Table of Contents
दिवसा जन्म
जन्म दिवसा झाला असेल तर सूर्योदया पासून सूर्यास्तापर्यंत असेल. आणि सूर्यास्तापासून ते दुसऱ्या दिवसाच्या सूर्योदयापर्यंत रात्रीचा जन्म असेल. (Day Birth)
जो दिवसा जन्म घेतो तो आपल्या धर्मात आस्था ठेवणारा असतो. धर्मावर कधी प्रश्नचिन्ह ठेवत नाही. कुटुंब मोठे होते. कर्माच्या पाठी सतत असतो, प्रत्येक काम करून त्याला काही मिळवावेसे वाटेल, भौतिक सुख सुविधेमध्ये सतत रममाण असेल. शृंगारिक, वस्त्र, फॅशन ह्यांचा मोह निर्माण होतो, गुरुजन, मोठे ह्यांचा आदर करणारा, पराक्रमाची भावना सतत असून समाजाकडून सतत आदर मिळविण्याची आसक्ती निर्माण झाल्यामुळे त्यात तो नेहमी प्रयत्नशील असतो.
रात्री जन्म
व्यक्तीचा जन्म रात्री झाला असेल तर त्याच्या अंगी एक वेगळीच ऊर्जा असते. काम करण्याची क्षमता ह्याच्यात अधिक असते. दिवसा काम करताना ह्यांना थोडा त्रास होतो त्यापेक्षा रात्री जागरण करून काम करणे ह्यांना पसंद असते. त्यामुळे सकाळी लवकर उठणे हा प्रकार रात्री जन्म झालेल्याना जमत नाही. रात्री जन्म झालेल्या व्यक्तींमध्ये एखादे व्यसन असू शकते. रिलेशन शिप टिकविण्या मध्ये ह्यांना त्रास होऊ शकतो. जीवनात धावपळी फार होतात पण पैसा ह्यांना मिळतो टिकविता येण्याचा योग कमी. नियम पाळून राहणे जास्त जमत नाही.(Night Birth)
हेही वाचा : तुमचा विवाह कुणाबरोबर होण्याचा संभव असतो.
कोणत्या २ तासात आपला जन्म झाला आहे?
- सकाळी ४ ते ६ मधील जन्म दिवस : आरोग्य उत्तम, आत्मविश्वास, ऑर्डरफुल रहाणे, थोडासा तापट, जीवनातील मध्य वयात २२ ते ४० मधील आयुष्य फार गतिमान असते, वैवाहिक जीवनात ताप वाढतो. दृढसंकल्पित व्यक्तिमत्व असते. शिक्षण घेताना त्रास होतो जबाबदारी वाढतात. प्रत्येक गोष्टीसाठी आधी संघर्ष करावा लागतो.
- सकाळी ६ ते ८ मधील जन्म : रहस्यपूर्ण जीवन, वडिलांचे प्रेम किंवा सुख कमी, जन्मस्थानापासून दूर प्रगती, आरोग्याचे त्रास, करिअर मध्ये वयाच्या १८ पासूनच उडी, घरातील जबाबदारी किंवा स्वतःचे शोक ह्यामुळे शिक्षणात व्यत्यय,
- सकाळी ८ ते १० मधील : मित्र मैत्रिणी जास्त, जीवनात पैसे भरपूर मिळतात, वडिलांच्या प्रॉपर्टीज चा लाभ होतो, संतान सुख कमी होईल, करिअर उत्तम. जीवनात वयाच्या २२ पासून प्रगती होण्यास सुरुवात होते ती पुढे ४० पर्यंत पण नंतर ह्यांना त्रास जाणवतो. शिक्षण पूर्ण होताताना दिसते.
- सकाळी १० ते दुपारी १२ मधील जन्म : सरकारी क्षेत्रात प्रगती किंवा त्यापासून लाभ, सेना नेव्ही पोलीस मधील करिअर उत्तम, प्रॉपर्टीज घेताना त्रास, घरातील व्यक्तींसाठी किंवा संतान सुखासाठी खूप धावपळ, विद्येचा लाभ उत्तम.
- दुपारी १२ ते २ मधील जन्म : धार्मिक प्रवृत्ती वाढतील, वडिलांच्या आयुष्याचा स्वतःवर प्रभाव पडेल, दूरचे प्रवास करावे लागतील, घरात मोठे बंधू जास्तीत जास्त ह्याच वेळी जन्म घेतात, दयाळू परोपकारी स्वभाव, शिक्षणात प्रगती आणि त्याच अनुषंगाने भाग्योदय होतो. मधले आयुष्य पीडित राहते आणि धावपळीचे होते.
