कधीच मुलांच्या डोक्यावर कर्ज ठेऊन न जाणारा ज्योतिष योग– (12TH HOUSE MANGAL’S -LOAN PART FOR JYOTISH YOGA)

वर दिलेली हि लग्न कुंडली आहे. जिथे मंगळ लिहिला आहे जर आपल्या लग्न कुंडलीत मंगळ इथे असेल तर हा मंगळ आपण असे पर्यंत आपले सर्व कर्ज फेडून जाल मागे इतरांना ते फेडावे लागणार नाही. हे नक्की.
पण हाच मंगळ तुम्ही असे पर्यंत स्वतःला कधीच सेविंग करता येत नाही. बँकेत सेविंग अकाउंट वर पैसेच दिसत नाहीत. डिपॉझिट चे सर्व स्वप्न तो भंग करतो. आपल्या मोठ्या गुंतवणुकी ब्रेक करू शकतो. सावधान डेबिट जास्त वेळा आणि क्रेडिट कमी वेळा दाखवितो. ह्याच मंगळाची ७ वि दृष्टी कर्ज स्थानावर असते म्हणून तो सतत कर्जात सुद्धा ठेवतो.
वरील सर्व परिस्थिती पाहता सल्ला असा देण्यात येतो कि जर आपण गेल्यावर अगोदर सर्व कर्ज फेडून जाणार आहोत तर जगेपर्यंत कर्जाचे हप्तेच भरा ना. आणि आपले सेविंग्स खाली करत राहा. आपल्या फायनान्स चा ट्रॅक चेंज करा आणि आनंद घ्या.
मोठे कर्ज काढा आणि फेडत राहा. कोणत्याही मोठ्या डिपॉझिट आपल्या स्वतःच्या नावावर ठेऊ नका. असेट्स जास्त करू नका कारण इथे तुम्हाला तुमच्या नावाने काही जमापुंजी करण्याचे योग नाहीत समजून घ्या म्हणून कधीही स्वतःचे एकट्या नावावर अकॉउंट खोलू नका. स्वतःच्याच नावावर प्रॉपर्टी घेऊ नका जॉईंट ठेवा कुणालातरी. येथील मंगळ म्हणजे तुम्ही मांगलिक आहात पण हा विषय इथे त्याचा संबंध मांडत नाही.
ह्याच मंगळामुळे भौम दोष होतो ज्याने भावंडांचे किंवा भावंडं सुख कमी करेल किंवा भावकी पासून लाभ मिळत नाही. म्हणून ज्योतिष उपाय जर करायचाच असेल तर प्रत्येक मंगळवारी एक किंवा तीन बेलाची पाने घ्यावीत आणि त्याच्या सरळ बाजूवर चंदन पावडर आणि गंगाजल मिक्स करून अनामिका बोटाने ॐ भौमाय नमः असे एक एक शब्द प्रत्यकी तीन पानावर लिहावा आणि ती बाजू शिव पिंडीवर ठेवावी आणि ठेवताना सुद्धा वरील मंत्र म्हणत ठेवावे. असे प्रत्येक मंगळवारी सतत ३ वर्षे करावे. हा दोष जाण्यास मदत होते. आणि खास करून लग्नाच्या अगोदर हे केले तर उत्तम असते कारण वैवाहिक सुखात पैशाचे व्यवहार हाच मंगळ हैराण करून ठेवतो.
धन्यवाद…..!