You are currently viewing केमद्रुम दोष I KEMDRUM DOSH

कसा बनेल केमद्रुम दोष?

केमद्रुम दोष- आपल्या लग्न कुंडलीत चंद्र कुठे आहे ते पहा. त्याच्या मागील आणि पुढील स्थानी कोणताही ग्रह नसेल तर हा दोष निर्माण होतो. ह्यात चंद्राच्या मागे किंवा पुढे राहू किंवा केतू किंवा सूर्य (रवी) असेल तरी त्याला घेऊ नये म्हणजे ती स्थाने चंद्राच्या मागे पुढे रिकामी समजावी.

काय फळ आहे केमद्रुम दोषाचे ?

अति मानसिक त्रास होण्याचा संभव, मोठे मोठे पत्रिकेतील राजयोग त्यांची चांगली फळे देताना दिसत नाहीत. मातृ पीडा किंवा मातृ स्थानातील पीडा ज्या स्थानी चंद्र असेल त्या स्थानाची फळे मिळताना कठीण किंवा वाईट मिळतील. हि सर्व सामान्य फळे दिली आहेत.
आरोग्य, धन, विद्या, वैवाहिक जीवन, संतान , समाजात मानसन्मान ह्या विषयी चे मानसिक समाधान मिळताना कठीण होते.

चंद्र हा मनाचा कारक आहे आणि चंद्रासारख्या ग्रहाला म्हणजे आपल्या मनाला कोणाचा तरी सपोर्ट किंवा धैर्य असणे आवश्यक होते. जरी शनी मंगळ चंद्रावर दृष्टीत असले तरी मग चालतील पण कोणाचा सपोर्ट किंवा चंद्राचा प्रभाव कोणत्याही ग्रहावर असणे म्हणजे तुम्ही स्वतः जीवनात बोर होणार नाही. नाहीतर एक बोर पर्सनॅलिटी घेऊन जीवन जगावे लागेल असे म्हणू शकतो.
अशा व्यक्ती जीवनात दुखी होऊ शकतात. श्रीमंत कुटुंबात जरी जन्म झाला असेल तरी जीवनात काही रस नसेल.

केमद्रुम दोष भंग कसा होईल?

वरील नियम जर आपल्या पत्रिकेत बसत असेल आणि चंद्रावर शुभ ग्रह किंवा माझ्या मते कोणताही ग्रह दृष्टी टाकत असेल तर हा दोष भंग समजावा. चंद्रापासून ४थ्या ७ व्या १० व्या स्थानी कोणताही ग्रह बसला असेल तरी हा दोष भंग होऊ शकतो. वरील दोन्ही नियमांत राहू केतू सूर्य घेऊ नये.

केमद्रुम दोष उपाय

प्रथम सामान्य उपाय पाहू

१) ह्या दोषात व्यक्ती एकटेपणा जास्त सहन करत असल्यामुळे असा सल्ला देण्यात येतो कि आपले सर्कल वाढवा. समाजात जास्तीत जास्त उठबस करा.
२) अति कोणत्या गोष्टींचा विचार करू नका.
३) स्वतःला उद्देशहीन बनवू नका. काहीतरी टार्गेट स्वतःसमोर ठेवून जीवन जगा.
४) कुणावर जास्त अवलंबून राहू नका. खास ह्यात मी आईची जास्त सर्विस घेण्यास सांगत नाही कारण तिला जास्त तुमचीच काळजी लागते ह्या दोषात हा एक तिच्या आयुष्याचा भोग होतो म्हणून तिला ह्या काळजी पासून मुक्त करा जास्तीत जास्त तिच्यापासून दूर जाऊन प्रगती करा तिथून तिची काळजी घ्या कोणत्याही स्वरूपात. (हा एक महत्वाचा उपाय समजा)
५) रोज योगा चा सराव मेडिटेशन करून मानसिक संतुलन राखण्याचा प्रयत्न करून फ्रेश राहा.

केमद्रुम दोष ज्योतिषीय उपाय

ह्या दोषात चंद्र हा पत्रिकेत निर्बली होतो त्यामुळे त्याला बलवान बनविण्यासाठी खालील लिंक वर आधीच ह्याच वेब वर माहिती दिली आहे ती अवश्य वाचून घ्या. त्यातच केमद्रुम दोषावर सुद्धा खास उपाय देण्यात आला आहे जो ज्योतिष शास्त्रात आधीपासूनच प्रचलित आहे.

https://shreedattagurujyotish.com/pournima-remedies/

धन्यवाद…..!

Leave a Reply