You are currently viewing बुद्धादित्य योग : एक शुभ योग

बुद्धादित्य योगाची उत्तम फळे

बुद्धादित्य योग- बुध ग्रहाचा प्रभाव हा आपल्या वाणीवर बुद्धीवर होतो आणि रवी आपल्या पत्रिकेत ऊर्जा देतो ह्या दोन्ही ग्रहांची युती पत्रिकेत होत असेल तर व्यक्ती यशस्वी प्रतापी उर्जावान, कार्य करण्यास निर्णय घेण्यास उत्तम असतो, स्वावलंबी बनतो, व्यवसायी आणि कायद्याचे ज्ञान असलेला अभिनय कला ह्यात निपुण होतो.

ह्या योगात व्यक्तीला आयुष्यभर दैनंदिन गरजांची (अन्न वस्त्र निवारा) काळजी नसते. ह्यात वाणीचा प्रभाव उत्तम होतो आणि व्यक्तीला प्रसिद्धी मिळते.

कसा बनेल हा योग

अवकाशात बुध हा ग्रह सूर्यापासून २७ डिग्री पासून दूर जातच नाही. तो नेहमी सूर्याच्या जवळच असतो. त्यामुळे सर्वांच्या पत्रिकेत बुध आणि रवी एकत्र किंवा बुध हा ग्रह रवीच्या मागील किंवा पुढील स्थानात लिहिलेला असतो.

जर पत्रिकेत कोणत्याही स्थानात बुध आणि रवी हे एकत्र असतील आणि रवीच्या डिग्री पासून बुधाची डिग्री १२ पेक्षा जास्त अंतरावर असेल तर हा योग फलित होतो आणि ह्यालाच बुद्धादित्य योग असे म्हणतात.

डिग्री चे उदाहरण — समजा आपल्या पत्रिकेत सूर्याची ५ डिग्री असेल आणि बुध २२ डिग्री वर असेल तर २२-५ = १७ डिग्री चे अंतर असेल म्हणून हा योग बुद्धादित्य योग होईल.

काही ठिकाणी बुध आणि रवी एकत्र म्हणजे डिग्री चे अंतर न पाहता सुद्धा असतील तरी त्याला बुद्धादित्य योग होतो असे म्हटले गेले आहे. ते सुद्धा बरोबर आहे पण ह्यात गोष्टी फलीत होण्यास उशीर लागू शकतो किंवा त्यात अति मेहनत करून फळ मिळते असे माझे मत आहे.

बुद्धादित्य योगाची स्थानागत फळे

जर हा योग दुसऱ्या (द्वितीय) भावात झाला तर ह्या योगाची फळे थोडी सुरुवातीला पारिवारिक क्लेश देतात, वाणीला थोडा कठोरपणा येतो किंवा व्यक्ती कुटुंबासाठी थोडा हैराण होऊ शकतो मात्र नंतर त्यास ह्या योगातील फळे मिळतात हे नक्की.

  • केंद्र स्थानात (प्रथम चतुर्थ सप्तम दशम) ह्या ठिकाणी ह्या योगाची उत्तम फळे मिळतात
  • लाभ स्थानात सुद्धा हा योग उत्तम मानला गेला आहे
  • षष्ठ स्थानात हा योग असेल तर व्यक्ती आपल्या सर्व्हिस ने प्रसिद्धीला येतो
  • पंचम स्थानात असेल तर व्यक्ती आपल्याकडे असलेल्या स्किल ने प्रसिद्ध होतो.
  • अष्टम स्थानात सुद्धा ह्या योगाची फळे व्यक्तीला मिळतात पण त्यावर पाप ग्रहाची दृष्टी अजिबात नको. अशाने व्यक्तीला फार पीडा सहन करून व्यक्ती नंतर ह्या योगाची चांगली फळे उपभोगतो.

कोणत्याही स्थितीत जरी हा योग असला तरी व्यक्तीला त्याची फळे रवी किंवा बुधाच्या महादशेत, अंतर्दशेत (बुध मध्ये रवी किंवा रवी मध्ये बुध) किंवा प्रत्यंतर दशेत मिळतातच. तेव्हा जर आपल्या पत्रिकेत हा योग असेल तर योग्य ज्योतिषांकडून हा योग केव्हा आणि किती प्रमाणात फलित होणार आहे ह्याची टक्केवारी काढून त्या वेळेला उत्तम उर्जावान बनून आपले हित साधा असा साल देण्यात येतो.

धन्यवाद…..!

Leave a Reply