Table of Contents
कसा होतो सुनफा योग- Sunafa Yog
चंद्राने हा योग तयार होतो. — जन्मकुंडलीत चंद्र कुठेही लिहिला असू देत त्याच्या पुढील स्थानात सूर्याला सोडून कोणताही ग्रह बसला असेल गुरु शुक्र बुध मंगळ तर सुनफा योग होतो. इथे राहू केतू धरू नयेत.
सुनफा योगाची फळे
हा योग एक राजयोग आहे. जरी व्यक्तीच्या जीवनात कितीही कष्ट असले तरी त्याच्या चेहऱ्यावर एक समाधान असते. कोणतेही कष्ट तो स्वतः दाखवीत नाही.
अनफा योग- Anafa Yog
आपल्या कुंडलीत चंद्र जिथे लिहिला असेल त्या चंद्राच्या मागील स्थानात सूर्य सोडून कोणताही एक ग्रह लिहिला असेल तर अनफा योग होतो. इथे सुद्धा राहू केतू ला मान्यता नाही.
अनफा योगाची फळे
हा सुद्धा एक राजयोग असेल. असा व्यक्ती सुखद जीवन जगतो. आपल्या जीवनात त्याला यशाची प्राप्ती होते आणि तो जीवनाला लागणाऱ्या सर्व सुखद बाबी मिळवितो. पण त्याची फळे सुनफा योगा पेक्षा कमी असतील.
नियमाने असे असते कि चंद्राच्या मागे किंवा पुढे कोणताही ग्रह बसला नसेल आणि चंद्राला कोणत्याही शुभ ग्रहाची दृष्टी नसेल तर केमद्रुम योग होतो. म्हणून वरील दोन्ही योगात सुनफा आणि अनफा योगात केमद्रुम योगाचे खंडन होते म्हणून हा एक राजयोग मानला जातो.
राजयोग ह्याचा अर्थ इथे राजा होत नाही एक सुखद जीवन संपन्न जीवन जगणे म्हणजे मानसिक समाधान असणे एव्हढेच.
एका सामान्य व्यक्तीच्या पत्रिकेत सुद्धा असे योग होतात पण त्यांना त्यांच्या जीवनात त्या त्या वातावरणात तेव्हढेच थोडे वर येतात. लगेच राजा होण्यासारखा हा योग नव्हे.
धन्यवाद…..!