You are currently viewing जाणून घ्या २०२३ मध्ये कोणता विषय आपल्यासाठी सुखदुःखाचा असेल

जाणून घ्या २०२३ मध्ये कोणता विषय आपल्यासाठी सुखदुःखाचा असेल

प्रथम आपले वय सध्या कोणते सुरु आहे ते लिहा.

समजा १-११-१९७१ असेल तर २०२२-१९७१= ५१ वर्षे पूर्ण झाली आहेत आणि सध्याचे वय ५२ सुरु आहे.

ह्या सुरु असलेल्या वयाला ५२ ला आता १२ ने भाग द्या आणि भाग दिल्यावर जी संख्या उरते ती लिहा.
१२ X ४ = ४८ — ५२ मधून आता ४८ वजा करा उरलेली संख्या ४ येत आहे.
हा उरलेला ४ अंक खूप महत्वाचा आहे कारण ४ थ्या भावाच्या (4th HOUSE) बद्दल च्या सर्व घटना ह्या पत्रिकेत पहाव्या लागतील.

 • जर उरलेली संख्या १ असेल तर पत्रिकेच्या पहिल्या स्थानाची घटना घडेल. जी आपल्या नवीन कार्यासंबंधी असेल. स्वतःला हव्या असलेल्या आवडीच्या विषयी प्रेझेंट करण्याचा प्रयत्न कराल. ह्या वर्षी आपण आपल्या क्षेत्रात खूप धावपळ कराल. आत्तापर्यंत आपल्याला जे आपल्या इच्छेचे मिळत नव्हते ते मिळविण्याचा प्रयत्न कराल.
 • जर उरलेली संख्या २ असेल तर हा विषय आपल्या सर्व पैशासंबधित आणि कुटुंब संबंधित असेल.
 • जर उरलेली संख्या ३ असेल तर आपण हा विषय आपल्या पराक्रमा साठी खूप मेहनत करण्याचा काळ असेल. अति धावपळ दिसेल. लहान भावाचे विषय आपल्यासमोर असतील.
 • जर उरलेली संख्या ४ असेल तर हा विषय आपल्या मातृसुखाचा आणि आपल्या प्रॉपर्टी संबंधाचा होऊ शकेल.

हेही वाचा :- मोबाईल नूमरॉलॉजि: काय सांगतात आपल्या मोबाईल नंबर मधील अंक?

 • जर उरलेली संख्या ५ असेल तर हा विषय आपल्या संतानसुखाबद्दल आणि आपल्या स्किल बद्दल चा असू शकेल
 • जर उरलेली संख्या ६ असेल तर हा विषय आपल्या नोकरी, कर्ज, आजारपण, शत्रू, ह्याविषयी असू शकेल.
 • जर उरलेली संख्या ७ असेल तर हा विषय आपल्या वैवाहिक सुखाबद्दल चा असेल किंवा एखाद्या व्यपाराचा सुद्धा असू शकेल.
 • जर उरलेली संख्या ८ असेल तर हा विषय जरा कठीण दिसेल कारण इथे ८ वे स्थान ऍक्टिव्ह होईल. छोटे मोठे अपघात आणि यातना संबधित हे वर्ष असू शकेल तेव्हा काळजी घ्यावी.
 • जर उरलेली संख्या ९ असेल तर नवीन भाग्योदयासंबधित आपण खूप सिरियस असाल आणि ते होताना दिसेल सुद्धा. परदेश गमन सुद्धा विषय येण्याचा संभव असेल.
 • जर उरलेली संख्या १० असेल तर कार्यक्षेत्राचा विषय आपल्याला ऍक्टिव्ह ठेवू शकेल. आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व घटना चांगल्या किंवा वाईट ह्या वर्षी होऊ शकतील. वडिलांचा विषय सुद्धा असू शकेल.
 • जर उरलेली संख्या ११ असेल तर प्रत्येक प्रकाचे लाभ आणि आपल्या इच्छा पूर्ती हा विषय सतत आपल्या समोर असेल. मोठा भाऊ संबंधित विषय सुद्धा असू शकेल.
 • जर आलेली ० असेल तर १२ व्या स्थानाचे फळ इथे मिळेल परदेश गमन, किंवा खूप खर्चाचे विषय हे आपल्या समोर असतील. हॉस्पिटल चे विषय सुद्धा नाकारता येत नाहीत.

नोट १– इथे फक्त आपणास आपल्या सुरु असलेल्या वयाचा विचार केला आहे. जर २०२३ ला कोणत्याही महिन्यात आपले वय जे पूर्ण झाले असेल त्यास १२ ने भाग दिल्यावर ते विषय पुढे वर्षभर सुरु राहतील.
आता सध्या आपले किती वय सुरु आहे त्याचा विचार करा. नंतर जर फेब मध्ये किंवा पुढे कोणत्याही महिन्यात आपले वय बदलत असेल तर सुरु असलेल्या वयाचा विचार करा आपला अंक बदलेल.
समजा २०२३ च्या जून मध्ये कुणाचे वय ५२ सुरु असेल तर गणित करून ४ उरेल तेव्हा जून नंतर ४ अंकाचा प्रभाव असेल तो प्रभाव जून २०२४ पर्यंत असेल. त्या आधी ३ अंकाचा प्रभाव मानावा.

नोट २– इथे फक्त आपणास सुरु असलेल्या वयासंबधित विषय कळेल कि कोणत्या विषयीच्या घटना आपल्यासमोर असतील .
चांगल्या किंवा वाईट असतील हे त्या पत्रिकेत त्या स्थानाची ताकद पाहून ओळखता येईल कि त्या स्थानावरून आपणास आनंद किंवा दुःख मिळेल. म्हणून हा विषय ज्योतिषांसाठीचा असेल. योग्य मार्गदर्शन घेऊन हा विषय अधिक जाणून घेऊ शकता.
पण एव्हढे मात्र नक्की असेल कि विषय आलेल्या संख्येचाच असेल.

धन्यवाद…..!

This Post Has 2 Comments

 1. Varsha sagar kasurde

  Thank you

 2. Varsha sagar kasurde

  I want to know about my kundali

Leave a Reply