You are currently viewing कुहू योग I KUHU YOG

कसा होतो कुहू योग?

हा योग कुंडलीच्या ४ थ्या स्थानापासून होतो. ४ थ्या स्थानात जी राशी असेल त्या स्थानाचा मालक जर कुंडलीत ६ व्या, ८ व्या, किंवा १२ व्या स्थानात बसला असेल तर कुहू योग होतो.

४थ्या स्थानात १ किंवा ८ लिहिले असेल तर त्याचा मालक मंगळ हा ६/८/१२ व्या स्थानात असेल तर — कुंडली क्रमांक १
४थ्या स्थानात २ किंवा ७ लिहिले असेल तर त्याचा मालक शुक्र हा ६/८/१२ व्या स्थानात असेल तर — कुंडली क्रमांक २
४थ्या स्थानात ३ किंवा ६ लिहिले असेल तर त्याचा मालक बुध हा ६/८/१२ व्या स्थानात असेल तर — कुंडली क्रमांक ३
४थ्या स्थानात ४ असेल तर त्याचा मालक चंद्र हा ६/८/१२ व्या स्थानात असेल तर — कुंडली क्रमांक ४
४थ्या स्थानात ५ लिहिले असेल तर त्याचा मालक रवी हा ६/८/१२ व्या स्थानात असेल तर– कुंडली क्रमांक ५
४थ्या स्थानात ९ किंवा १२ लिहिले असेल तर त्याचा मालक गुरु हा ६/८/१२ व्या स्थानात असेल तर — कुंडली क्रमांक ६
४थ्या स्थानात १० किंवा ८ लिहिले असेल तर त्याचा मालक शनी हा ६/८/१२ व्या स्थानात असेल तर — कुंडली क्रमांक ७

महत्वाचे — जर ४थ्या स्थानाचा मालक ६/८/१२ स्थानात बसला असेल तर त्या ग्रहावर कुणाची दृष्टी आहे. तो युवा कुमार बाल वृद्ध मृत आहे का? त्याच्या डिग्री कशा आहेत? ते ग्रह कुणाबरोबर युती मध्ये आहेत का? ह्या सर्वांचा विचार करून आपल्याबरोबर वरील सर्व सुखाच्या घटना कशा घडणार आहेत हे का निष्णात ज्योतिषींच्या मार्गदर्शनाने समजून घ्यावे. त्यात कमी अधिक दाहकता दिसून येईल. पण वरील प्रमाणे ४थ्या स्थानाचे सुख मिळताना त्रास हा नक्कीच समजावा.

नोट — वर दिलेल्या लग्न कुंडल्यांत ४थ्या स्थानाचा मालक ६/८/१२ मध्ये काढून दाखविला आहे ह्या तिन्ही स्थानांपैकी जर कोणत्याही ग्रह आपल्या पत्रिकेशी जुळत असेल तर नक्की हा योग आपल्या पत्रिकेत आहे.

हेही वाचा :- राशी भाग्यवान योग

काय फळ आहे कुहू योगाचे?

कुंडलीतले ४ थे स्थान हे सुख स्थान म्हणून पाहिले जाते. कुंडलीतल्या ४थ्या स्थानावरून आईचे सुख, वाहन सुख, प्रॉपर्टीज चे सुख आणि इतर पर्सनल सुखे खास पहिली जातात.
आणि पत्रिकेचे ६ वे स्थान हे रोग स्थान असते, ८ वे स्थान पीडा देणारे असते, आणि १२ वे स्थान हे व्ययाचे म्हणजे मायनस चे किंवा खर्चाचे असते.

जर आपल्या पत्रिकेत वरील नियमाप्रमाणे जर ४ थ्या स्थानाचा मालक ६/८/१२ व्या स्थानात बसला असेल आणि कुहू योग होत असेल तर वरील ४थ्या स्थानाच्या सुखांमध्ये कमी पण येते.

ह्याचा अर्थ आपण पाहिले असेल कि व्यक्ती बराच पैसे कामवितो पण त्याचे स्वतःचे घर किंवा वाहन होतच नाही किंवा त्याच्याकडे असले तर तो त्याचा उपभोग करू शकत नाही. किंवा व्यक्तीला आईचे सुख मिळतच नाही किंवा आईला तो सुख देऊच शकत नाही. किंवा आई बरोबर त्याचे पटतच नाही.

व्यक्ती प्रत्येक सुख उपभोगताना त्याच्या पर्सनल जीवनात तो त्रस्त होताना दिसतो. ह्याला जबाबदार आपल्या पत्रिकेत असणारा कुहू योग होतो.

६ व्या स्थानात जर हा मालक लिहिला असेल तर व्यक्तीला वरील गोष्टींची नेहमी चिंता भासत असते तो त्याच्या काळजीतून कधीच बाहेर येत नाही.

८ व्या स्थानात जर हा मालक लिहिला असेल तर व्यक्तीला वरील गोष्टीं पासून सतत ची पीडा सहन करावी लागते. आणि ती त्याच्या समोर अचानक उध्दभवते. किंवा समोर अशा गोष्टी येतात कि तो त्या सहन करू शकत नाही.

१२ व्या स्थानात जर हा मालक लिहिला असेल तर व्यक्तीला वरील सर्व सुखाच्या गोष्टी सतत वजा होत आहेत त्याच्या जीवनातून असे वाटत असते. आणि तो ती तशीच ऍक्टिव्हिटी सतत करत सुद्धा असतो.

असा योग पत्रिकेत असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनातील शेवटचा काळ (म्हातारपण) कष्टाचे जाते. कोणत्या तरी कारणाने त्याला त्रास होतो.

धन्यवाद…..!

Leave a Reply