You are currently viewing गुरु राशी परिवर्तन २०२१ : वृषभ राशी/वृषभ लग्न

गुरु राशी परिवर्तन २०२१ वृषभ राशी/वृषभ लग्न- गुरु २० नोव्हेंबर २०२१ ला कुंभ राशीत जात आहे १३ एप्रिल २०२२ पर्यंत गुरु कुंभ राशीत असेल. त्यावरील त्याचे नक्षत्रीय भ्रमण आणि इतर विवेचन वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://shreedattagurujyotish.com/guru-rashi-parivartan-2021-jupiter-transit-in-kumbh-rashi-in-marathi/

गुरु राशी परिवर्तन २०२१ वृषभ राशी वृषभ लग्न

वरील कुंडली हि वृषभ राशीची चंद्र कुंडली आहे आणि वृषभ राशीची लग्न कुंडली आहे.

आपली चंद्र कुंडली वृषभ राशी किंवा लग्न कुंडली वृषभ असेल (मग राशी किंवा लग्न वेगवेगळे असले तरी) खाली दिलेले सर्व काही आपल्यासाठी आहे.

वृषभ राशी/लग्नाच्या कुंडलीत गुरु हा कर्म/दशम स्थानात येत आहे. हे स्थान आपल्या करिअर चे आहे कर्माचे आहे. गुरु १४४ दिवस ह्या स्थानातून भ्रमण करेल तेव्हा तो वक्री होणार नाही ह्याच राशीत संपूर्ण मार्गी असेल. तेव्हा जर आपल्या पत्रिकेत जन्मतः गुरु ची स्थिती उत्तम असेल तो वक्री नसेल तो ० ते ५ किंवा २७ ते २९.५९ डिग्री पर्यंत नसेल. गुरुवर कोणत्याही पापग्रहांची दृष्टी नसेल. आणि दशा महादशा उत्तम असेल तर ह्या कुंभ राशीतील गुरु आपल्या ह्या कर्म स्थानी चांगले फळ देईल.

वरील कुंडलीत जिथे ९ नंबरच्या धनु राशीला आणि १२ नंबर च्या मीन राशीला सर्कल केला आहे त्या गुरु च्या राशी आहेत.
धनु राशी हि आपल्या पत्रिकेत अष्टम स्थानी येते जेव्हा ह्या स्थानाचा स्वामी दशम स्थानी जातो तेव्हा करिअर मधील काही बदल आपण करू शकाल किंवा त्यात काही त्रास सहन करावा लागेल हे निश्चित. असे असले तरी गुरुची दुसरी राशी हि १२ नंबर ची लाभ स्थानी आहे म्हणून काही एव्हढे नुकसान न होता आपल्यलाला त्यात सुद्धा चांगले फळ दिसेल. जर काही बदल होऊन त्रास होऊन प्रमोशन होत असेल तर नक्की त्यासाठी प्रयत्न करा फायदा दिसेल. कर्म स्थानातून गुरु चे भ्रमण हे आता कुठे आपल्या कडे असलेल्या ज्ञानाचा फायदा करून देईल. पण हळू हळू हि मुव्हमेन्ट दिसेल आणि १ ते १३ एप्रिल ला त्याचे चांगले परिणाम दिसतील.

हेही वाचा : गुरु राशी परिवर्तन २०२१ : मेष राशी/मेष लग्न

गुरु ची ७ वी दृष्टी

गुरु ची ७ वी दृष्टी हि ५ नंबर च्या सिंह राशीवर येत आहे (जिथे बाण आहे) ते स्थान आपले हे स्थान प्रॉपर्टीज, मातृ सुख, आणि स्वतःची सगळी सुखे ह्याचे आहे. गुरु ह्या स्थानावर आपली दृष्टी टाकून आपल्याला वरील विषयी चांगले फळ देईल. घर जागा जमीन जुमला ह्या विषयी आता हात घालण्यास काही हरकत नाही.मातृ स्थानाचे चांगले फळ मिळेल.

गुरु ची ५ वी दृष्टी

गुरु ची ५ वी दृष्टी हि जिथे ३ नंबर मिथुन राशी आहे त्यावर येत आहे. जिथे बाण आहे हे स्थान हे स्थान आपल्या कुटुंब आणि पैशाचे आहे म्हणून ह्या दोन्ही विषयी आपल्याला चांगले परिणाम दिसतील. कुटुंबासाठी आपण काही चांगले कर्म करू शकाल आणि त्यात पैसा सुद्धा चांगला मिळेल. गुरु इथे आपल्या कुटुंबावर दृष्टी टाकून काही मंगल कार्ये घडवेल जी मागील वर्षी पूर्ण करता आली नव्हती त्यात चांगले होईल.

गुरु ची ९ वी दृष्टी

गुरु ची ९ वी दृष्टी जिथे ७ नंबर ची तुला राशी आहे जिथे बाण आहे तेथे येत आहे. हे स्थान आपल्या जॉब कर्ज शत्रू आणि कॉम्पिटिशन चे आहे. ह्या विषयी सर्व काही समस्यांवर आता आपण मात करू शकाल.

