You are currently viewing सर्प माळा योग : एक अपमानित योग

काही व्यक्ती त्यांच्या जीवनात खूप मेहनत करतात पण त्यांना यश येत नाही का तर कुंडलीत सर्प माळा योग असतो. ज्या स्थानापासून हा दोष बनतो त्या स्थानातून व्यक्ती सतत हैराण असतो. ह्यात लग्न कुंडलीत त्या स्थानाला असे दिसते कि त्या स्थानाच्या गळ्यात सापाची माळा आहे.

कुंडलीत केंद्र स्थाने — प्रथम स्थान , चतुर्थ स्थान , सप्तम स्थान , दशम स्थान हि केंद्र स्थाने आहेत
पाप ग्रह — शनी, रवी, मंगळ (ह्यात राहू केतू चा विचार केला जात नाही)

वरील कोणत्याही स्थानापासून ४थ्या — ७ व्या — आणि १० व्या स्थानी जर एक एक पापग्रह लिहिले असतील तर ज्या स्थानापासून हा सर्प योग होतो त्या स्थानाची जी जी फळे मिळतील ती व्यक्तीला फार त्रासदायक असतात.

१) उदाहरण — जर प्रथम स्थानापासून ४थ्या — ७ व्या — आणि १० व्या स्थानी एक एक पापग्रह लिहिले असतील तर प्रथम स्थान हे व्यक्तीचे लग्न स्थान आहे त्याच्या देहाचे त्याच्या ऍक्टिव्हिटीचे हे स्थान आहे त्यामुळे तो जिथे जिथे आपले प्रेसेंटेशन करेल त्यात त्याला यश येणार नाही किंवा अशा व्यक्तीला आपली प्रत्येक ऍक्टिव्हिटी करण्यासाठी त्रास होईल. किंवा व्यक्ती सतत निगेटिव्हिटी चा सामना करेल.—–कुंडली क्रमांक १ पहा.

२) उदाहरण — जर हा योग ४थ्या स्थानापासून असाच झाला असेल तर प्रॉपर्टीज चे सुख आईचे सुख घरातील सुख , पर्सनल सुख ह्यात कमी पण येईल. जनमानसात अशा व्यक्ती कधीही ओळखल्या जात नाहीत.

३) उदाहरण — जर हा योग ७ व्या स्थानापासून असाच झाला असेल तर व्यक्तीला वैवाहिक सुख उत्तम मिळत नाही खूप त्रास होतात.
सातव्या स्थानाची फळे हि व्यापारांसाठी रोज येणारा पैसा आणि पार्टनरशिप असते म्हणून इथेही त्यांना बराच सामना करावा लागेल. कुंडली क्रमांक ३ पहा.

४) उदाहरण — जर हा योग १० व्या स्थानापासून असाच झाला असेल तर व्यक्तीला कर्म स्थानी खूप त्रास होतील. करिअर करता येणार नाही. वडिलांचे प्रेम मिळणे कठीण होईल. किंवा वडिलांना त्रास होईल.

वरील सर्प माळा योग हा केंद्र स्थानातून पाहण्याची पद्धत आहे पण जर हाच योग प्रत्येक स्थानातून सुद्धा पाहिला जातो.

  • द्वितीय स्थानापासून जर ४थ्या, ७व्या आणि १० व्या स्थानी एक एक पापग्रह लिहिले असतील तर धन आणि कुटुंबाचे सुख ह्यात व्यक्ती हैराण होतो. इथे पूर्वजीत संपत्ती एकतर नसेल किंवा असेल तर मिळणार नाही कुंडली क्रमांक २ पहा
  • तृतीय स्थानापासून जर ४थ्या, ७व्या आणि १० व्या स्थानी एक एक पापग्रह लिहिले असतील तर व्यक्ती दिन दिन भटकतो त्याला भावंडांचे सुख मिळताना कठीण होते.
  • पंचम स्थानापासून जर ४थ्या, ७व्या आणि १० व्या स्थानी एक एक पापग्रह लिहिले असतील तर संतान सुख, विद्या सुख मिळताना कठीण होते. किंवा कुणाचे प्रेम सहज मिळत नाही किंवा कुणावर प्रेम केले तर त्याला रिटर्न गिफ्ट मिळताना कठीण होईल.
  • षष्ठ स्थानापासून जर ४थ्या, ७व्या आणि १० व्या स्थानी एक एक पापग्रह लिहिले असतील तर आपली सर्व्हिस कुणालाही देताना त्या व्यक्तीला त्रास होतील, कर्जाने व्यक्ती हैराण राहील किंवा हेल्थ चे इशू फार होतील रोगांशी असा व्यक्ती सतत हैराण होऊ शकतो.
  • अष्टम स्थानापासून जर ४थ्या, ७व्या आणि १० व्या स्थानी एक एक पापग्रह लिहिले असतील तर अपघात किंवा अचानक परिस्थितीत वाईट बदल होतील आणि जीवनात सतत पीडा सहन करावी लागेल. खूप मेहनत करूनच पैसे मिळतील. कोणताही आयता पैसा मिळणार नाही किंवा तो कामी येणार नाही. इथे सुद्धा पूर्वजीत संपत्ती एकतर नसेल किंवा असेल तर मिळणार नाही
  • नवम स्थानापासून जर ४थ्या, ७व्या आणि १० व्या स्थानी एक एक पापग्रह लिहिले असतील तर व्यक्ती भाग्योदयासाठी सतत हैराण असेल. लक साथ देणार नाही मेहनत व्यक्तीच्या जीवनात एकतरी गोष्ट मिळत नाही जसे आरोग्य, शिक्षण, करिअर, विवाह, संतान. (ह्या भाग्योदयाच्या ५ गोष्टी आहेत)
  • एकादश स्थान (लाभ) स्थानापासून जर ४थ्या, ७व्या आणि १० व्या स्थानी एक एक पापग्रह लिहिले असतील तर प्रत्येक प्रकाच्या इच्छेसाठी खूप कष्ट करावे लागतील काही इच्छा आयुष्यात अपूर्णच असतील. प्रत्यके प्रकारचा लाभ मिळविण्यासाठी कष्ट फार होतील. इथे सुद्धा संतान सुखाला बाधा होते.
  • द्वादश स्थानापासून जर ४थ्या, ७व्या आणि १० व्या स्थानी एक एक पापग्रह लिहिले असतील तर व्यक्तीला बंधन योग होईल. सतत कायद्याच्या कचाट्यात अडकेल. जन्मस्थानापासून दूर गेला तरी हैराण होईल. गुंतवणूक दिसणार नाही. बँक बॅलन्स सेफ नसेल.

नोट — हा सर्प माळा योग म्हणजे कालसर्प दोष किंवा राहू ने होणार सर्प दोष नाही. हा फक्त सर्प माळा योग आहे.
इथे कोणताही पापग्रह जरी उच्च राशीत सुस्थितीत असला तरी त्या व्यक्तीला त्या स्थानची सुखे प्राप्त करता येतील पण ज्या स्थानापासून हा योग बनला असेल त्या स्थानाची सुखे मिळताना कठीण होतील.

उपाय — ज्या स्थानापासून हा दोष बनेल त्या स्थानातल्या राशीचा मंत्र जप करूनच ह्याचे निराकरण करता येते.

सल्ला — जर असा दोष आपल्या पत्रिकेत असेल तर आपण योग्य ज्योतिषांचा सल्ला नक्की घ्यावा.

धन्यवाद…..!

Leave a Reply