वरील चंद्र राशी कुंडली किंवा लग्न कुंडली कन्या राशी आणि कन्या लग्नाची आहे. जर आपण कन्या राशीचे आहात किंवा कन्या लग्नाचे आहात तर खाली दिलेले गुरु च्या बदलाचे विषय हे आपल्याला दिनांक २०/११/२०२० ते २०/११/२०२१ पर्यंत मिळतील.
दिलेला लेख वाचायच्या अगोदर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून गुरु ची बेसिक माहिती अणि गुरु बदलाचे बेसिक परिणाम वाचून घ्या.
मला समजलेला ज्योतिष मधील गुरु ग्रह
https://shreedattagurujyotish.com/mala-samazalela-jyotish-madhil-guru/
गुरु चा मकर राशीत प्रवेश : दिनांक २० नोव्हेंबर २०२० ते २० नोव्हेंबर २०२१
https://shreedattagurujyotish.com/guru-cha-makar-rashit-pravesh-from-20november-2020-to-20-november-2021/
आपल्या कन्या राशी किंवा कन्या लग्नाच्या व्यक्तींच्या कुंडलीत गुरु हा मागील एक वर्षे धनु राशीत म्हणजे जिथे ९ लिहिला आहे कुंडलीच्या चौथ्या स्थानी येथे गुरु होता. आता तो आपल्या कुंडलीत चौथे स्थान सोडून पाचव्या स्थानी आला आहे जिथे १० लिहिले आहे शनी च्या राशीत आणि शनी च्या बरोबर येथे तो दिनांक २१/११/२०२१ पर्यंत राहील. मागील वर्षी घरातील काही वाइट झालेल्या गोष्टीवर आता तुम्ही मात करू शकता.
Table of Contents
गुरु आणि शनी ची युती
गुरु आणि शनी ची युती आपल्या पाचव्या स्थानी जी आहे त्यात आपल्याला ह्या स्थानातील काही चांगली वाईट दोन्ही फळे देईल. पाचव्या सहाव्या स्थानावरून आपले ज्ञान, शिक्षण, संतान ह्या गोष्टी पहिल्या जातात.
दिनांक २०/११/२०२० च्या आधी जर आपल्या बद्दल वरील विषय असतील तर ह्यापुढे त्याबद्दल वरील विषयांत आपण मजबूत असाल. ह्या बद्दलचे ज्या ज्या समस्या आपल्याला ह्या आधी झाल्या असतील त्यात तुम्ही तुमच्या ज्ञानाचा उपयोग उत्तम प्रकारे करून त्या सोडविण्याचा प्रयत्न कराल. पण त्यात काही तरी नवीन केलेच पाहिजे जे तुम्ही आत्तापर्यंत केलेले नसेल असे.
ह्या बदलामुळे आपण आपल्या शिक्षणात काही वेगळे करून प्रगती करू शकता सर्व कमर्शिअल शिक्षणासाठी हा कालावधी उत्तम राहील.रेगुलर शिक्षणात मात्र येथे अडथळे दिसतील खास ज्या कन्या राशी आणि कन्या लग्नाला संतती विषय ह्या आधी बरीच वर्षे असेल त्यांना हा कालावधी उत्तम असेल आय वि एफ किंवा आय वि आय वगैरे मेडिकल प्रोसेस ने हा विषय निकाली लागेल .
गुरु च्या दोन राशी एक धनु ९ नंबर हे स्थान जिथे आहे तिथून तुमचे मातृ सुख, प्रॉपर्टीज, घरातले सुख, पर्सनल सुख पाहिले जाते ह्या चौथ्या स्थानाचा मालक गुरु हा पुढील स्थानात नीच होऊन आला आहे तो शनी बरोबर असेल ज्यात तुम्ही वरील विषय चांगले हाताळू शकता ह्या वर्षी.
गुरु ची १२ नंबर ची मीन राशी तुमच्या पत्रिकेत सातव्या स्थानी येत आहे त्या मीन राशीचा मालक जेव्हा गोचरीने पाचव्या स्थानी येतो तेव्हा वैवाहिक सुखासाठी जे जे प्रयत्न असतील त्यात आपल्या ज्ञानाचा उपयोग होईल.
