You are currently viewing आपले नाव आणि नूमरॉलॉजी

आपले नाव आणि नूमरॉलॉजी- NAME NUMEROLOGY

Chaldean numerology name calculator Chart
Chaldean numerology name calculator Chart

नूमरॉलॉजि मध्ये प्रथम मूलांक आणि भाग्यांक चेक होतो आणि त्यानंतर आपला घर क्रमांक, अकॉउंट नंबर, गाडी नंबर, मोबाइल नंबर चे विषय येतात. ह्या सर्वांची बेरीज जर आपल्या मूलांक आणि भाग्यांक चे मित्र अंक असतील तर हे सर्व अंक आपल्याला शुभत्व देत असतात.

तसेच अति महत्वाचे जे असते कि आपले जे नाव ठेवले आहे ते आपणास किती शुभ आहे. त्यात असलेल्या इंग्रजी स्पेलिंग ची एक अंकी संख्या आपल्या मूलांक आणि भाग्यांका ला जुळवून घेणारी आहे का. ह्यासाठी स्वतः तुम्ही सुद्धा पाहू शकाल कि जर आपल्या स्पेलिंग ची संख्या जर मूलांक आणि भाग्यांक ह्याच्याशी मेल करत नसेल तर जीवनात बरेच खड्डे समोर येत असतील. किंवा जर मेल करत असेल तर जीवन फार स्मूथ असेल.

ह्यासाठी वरील चालडीअन नूमरॉलॉजि (Chaldean Numerology Name Calculator Chart) चा वापर लोशू ग्रीड मध्ये वापरला जातो. ह्यावरून आपण आपल्या नावात असलेल्या इंग्रजी स्पेलिंग प्रमाणे आपले नाव कोणत्या एक अंकावर जात आहे ते सहज काढू शकता. किंवा ह्याचा उपयोग हा बाळाचे नाव ठेवण्यासाठी सुद्धा करू शकता.

उदाहरणार्थ — जर एखाद्या व्यक्तीचे नाव हे सुमित ओम शास्त्री असेल तर ते इंग्रजी मध्ये – SUMIT OM SHASTRI असे लिहत असेल. मग त्यातील एक एक अंकाची संख्या इथे लिहून काढायची आहे.

S U M E E T O M S H A S T R I

3 + 6 + 4 + 5 + 5 + 7 + 4 + 3 + 5 + 1 + 3 + 4 + 2 + 1

२३+११+१९=५३=८

ह्याचा अर्थ ह्या पूर्ण नावाची एक अंकी संख्या हि ८ येते. ( त्याला सुद्धा महत्व असते कि ती एक अंकी संख्या कोणत्या २ नंबर ने बनली आहे.

(जसे इथे ५३ ने ५ आणि ३ चे दोघांचे गुणधर्म मिळून ८ आलेली संख्या नक्की उत्तम किंवा वाईट हे नूमरॉलॉजिस्ट ठरवेल)
जर आपल्या मूलांक आणि भाग्यांक ला हा नेम नंबर तुमचा चालला तर अति उत्तम नाहीतर खूप इशू आपल्या जीवनामध्ये होत असतात.
हेच पती पत्नी च्या नावांमध्ये सुद्धा चेक केले जाते कि तिचे/त्याचे नाव आपल्यला किती शुभ आहे.

मूलांक आणि भाग्यांक ह्यांचे शत्रू मित्र पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. त्या टेबल वरून आपले नाव शत्रू आहि कि मित्र आहे ते कळेल.
https://shreedattagurujyotish.com/ankanche-shatru-mitra-aani-vishleshan-in-marathi/

काही वेळेस आपल्याला ज्या नावाने हाक मारली जाते ते सुद्धा पहिले जाते कि त्याची संख्या किती येते.
काही वेळेला फक्त पहिले नाव सुद्धा किती अंकावर येते हे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे.
काही वेळेस तुम्ही नेहमी व्यवहारात आपले नाव कसे लिहितात त्यावर सुद्धा असते. जसे कोण S O SHASTRI लिहीत असेल किंवा SUMIT O SHASTRI असे लिहीत असेल.
पण माझ्या मते संपूर्ण नावाची बेरीज करून आलेल्या संख्येला महत्त्व द्यावे कारण हेच आपल्या आधारकार्ड आणि कोणत्याही आपल्याला मिळणाऱ्या सर्टिफिकेट वर असते. पण तिन्ही अंगाने चेक करण्यास काही हरकत नाही .

माझे मत – जर ह्यात काही गडबड असेल तर नाव लगेच चेंज करू नये एकदा नुमरोलॉजिस्ट ची मदत नक्की घ्यावी. दुसरे असे कि खूप वर्षे जर एखादा व्यक्ती चुकीच्या नावाचा उपयोग करत असेल तरी अगोदर काही उपाय करून पाहावेत जे नूमरॉलॉजिस्ट देतात त्यानंतर त्यात बदल करावा. कारण कागोद्पत्री सर्व ठिकाणी हे फार किचकट काम आहे.

नूमरॉलॉजि मध्ये आपल्या नावाचे किती महत्व असते हे आपणास कळावे ह्यासाठी हा ब्लॉग लिहिला जात आहे.

कोणतीही शंका मनात न आणता आपण आधी सक्सेस होण्यासाठी पूर्ण प्रयत्न कराल हि अशा बाळगतो.

धन्यवाद…..!

Leave a Reply