You are currently viewing जेल योग कसा बनतो पत्रिकेत?

काही वेळा आपल्या चुकांमुळे किंवा सामाजिक क्षेत्री काम करत असल्यामुळे सुद्धा काही व्यक्ती / नेत्यांना सुद्धा (कारावास) जेल योग होतो.

 • राहू १२ व्या स्थानी असेल
 • किंवा १२ व्या भावाच्या मालकाबरोबर राहू पत्रिकेत कोठेही बसला असेल आणि १२ व्या भावाचा मालक बलवान नसेल तर
 • किंवा राहू ची दृष्टी १२ व्या स्थानावर येत असेल तर जेल योग होतो.
 • गोचरीने राहू आपल्या पत्रिकेत १२ व्या स्थानातून जरी जात असेल तरी १८ महिने सांभाळावे.

हे जरी योग असले आणि पत्रिकेत लग्न आणि सूर्य बलवान असले तरी जेल योग होता होता थांबेल.

सहज समजण्यासाठी खाली दिलेली माहिती आपणास वाचली पाहिजे.

जेल योग कुंडली
 • पॉईंट नंबर १

बारावे स्थान कुंडलीत दाखविले आहे.

 • पॉईंट नंबर २ साठी —

१२ व्या स्थानात जर १ किंवा ८ लिहिले असेल तर ह्या स्थानाचा मालक मंगळ आणि मंगळाबरोबर कोठेही राहू बसला असेल

१२ व्या स्थानात जर २ किंवा ७ लिहिले असेल तर ह्या स्थानाचा मालक शुक्र आणि शुक्राबरोबर कोठेही राहू बसला असेल

१२ व्या स्थानात जर ३ किंवा ६ असेल तर ह्या स्थानाचा मालक बुध आणि बुधाबरोबर राहू कोठेहि बसला असेल

१२ व्या स्थानात जर ४ असेल तर ह्या स्थानाचा मालक चंद्र आणि चंद्र बरोबर राहू कोठेहि बसला असेल

१२ व्या स्थानात जर ५ असेल तर ह्या स्थानाचा मालक रवी आणि रवी बरोबर राहू कोठेहि बसला असेल

१२ व्या स्थानात जर ९ किंवा १२ असेल तर ह्या स्थानाचा मालक गुरु आणि गुरु बरोबर राहू कोठेहि बसला असेल.

१२ व्या स्थानात जर १० किंवा ११ असेल तर ह्या स्थानाचा मालक शनी आणि शनी बरोबर राहू कोठेहि बसला असेल

१२ व्या स्थानात २/७/३/६ ह्या राशी असतील तर काही वेळी ह्या राशीत राहू असे रिझल्ट देणार नाही पण १/८/४/५/९/१२ ह्या राशीत राहू असेल तर योग होऊ शकेल.

हेही वाचा :- जाणून घ्या जीवनात पैसे केव्हा केव्हा मिळेल .

राहू दुसऱ्या स्थानी मुलींच्या पत्रिकेत

 • पॉईंट नंबर ३ साठी —

राहू ६ व्या स्थानी(षष्ठात) ८ व्या स्थानी (अष्टमात) ४थ्या स्थानी (चतुर्थ भावात) राहू असेल तर वरील योग होण्यास मदत होते.

नोट — ह्या योगसाठी सरळ वरील गोष्टींवर विश्वास ठेऊ नये आणि चिंता सुद्धा करू नये ह्यात ज्योतिषाची मदत लागेल आपणस पण योग एव्हढ्यासाठी दिला आहे कि १२ व्या स्थानात राहू असेल तर जरा सावधान राहा चुकीची कामे कधीच करू नका.
जर आपले लग्न (प्रथम स्थान ) ५/९/१२ नंबर चे असेल तर अति सावधान राहावे ह्यात राहू वरील योग देताना दिसतो.

धन्यवाद…..!

This Post Has 2 Comments

 1. Sarika

  What is the effect of 7 guru

 2. Sarika

  Good knowledge

Leave a Reply