You are currently viewing गुरु परिवर्तन २०२०: मकर राशी किंवा मकर लग्न

वरील चंद्र राशी कुंडली किंवा लग्न कुंडली मकर राशी आणि मकर लग्नाची आहे. जर आपण मकर राशीचे आहात किंवा मकर लग्नाचे आहात तर खाली दिलेले गुरु च्या बदलाचे विषय हे आपल्याला दिनांक २०/११/२०२० ते २०/११/२०२१ पर्यंत मिळतील.

दिलेला लेख वाचायच्या अगोदर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून गुरु ची बेसिक माहिती अणि गुरु बदलाचे बेसिक परिणाम वाचून घ्या.

मला समजलेला ज्योतिष मधील गुरु ग्रह

https://shreedattagurujyotish.com/mala-samazalela-jyotish-madhil-guru/

गुरु चा मकर राशीत प्रवेश : दिनांक २० नोव्हेंबर २०२० ते २० नोव्हेंबर २०२१

https://shreedattagurujyotish.com/guru-cha-makar-rashit-pravesh-from-20november-2020-to-20-november-2021/

आपल्या मकर राशी किंवा मकर लग्नाच्या व्यक्तींच्या कुंडलीत गुरु हा मागील एक वर्षे धनु राशीत म्हणजे जिथे ९ लिहिला आहे कुंडलीच्या बाराव्या स्थानी येथे गुरु होता. आता तो आपल्या कुंडलीत बारावे स्थान सोडून पहिल्या स्थानी आला आहे जिथे १० लिहिले आहे शनी च्या राशीत आणि शनी बरोबर येथे तो दिनांक २१/११/२०२१ पर्यंत राहील.

गुरु आणि शनी ची युती

गुरु आणि शनी ची युती आपल्या पहिल्या स्थानी जी आहे त्यात आपल्याला ह्या स्थानातील काही चांगली वाईट दोन्ही फळे देईल. पहिल्या स्थानावरून तुम्ही स्वतःला पहावे, स्वतःच्या ऍक्टिव्हिटीला इथून चेक केले जाते, तुमचा देह, स्वभाव, तुमची सर्व ऍक्टिव्हिटी, तुमचे सर्व प्रेसेंटेशन इथूनच पाहतात.

त्यामुळे मकर लग्न आणि मकर राशीच्या सर्वाना वरील विषय हे महत्वाचे असतील. २१/११/२०२१ पर्यंत तुमची प्रत्येक ऍक्टिव्हिटी हि अशी सुरु होणार आहे ज्याची तुम्ही आत्तापर्यंत वाट पाहत होतात. किंवा आत्तापर्यंत जे जे तुम्हाला जमले नसेल ते ते तुम्ही करण्याचा प्रयन्त जरूर कराल काही वेगळे असे.

दिनांक २०/११/२०२० च्या आधी जर आपल्या बद्दल वरील विषय असतील तर ह्यापुढे त्याबद्दल वरील विषयांत आपण मजबूत असाल. ह्या बद्दलच्या ज्या ज्या समस्या आपल्याला ह्या आधी झाल्या असतील त्यात तुम्ही तुमच्या ज्ञानाचा उपयोग उत्तम प्रकारे करून त्या सोडविण्याचा प्रयत्न कराल. पण त्यात काही तरी नवीन केलेच पाहिजे जे तुम्ही आत्तापर्यंत केलेले नसेल असे.

गुरु च्या दोन राशी एक धनु ९ नंबर हे स्थान जिथे आहे तिथून तुमच्या गेलेल्या किंवा जाणाऱ्या गोष्टी पाहिल्या जातात. हे व्यय स्थान असते म्हणून जेव्हा गुरु मागील वर्षी इथे होता तेव्हा आपल्या कडून गुरु च्या कारकत्वाच्या ज्या ज्या गोष्टी वजा झाल्या होत्या त्यात आता तुम्ही स्वतःला सावरण्याचा प्रयत्न कराल. आणि त्यावर जरूर शनी आपली मदत करेल कारण शनी स्वतः तुमच्या राशीत आहे सध्या. आणि तो तुमच्या राशीचा मालक सुद्धा आहे

