ नंबर बरोबर
- शुक्र मीन राशीत
- शनी तुला राशीत
- राहू मिथुनेत ३ नंबर
- आणि केतू धनु राशीत ९ नंबर
- तर वरील ग्रह त्या त्या राशीत उच्च असतील
दिगबली ग्रह कसे ओळखावे?
- प्रथम स्थानात गुरु किंवा बुध असेल
- चतुर्थ स्थानी शुक्र किंवा चंद्र असेल
- सप्तम स्थानी शनी असेल
- दशम स्थानी रवी किंवा मंगळ असेल
वरील सर्व ग्रह त्याच स्थानात हवेत मग तिथे कोणत्याही राशी नंबर बरोबर लिहिले असतील तरी काही फरक पडत नाही.
नृप योगाची फळे
असा व्यक्ती सामाजिक क्षेत्रात खूप प्रगती करतो. राजकारणात त्याला मानसन्मान मिळतो. आयुष्यात खूप प्रगती करतो.
धन्यवाद…..!