अशा काही जणांचा प्रेम विवाह ह्या वर्षी होईल ज्यांच्या प्रेमप्रकरणाला बरीच वर्षे झाली असतील. किंवा मागील असलेल्या ओळखीत मुला मुलींचा विवाह ह्या वर्षी होण्याचे प्रकार जरूर असतील पण हे थोडे असामाजिक असतील तर त्यात जास्त वाव आहे उदा . जाती पाती धर्म रंग उंची वगैरे काही वेगळे असू शकते परंपरा मोडणारे.
जे जे कन्या राशी कन्या लग्न वाले कोणतेही अकाउंट चे काम करत असतील त्यांना हा काळ खूप चांगला आहे. जे व्यापारी आहेत त्यांच्या स्किल चा उपयोग ते जरूर ह्या वर्षी करून अग्रेसर असतील. पैसा उत्तम येईल.
गुरु ची ७ वि दृष्टी
गुरु आणि शनी ची दृष्टी हि आपल्या पत्रिकेच्या ११ व्या लाभ स्थानावर येत आहे जिथे ४ लिहिला आहे शनी ची दृष्टी सुद्धा ह्या स्थानावर येत आहे जर आपण विद्यार्थी असाल आणि काही इतर कोर्सेस करत असाल तर त्यात आपल्याला हे वर्ष उत्तम परिणाम देणारे असेल.
संतती निर्माण करण्यासाठी हा एक उत्तम काळ असेल. २०/११/२०२० च्या आधी ज्यांचा जॉब सुटला असेल किंवा करिअर मध्ये अडथळे आले असतील ते कन्या राशी कन्या लग्न वाल्याना आपल्या ज्ञानाचा उपयोग करून काही तरी मिळविता येईल हा काळ अति उत्तम असेल जे जे कन्सल्टिंग चा व्यवसाय करतील त्यांना.
गुरु ची ५ वि दृष्टी
हि दृष्टी नवम स्थानावर जिथे २ लिहिले आहे पण तेथे दिनांक २४/९/२०२० ला जो राहू आला आहे तो १८ महिन्यासाठी म्हणून भाग्य स्थानातील काही बदल हे ह्या वर्षी निश्चित असतील त्यात आपण आपल्या करिअर किंवा व्यवसायाला वेगळे वळण देऊ शकता. ज्यांना विदेशात जायचे असेल त्यांना हा काळ उत्तम असेल.
गुरु ची ९ वि दृष्टी
हि तुमच्या पत्रिकेत जिथे ६ नंबर आहे तेथे येत आहे हे पत्रिकेचे पहिले स्थान असते गुरु ची इथे पडणारी दृष्टी हि नीच आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःला ह्या आधी जिथे जिथे प्रेसेंट करू शकला नव्हता ते प्रयत्न ह्या वर्षी त्यात काही तरी नवीन करून करायला हरकत नाही. त्यात तुम्हाला निर्णय घ्यावेच लागतील अशी परिस्थिती आली तर जरूर पुढे जा.
गुरुचे उपाय
कन्या राशी आणि कन्या लग्न वाल्याना गुरुचे बदलाचे उपाय करताना असा सल्ला दिला जातो कि प्रत्येक गुरुवारी एखादे तरी पिवळे वस्त्र परिधान करून एखाद्या गुरु मंदिरात दर्शनासाठी जात जा तेथे गुरु मंदिरात पिवळे खाण्याचे पदार्थ किंवा पिवळी फळे ठेऊन प्रार्थना करा.
गुरु च्या नक्षत्र भ्रमणाचे कन्या राशी आणि कन्या लग्नावर होणारे परिणाम देतो
- २०/११/२०२० ला जेव्हा गुरु मकर राशीत प्रवेश करेल तेव्हा तो उत्तराषाढा नक्षत्री असेल आणि तो ह्या नक्षत्री दिनांक ६/१/२०२१ पर्यंत असेल. ह्यात आपल्याला काही गोष्टी हातातून जात असल्याचे दिसून येईल. गुंतवणुकीसाठी हा उत्तम काळ असेल. काही जणांना ह्याच कालावधीत विदेशात जाण्याचा योग दिसतो.
- पुढे ७/१/२०२१ पासून तो ४/३/२०२१ पर्यंत गुरु श्रवण चंद्राच्या नक्षत्री असेल. ह्यात गुरु च्या ७ व्या दृष्टीत जे जे लिहिले आहे त्यात तुम्ही ऍक्टिव्ह असाल.
