You are currently viewing पौर्णिमेचे – चंद्र स्ट्रॉंग करण्याचे उपाय

१)   मानसिक शांती, आनंद , उल्हास  मिळविण्यासाठी 

२)   पत्रिकेतील चंद्र स्ट्रॉंग करण्यासाठी  

३)   आईचे प्रेम मिळविण्यासाठी , आईला प्रेम देण्यासाठी 

४)   वास्तू चे सुख मिळविण्यासाठी ( पत्रिकेतील चतुर्थ स्थान स्ट्रॉंग करण्यासाठी)

५)   लक्ष्मी प्राप्तीसाठी   (अचल संपत्ती मिळविण्यासाठी टिकण्यासाठी)

६)   कोणत्याही असे आजार जे पाण्यापासून त्रासदायक असतील.

ह्या ६ गोष्टी तुमच्या पत्रिकेतील चंद्रा वर आणि त्याच्या डिग्रीवर अवलंबून असतात.

 • ० ते ५ डिग्री आणि २५ ते ३० डिग्री चंद्र
 • चंद्र नीच राशीत असेल तर
 • चंद्र + राहू = ग्रहण दोष 
 • चंद्र +  केतू = ग्रहण दोष 
 • चंद्र च्या मागे पुढे कोणताही ग्रह नसताना  केमद्रुम दोष 
 • चंद्र पत्रिकेत ८ व्या स्थानी , ६ व्या स्थानी , १२ व्या स्थानी  =चंद्र + शनी = विषयोंग 

वरील सर्व योगात व्यक्तीला वरील सर्व ६ गोष्टींत त्रास होतोच.

खालील उपाय हे सतत केल्याने ३ वर्षात पत्रिकेतील चंद्र स्ट्रॉंग होण्यास मदत होते.

चंद्र जर आपल्याला शुभ करायचा असेल तर प्रथम आई चा सन्मान ठेवा. 

>हेही वाचा :- रक्षाबंधन विशेष माहिती- ३ ऑगस्ट २०२०

चंद्र हा मनाचा कारक आहे म्हणून सर्वानी प्रत्येक पूर्णिमेला खालील एक उपाय जरूर करावा. हा उपाय घरात एकाने सुद्धा करून घेतला तरी चालतो त्या कुटुंबात सर्वाना त्याची फळे मिळतात.

 • प्रत्येक पूर्णिमेला चंद्राला भाताची खीर करून चांदीच्या वाटीत थंड करून पाणी सोडणे आणि प्रार्थना करणे २० मिनिट ते १ तास नंतर ती खीर घरात आणून स्वतः आणि घरातील सदस्यांना जेवणाबरोबर देणे , हा उपाय महिन्यातून एकदा करणे.
 • चांदीची अखंडित जॉईंट नसलेली रिंग करंगळीत घालणे पूर्णिमेला रात्री. 
 • चांदी च्या पेल्यातले साठवलेले पाणीच  दिवसभर पिणे.
 • चंद्राचे दर्शन करून रात्रीचे जेवण घेणे (अमावास्येच्या नंतरचे १५ दिवस पूर्णिमेपर्यंत फक्त) नंतर पूर्णिमेचा दिलेला खिरीचा उपाय करणे.
 • दूध आणि दुधाचे पदार्थ सोमवारी कधी कधी दान करत जाणे. 
 • सफेद चंदन पावडर सोमवारी अंघोळीच्या पाण्यात एक चिमटी टाकत राहाणे.
 • स्वतःजवळ एक चांदीचा चौकोन तुकडा पर्स मध्ये ठेवणे. 
 • एक चांदीची ठोस (भरलेली गोळी) सुद्धा स्वतःजवळ ठेवणे. 
 • चंद्रा जर मजबूत करायचा असेल तर अध्यात्मिक उपायांत तुम्ही रोज किंवा प्रत्येक सोमवारी शंकराला पाणी + दूध + चंदन पावडर टाकून अभिषेक करू शकता.
 • ह्यात जर चंद्रा समोर किंवा चंद्रा बरोबर शनी असेल किंवा शनी ची दृष्टी चंद्रावर असेल तर प्रत्येक सोमवारी आणि शनिवारी फक्त पाणी + दूध + काळे तीळ घालून अभिषेक करावा.
 • रोज जर रात्री झोपताना तुम्ही ओम न लावता १०८ वेळा नमः शिवाय हा मंत्र  बोलून झोपाल तर खूप चांगले परिणाम मिळतील. हे अंथरुणात बसून केले तरी चालेल.

केमद्रुम दोष असेल तर खास उपाय

११ सुपारी + एक लाल रंगाचे फुल + 1/२ रुपये चे शिक्के एका काळ्या कपड्यात बांधा आणि घरातील व्यक्ती बरोबर समुद्रकिनारी जा  आणि पूर्व दिशेला मुख करून बसा आणि जी व्यक्ती तुमच्या बरोबर आली आहे तिने तुमच्या मागे उभे राहून हि पोटली ७ वेळा उलट्या दिशेने तुमच्या डोक्यावरून फिरवून पाण्यात टाकावे दोघांनी मागे वळून बघू नये आणि घरी येऊन अंघोळ करावी. हे कधीही जमेल तेव्हा एकदाच करून घ्या.

आणि ह्या दोषा साठी प्रत्येक सोमवारी घरात संध्याकाळी रात्री जमेल तेव्हा घरात कोठेही बसा आणि मुख हे वायव्य दिशेला करून ॐ सोम सोमाय नमः हा मंत्र रुद्राक्ष माळेवर १०८ वेळा (एक माळ) करून घ्या. खूप फरक पडेल.

चंद्र चे मंत्र :- चंद्र मजबूत करण्यासाठी सोमवारी आणि पूर्णिमेला बोला .

चन्द्रमा चा नाम मंत्र :-  ॐ सों सोमाय नम:।

चंद्रमा गायत्री मंत्र :- ॐ भूर्भुव: स्व: अमृतांगाय विदमहे कलारूपाय धीमहि तन्नो सोमो प्रचोदयात्।

 चंद्रमा चा पौराणिक मंत्र :-

दधिशंखतुषाराभं क्षीरोदार्णव सम्भवम ।

नमामि शशिनं सोमं शंभोर्मुकुट भूषणं ।। 

चन्द्रमा चे तांत्रोक्त मंत्र:-

ॐ श्रां श्रीं श्रौं स: चन्द्रमसे नम:।

ॐ ऐं क्लीं सोमाय नम:।

ॐ श्रीं श्रीं चन्द्रमसे नम: ।

ॐ शीतांशु, विभांशु अमृतांशु नम: ।

सफेद कपड़ा, मोती, चाँदी, तांदूळ , साखर , दही, शंख, सफेद फूल, ह्यांचे दान सोमवारी / पौर्णिमेला करून चंद्रा ची शुभ फळे मिळतात.

धन्यवाद……!

This Post Has 5 Comments

 1. Sonal Shinde

  khup chan mahiti ahe , kalvilya badal dhanyvad

 2. संतोष संखे

  अतिशय सुंदर माहिती

  1. Jayashri Nalawade

   The above information is very best

 3. पांडुरंग विठ्ठल लाड

  खूप सुंदर माहिती,

 4. प्रीतम

  खूप उपयुक्त अशी माहिती आहे गुरुजी, धन्यवाद.

Leave a Reply