- दुपारी २ ते ४ मधील जन्म : आरोग्याचे त्रास, पिता कष्टीत, विमा, बँक, महसूल ह्यात करिअर होते, सरकारी नोकरीत त्रास होतो, कोर्ट कचेरी जीवनात त्रासदायक होते. कर्ज होते. रिटायरमेंट होताना त्रास जाणवेल.
- दुपारी ४ ते संध्याकाळी ६ मधील जन्म : करिअर मध्ये उशीर होताना दिसतो, आधी झाले तर त्रास होतो, नोकरी पेक्षा व्यवसाय उत्तम करता येतो, पार्टनरशिप करू नये, आरोग्य उत्तम देतो, प्रसिद्धी मिळते, पहिली काही वर्षे वैवाहिक जीवनात त्रास होतो. जोडीदार तापट स्वभावाचा मिळतो. शिक्षणापासून कमी लाभ होतात.
- संध्याकाळी ६ ते ८ पर्यंतचा जन्म : हे समाजात आपली जास्तीत जास्त सर्व्हिस देतात. उदाहरणार्थ डॉक्टर नर्स, सेवाभावी संशेचे अधिकारी, पोलीस वगैर. आरोग्याच्या तक्रारी, कर्ज , कोर्ट केस ह्यामधील धावपळ, शिक्षण उत्तम घेतलेल्या शिक्षणातूनच पुढे करिअर करण्याचे योग उत्तम, वैवाहिक जीवनात जोडीदाराचा दुरावा सहन होतो.
- रात्री ८ ते १० मधील जन्म : जीवनात कलाबाजी उत्तम प्रकारे सादर करू शकतात, नेहमी आशावादी असतील, शिक्षण घेताना जबाबदारी पडते किंवा उनाडक्या करतात त्यामुळे शिक्षण होताना त्रास होतो. उत्तम सल्लागार बनतात. संतती सौख्यात अडचणी, प्रेमप्रकणात व्यत्यय सतत येतात.
- रात्री १० ते १२ चा जन्म : जमीन प्रॉपर्टीज मधील लाभ उत्तम होतात, लहानपणी घरातील वातावरण उत्तम नसते, मधल्या आयुष्यात स्वतःच्या कर्तबगारीवर करिअर करून पुढे जातात, आईचे सुख कमी किंवा आईच्या जीवनात त्रास दिसतात, काही जणांना सावत्र आई सुद्धा योग होताना दिसतो पत्रिकेत इतर योग होत असतील तर. जीवनात शेवटी मोठे बदल होताना दिसतील.
- १२ ते रात्री २ मधील जन्म : शिक्षण किंवा करिअर जन्म स्थानापासून दूर होते, वडिलांपासून दूर जाऊन प्रगती होते, करिअर मीडिया क्षेत्रात किंवा बऱ्याच जणांशी जिथे संपर्क होतो अशा ठिकाणी करतात येते. पत्रिका उत्तम असेल वैमानिक होण्याचा योग उत्तम दिसतो. मोठ्या मोठ्या राजकारणी लोकांसाठी धावपळ करणारे लोक ह्या वेळी जास्त जन्म घेताना दिसून येतात. प्रसिद्धी मिळते. वैवाहिक जीवनातील सुख घेताना किंवा संतान सुख घेताना त्रास जाणवतो.
- रात्री २ ते ४ मधील जन्म : पैसे भरपूर मिळतो पण त्याबरोबर कुटुंबाची जबाबदारी स्वीकारावी लागते त्यातून कधीच बाहेर पडता येत नाही. स्वतः कुटुंबापासून दूर गेले तर उत्तम पण तिथून सुद्धा ह्यांना जास्त कुटुंबासाठी मेहनत करावी लागते. पिता असे पर्यंत एकत्र राहताना करिअर करता येतच नाही. किंवा स्वतःचा प्रकाश पडत नाही. पिता पुत्र पैकी एक जण सतत त्रासात दिसतात. त्यासाठी कुटुंबाचा त्याग उत्तम. वयाच्या १८ नंतरचे शिक्षण स्वतःच्या मेहनतीनेच घ्यावे लागते वडिलांच्या पैशातून शिक्षण घेत असाल तर विचार करावा शिक्षण कामी येत नाही.
धन्यवाद…..!