You are currently viewing पारिजात योग : एक शुभ योग

जेव्हा देव दानवांमध्ये समुद्र मंथन झाले तेव्हा १४ रत्नांमध्ये पारिजात वृक्ष सुद्धा प्राप्त झाले. ते इंद्राने स्वतःकडे ठेवले आणि पत्रिकेत जर हा योग बनला असेल तर तो राजयोग निर्माण करणारा असतो.

हा योग ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत बनत असेल तर मोठ्या मोठ्या पदावर तिन्ही सैन्य दलामध्ये मोठ्या पदावर काम करणारे, पोलीस अधिकारी, धैर्यवान, वीर साहसी, श्रेष्ठ इमानदार, श्रीमंत व्यक्ती ह्या योगावर जन्म घेतलेल्या असतील.

आपल्या पत्रिकेत कसा होतो हा योग?

  • जन्म कुंडलती प्रथम स्थानाचा मालक आणि राशीचा मालक एकाच स्थानात असतील आणि त्या स्थानाचा मालक सुद्धा तिथे असेल तर पारिजात योग बनतो. जर हा योग नवम पंचम आणि लाभ स्थानी बनत असले किंवा कोणत्याही स्थानी बनत असेल तर त्या स्थानाची फळे व्यक्तीला उत्तम मिळतात. किंवा त्या स्थानाच्या कारकत्वामुळे व्यक्ती आपल्या जीवनात सफल होतो असे माझे मत आहे.
  • गुरु मंगळ पारिजात योग सुद्धा होतो — जर लग्नेश मंगळ असेल आणि मंगळ गुरु च्या राशीत आणि गुरु उच्च कर्क राशीत असेल तर हा गुरु- मंगळ पारिजात योग होतो.
  • लाभ स्थानातून पारिजात योग सुद्धा होतो — लाभ (एकादश) स्थानात जर एक शुभ ग्रह असेल आणि त्यावर एका शुभ ग्रहाची दृष्टी असेल आणि लाभ स्थानाचा मालक केंद्रात सुस्थितीत बलवान बसला असेल तर पारिजात योग बनतो.

वरील तीन पैकी एक नियम आपल्या पत्रिकेत बनत असेल तर आपण पारिजात योगात जन्म घेतला असेल प्रथम ह्या योगात फार मेहनत करावी लागते पण व्यक्तीला नंतर सफल जीवन सुखसमृद्धी पैसा मिळतोच त्यामुळे जर आपण एखाद्या ज्योतिषाचे मार्गदर्शन घेत असाल तर नक्की हा योग आपल्या पत्रिकेत आहे का ते चेक करायला सांगा.

प्रथम आपल्याला इथे राशी चे मालक देतो कारण जर हे समजले तर आपण प्रथम स्थानाचा मालक आणि आपल्या राशीचा मालक हे एकत्र बसले आहेत का ते पहावे आणि ते जिथे कुठे असतील त्या स्थानात जो आकडा असेल त्या स्थानाचा मालक सुद्धा तिथेच असेल तर हे तुम्ही स्वतः पाहून घेऊ शकता.

प्रत्येक स्थानात कोणता तरी एक आकडा असतो त्या स्थानात कोणती राशी आहे आणि त्या राशीचा मालक कोण ते खालील प्रमाणे असेल.

  • कोणत्याही स्थानात १ किंवा ८ असेल तर तिथे मेष किंवा वृश्चिक राशी असेल त्याचा स्वामी मंगळ असेल
  • कोणत्याही स्थानात २ किंवा ७ असेल तर तिथे वृषभ राशी किंवा तुला राशी असेल त्याचा स्वामी शुक्र असेल
  • कोणत्याही स्थानात ३ किंवा ६ असेल तर तिथे मिथुन किंवा कन्या राशी असेल त्याचा स्वामी बुध असेल
  • कोणत्याही स्थानात ४ असेल तर तिथे कर्क राशी असेल त्या स्थानाचा मालक चंद्र असेल
  • कोणत्याही स्थानात ५ असेल तर तिथे सिंह राशी असेल त्या स्थानाचा मालक रवी (सूर्य) असेल
  • कोणत्याही स्थानात ९ किंवा १२ असेल तर तिथे धनु किंवा मीन राशी असेल त्या स्थानाचा मालक गुरु असेल.

आता शुभ ग्रह कोणते आहेत ते सांगतो

चंद्र शुक्र बुध गुरु हे शुभ आणि शनी राहू केतू रवी मंगळ हे पाप ग्रह असतात.

एकादश स्थानात शुभ ग्रह आहे का ते पहा आणि त्या स्थानावर शुभ ग्रहाची दृष्टी आहे का ते सुद्धा पहा आणि लाभ स्थानाचा मालक केंद्रात बसला असेल त्यावर कोणत्याही पाप ग्रहाची दृष्टी किंवा पाप ग्रहाबरोबर बसला नसेल तर पारिजात योग होतो लाभ स्थानातून

आता गुरु मंगळ पाहण्यासाठी

प्रथम स्थानी १किंवा ८ आकडा असेल तर लग्नेश मंगळ होतो आणि तो ९ किंवा १२ मध्ये बसला असेल तर तो गुरु च्या राशीत बसेल आणि गुरु ४ बरोबर लिहिला असेल तर गुरु कर्केत असेल उच्चीचा होईल तर अशा पद्धतीने गुरु मंगळ पारिजात योग होत आहे का ते तुम्ही स्वतः पाहू शकता.

जरी ह्यातले अर्धे जरी समजले तरी पुढील त्याचे ऑपेरेशन योग्य ज्योतिषांकडून जाणून घ्या कारण हा योग ज्याच्या पत्रिकेत असेल त्याला चिंता करण्याचे कारणच नसेल.

धन्यवाद…..!

Leave a Reply