- ५/३/२०२१ पासून गुरु २२/५/२०२१ पर्यंत धनिष्ठा मंगळाच्या नक्षत्रात असेल. ह्यात आपल्याला जर एखादा आजार आधीपासून असेल तर त्यात बरीच धावपळ दिसेल. काही जणांचे ऑपेरेशन मागे राहिले असेल तर हा तो कालावधी असेल. ह्यात जरा आपण कोणत्याही अपघातापासून अति सावध राहा वाहने सावकाश हाका असा सल्ला दिला जातो.
- २२/५/२०२१ पासून गुरु २०/७/२०२१ पर्यंत शततारका राहूच्या नक्षत्री असेल. ह्यात ५/३/२०२१ ते २२/२०२१ मध्ये ज्या ज्या घटना घडतील तर त्यात त्रास होण्याचा बराच संभव असेल. ह्यात मोठे निर्णय घेऊ नका. अचानक काही गुंतवणूक ह्या करावी लागली तर अजिबात करू नका. पुढे धावपळ होईल.
- २०/७/२०२१ पासून गुरु पुन्हा धनिष्ठा नक्षत्री येईल आणि पुढे २/१/२०२२ पर्यंत गुरु ह्याच नक्षत्री असेल. पण मकर मधून २०/११/२०२१ ला निघेल आणि कुंभेत असेल पुढे. ह्या कालावधीत प्रॉपर्टीज विकण्याचे योग आहेत. किंवा असे ऍक्टिव्हेट नसाल तर वैवाहिक सुखातली एखादी धावपळ दिसेल ज्यात आपण थोडे स्पर्धात्मक असाल. हा कालावधी वैवाहिक विषयी खास नाही. पण खाली ह्याची माहिती कुंभ राशीच्या गुरु प्रमाणे असेल प्रॉपर्टीज आणि वैवाहिक प्रश्ना बद्दल.
सर्वात महत्वाचे कन्या राशी आणि कन्या लग्नवाल्याना
गुरु च्या मकर राशीच्या प्रवेशाच्या सर्वात पहिल्या पोस्ट मध्ये असे लिहिले आहे मी कि —
४) कुंभ राशीत गुरु ५ एप्रिल २०२१ पासून मार्गी असेल तो दिनांक २० जून २०२१ च्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ८ डिग्री १ अंश आणि ३८ विकला नंतर कुंभ राशीतून उलट फिरण्यास सुरुवात होईल म्हणजे तो कुंभ राशीत वक्री असेल.
पुढे तो २० जून २०२१ पासून उलट फिरत फिरत मागे मागे येत १४ सप्टेंबर ला दुपारी १२:५७ ला कुंभ राशीतून बाहेर पडेल. म्हणजे दिनांक २०/६/२०२१ ते १४/९/२०२१ पर्यंत कुंभ राशीत गुरु वक्री असेल. ह्यात कन्या लग्न आणि कन्या राशीला आपल्या वैवाहिक सुखाची जास्त काळजी घ्यावी लागेल त्यात एखादी निगेटिव्ह गोष्ट घडली तर १४/९/२०२१ पर्यंत सहन करा जास्त निर्णय घेऊ नका हा काळ वैवाहिक सुखासाठी चांगला नाही.
जे व्यापारी आहेत त्यांना सुद्धा हा काळ चांगला जात नाही जे जे पार्टनरशिप करत आहेत त्यांना सावधान राहण्याचा सल्ला दिला जातो. पण जर पत्रिकेत तुमचा गुरु वक्री असेल तर वरील विषयात तुम्हाला चांगले परिणाम दिसतील त्या विषयीच्या पेंडिंग प्रोसेस क्लिअर करताना तुम्हाला फायदे होतील. गुरु वक्री असेल तर व्यापारी जणांना कन्या राशी आणि कन्या लग्नाला हा खास पिरियड असेल रोज पैसा कमविण्याचा पण पार्टनरशिप नकोच. (हे अनुभव सिंह लग्नाला सुद्धा दिले आहेत)
गुरु चे हे भ्रमण आपल्या सर्वाना उत्तम ज्ञान आरोग्य आणि धन देऊन सुखी करो हीच प्रार्थना.
धन्यवाद…..!