You are currently viewing कुंडली नुमरॉलॉजि आणि वास्तू तिन्ही का बॅलन्स पाहिजेत

कुंडली नुमरॉलॉजि आणि वास्तू ह्या तिन्ही पैकी कोणत्या तरी एक किंवा दोन शास्त्रांची मदत घेऊन व्यक्ती आपल्या आयुष्यात काय काय घडेल किंवा घडत आहे ह्याबद्दल सर्व जाणून घेत असतात. (Importance of Kundali, Numerology And Vastu)

वरील पैकी एक विषय पाहताना माझे असे मत आहे कि कुंडली रिडींग, नुमरॉलॉजि रिडींग आणि त्याबरोबर वास्तू सुद्धा आपली चेक करून घ्यावी कारण त्यासाठी मी इथे एक गोष्ट आपणास देत आहे त्यावरून ह्या तिघांचे महत्व आपणास कळून चुकेल.

एक तरुण एका ज्योतिषाकडे जातो आणि माझ्या पत्रिकेत मर्सिडीस गाडी घेण्याचा योग आहे का हे विचारतो. लगेच पत्रिकेचे ४ थे स्थान किती मजबूत आहे हे पाहून ज्योतिषी लगेच सांगतात कि हो तुझ्या पत्रिकेत एक नाही चार चार मर्सिडीस घेण्याचा योग आहे. आणि त्यास ती घटना कधी घडेल हे सुद्धा सांगतो.

ज्योतिषाने दिलेल्या वेळेत त्या व्यक्तीकडे आधी दोन मर्सिडीस येतात म्हणून तो फार आनंदित असतो. पण त्याने ज्यावेळी हि वाहने घेतली होती त्या वेळी त्याचे नंबर्स कोणते आपणास मॅच होतील हे विचारलेच नाही. काही महिन्यांनी त्या दोन्ही मर्सिडीस अपघाताने ग्यारेज मध्ये जाऊन पडतात. कारण त्याचे नंबर्स त्याने चुकीचे घेतले होते जे त्याच्या जन्मतारखेला सूट होत नव्हते.

मग पुन्हा काही महिन्यांनी तो पुन्हा दोन मर्सिडीस घेतो ह्यावेळी तो अजिबात चूक करत नाही आणि तो नुमरॉलॉजिस्ट कडे जाऊन त्याच्या जन्मतारखेप्रमाणे त्या वाहनांचे नंबर्स घेतो. पण ह्यावेळी सुद्धा त्याला दुःख होते कारण काही महिन्यांनी त्याच्या दोन्ही मर्सिडीस ह्या चोरीला जातात.

ह्याचे एकमेव कारण म्हणजे त्याने जी वाहने आपल्या बंगल्यात उभी करायची व्यवस्था केली होती ती वास्तुनुसार अनुकूल नव्हती.

आपण ह्या गोष्टीचा विचार केलाच असेल कि फक्त कुंडली पाहून एखाद्या इव्हेंट्स चा आनंद घेताच येत नाही. त्यासाठी त्याच्याकडे असणाऱ्या प्रत्येक ग्रहांचा अंकांचा अणि त्याच्या वास्तूचा परिणाम त्याच्या आयुष्यात होतच असतो.

ह्यामुळे मला सुद्धा काही प्रमाणात फक्त कुंडल्या पाहून आलेल्या व्यक्तीला समाधानी करता येत नाही. शेवटी निर्णय त्या व्यक्तीचा असेल कि मी कोणत्या कोणत्या मार्गाचा अवलंब करावा ते.

कदाचित व्यक्ती असे सुद्धा म्हणेल कि काय काय चेक करायचे. त्याचे उत्तर माझ्याकडे सध्या तरी नाही. कारण शेवटी मेडिकल मध्ये सुद्धा सध्या रिपोर्ट पाहिल्याशिवाय डॉक्टर हात लावत नाहीत. तो जमाना गेला आता कि वैद्य नुसती नाडी पाहून माणसाचे रोग ओळखत होता आणि एखादा बाबा डोळे झाकून त्या व्यक्तीचे मागचे पुढचे सर्व सांगत होता.

इथे लोक सायन्स आणि लॉजिकशी प्रत्येक गोष्ट कनेक्ट करतात. म्हणून ऑकल्ट सायन्स मध्ये सुद्धा आम्हाला अलर्ट राहावे लागते एव्हढेच बाकी काही नाही.

हेही वाचा :=- निर्मिती वास्तुशात्राची

आपले नाव आणि नूमरॉलॉजी

धन्यवाद…..!

Leave a Reply