काळजीचे काही मुद्दे

वृषभ लग्न आणि वृषभ राशीच्या कुंडली चार्ट मध्ये जिथे क्रॉस केला आहे त्या स्थानातील काळजी किंवा सावधानता आपल्याला बाळगावी लागेल.
गुरु पासून चे ८ वे घर हे ६ नंबर चे असेल हे स्थान आपल्या मुलाबाळांचे संततीचे असेल त्यांची काळजी घ्यावी लागेल. संतान साठी प्रयत्न करीत असाल तर जास्त पैसा खर्च करू नका. विद्यार्थाना थोडी जास्त मेहनत करावी लागेल ह्या १४४ दिवसात प्रेम प्रकरणे ह्यात चांगले अनुभव येताना दिसत नाहीत.

जिथे १० नंबर शनीची राशी लिहिली आहे तिथे हे गुरु पासून चे मागील स्थान असल्यामुळे ते भाग्योदयाचे स्थान आहे म्हणून भाग्योदयात काही बदल दिसतील आणि धावपळ होईल. लक फॅक्टर साठी जास्त प्रयत्नशील व्हावे लागेल. भाग्योदयाच्या ज्या काही गोष्टी पेंडिंग असतील त्यात थोडा त्रास होईल पण ती कामे होतील उशीर होऊन.

जिथे ४ नंबर ची कर्क राशी आहे ते स्थान गुरु पासून चे ६ वे घर आहे. घर विकण्यास हा काळ उत्तम नाही. प्रयत्न करावा लागेल. पराक्रम करताना धावपळ होईल. काही आपल्या कागदपत्रांची विशेष काळजी घ्यावी लागेल त्यात धावपळ दिसते. लहान भावंडांच्या विषयी काही चिंता लागू शकेल.

गुरु चे नक्षत्रीय भ्रमण

गुरु चे धनिष्ठा नक्षत्रातून भ्रमण

२१ नोव्हेंबर २०२१ ते २ जानेवारी २०२२ पर्यंत गुरु मंगळाच्या धनिष्ठा नक्षत्रातून भ्रमण करेल. हे भ्रमण वृषभ राशीसाठी मिश्रीत परिणाम देते. वैवाहिक सुखाचे विषय ताणले जातील लक्ष द्या नवीन व्यवसायासाठी हा काळ पैसा गुंतवणूक करूनच करावा लागेल. मंगळ ५ डिसेंबर पर्यंत तुला राशीत असेल आणि गुरु तेथून मंगळावर आपली ९वी दृष्टी टाकत आहे. जॉब मध्ये तुम्ही सेफ असाल. प्रमोशन दिसेल पण ते काही व्यय करून जाईल.

५ डिसेंबर २०२१ पासून २०२१ पासून मंगळ १७ जानेवारी पर्यंत हाच मंगळ वृश्चिक राशीत आपल्या सप्तम स्थानी जात आहे म्हणून गुरु ७ व्या स्थानाचे फळ जास्त देईल आणि बाराव्या स्थानाचे फळ सुद्धा. ह्यात काही वैवाहिक संबधीतले तंटे त्रासदायक असतील पण त्यातून सुटका सुद्धा दिसेल. पण जर एखादी कोर्ट केस असेल ह्या विषयी तर आपल्याला काही वजाबाकी दिसेल नक्की. हा काळ पार्टनर्शीप ला चांगला नाही. नुकसान दिसते. मग बिझनेस पार्टनर कडून किंवा लाईफ पार्टनर कडून जे विषय असतील त्यात.

गुरु चे शततारका नक्षत्रातून भ्रमण

गुरु २ जानेवारी २०२२ ते २ मार्च २०२२ पर्यंत शततारका नक्षत्रातून भ्रमण करेल तेव्हा तो राहू च्या नक्षत्रातून भ्रमण करीत असल्यामुळे राहूचे फळ देण्यास सुरुवात करेल. वृषभ राशीच्या लग्न आणि राशी कुंडलीत सध्या राहू हा पहिल्या स्थानावरून भ्रमण करत असेल वरील कालावधीत आपल्याला आरोग्याचे त्रास जाणवू शकतील. थोडे डिप्रेशन येत असेल तर त्याची चिंता होईल मात्र त्यातून लवकरच २ मार्च नंतर बाहेर पडाल. एखादी शस्त्रक्रिया कुणाची बाकी असेल तर करून घ्यावी. रिलेशन साठी ताणतणाव दिसतील.

गुरु चे पूर्वाभाद्रपदा नक्षत्रातून भ्रमण

२ मार्च २०२२ ते १३ एप्रिल २०२२ पर्यंत गुरु चे पूर्वभाद्रपदा नक्षत्रातून भ्रमण असेल. पूर्वभाद्रपदा हे गुरुचेच नक्षत्र असल्यामुळे हा काळ आपणासाठी सर्वात उत्तम असेल. कर्मस्थानातील काही इच्छा पूर्ण करू शकाल. करिअर मध्ये चांगले आहे.
गुरु च्या भ्रमणातील सर्वात उत्तम काळ हा असेल.

धन्यवाद…..!

Leave a Reply