गुरु ची १२ नंबर ची मीन राशी तुमच्या पत्रिकेत तिसऱ्या स्थानी येत आहे त्या मीन राशीचा मालक जेव्हा गोचरीने पहिल्या स्थानी येतो तेव्हा तिसरे स्थान जरूर तुम्ही ऍक्टिव्हेट कराल आणि त्यातील फळे तुम्हाला मिळतील जसे तिसऱ्या स्थानातून पराक्रम पहिले जातात म्हणून त्या स्थानाचा मालक हा तुमच्या डोक्यावर आलेला आहे म्हणून तुम्ही ह्या वर्षी जास्त पराक्रम करून पुढे जाण्याचा प्रयत्न कराल. तिसऱ्या स्थानातून छोटे मोठे प्रवास सुद्धा होतील आणि काही भावंडांबद्दल त्रास सुद्धा त्यात आपण जास्त ऍक्टिव्हेट होऊ नका जर मागील काही वर्षे हा विषय असेल तर.

गुरु ची ७ वि दृष्टी

गुरु आणि शनी ची दृष्टी हि आपल्या पत्रिकेच्या ७ व्या स्थानावर येत आहे जिथे ४ लिहिला आहे शनी ची दृष्टी सुद्धा ह्या स्थानावर येत आहे जिथे ४ लिहिले आहे तिथून विवाह पार्टनरशिप आणि रोज येणारा पैसा पाहिला जातो. जर मकर लग्न आणि मकर राशीच्या व्यक्तींचा विवाह जर झाला नसेल तर नक्की ह्यावर्षी विवाह होण्यासारखा आहे त्यात थोडे प्रयत्न जरूर करा. ह्याच राशी लग्नाचे व्यक्ती मागील काही वर्षांपासून प्रेमात असतील तर हे वर्ष त्यांना खास असेल विवाह बंधनात आपल्या जिद्दीने इच्छा पूर्ण करण्याची ऍक्टिव्हिटी दिसेल.

जर आपण व्यापारी असाल तर व्यापारात लाभ होतील शनी ची दृष्टी हि पार्टनरशिप u करण्यास मान्यता देत नाही पण अशा व्यक्ती समोर येतील कि आपल्याला मार्गदर्शन करून आपल्या व्यापारात आपल्याला जरूर मदत करतील.

गुरु ची ५ वि दृष्टी

हि दृष्टी पाचव्या स्थानावर जिथे २ लिहिले आहे पण तेथे दिनांक २४/९/२०२० ला जो राहू आला आहे तो १८ महिन्यासाठी म्हणून आपल्या समोर प्रेम, विद्या , शैक्षणिक व्यवस्था, संतान हे विषय असू शकतील त्या त्या वयोमानानुसार.

ज्यांना संतान चे स्वप्न आहेत ते सुद्धा ह्या वर्षी काही वेगळे प्रयत्न करून पूर्ण करू शकतील. विद्यार्थी दशेतील मुलांना इथे चांगले प्रोसेस मिळतील काही कोर्सेस वगैरे बाहेर जाऊन करण्यासाठी हा काळ उत्तम असेल.

प्रेमात पडण्याची किंवा प्रेम सफल करण्याची बुद्धी डेरिंग सुद्धा इथे राहू बसल्यामुळे निर्माण होईल. आधीचे आयुष्य आणि ह्या वर्षीचे आयुष्यात ह्यात जरूर काही नवीन बदल दिसतील.

गुरु ची ९ वि दृष्टी

हि तुमच्या पत्रिकेत जिथे ६ नंबर आहे तेथे येत आहे हे पत्रिकेचे नववे (भाग्य) स्थान असते गुरु ची इथे पडणारी दृष्टी हि नीच आहे. त्यामुळे आपल्या भाग्योदयात लागणाऱ्या गोष्टी तुम्ही ह्या कालावधीत जरूर पूर्ण कराल. त्यात आपल्याला राहू ची दृष्टी सुद्धा भाग्योदयावर येत आहे त्यामुळे भाग्योदय दूर जाऊन कुठे सेट करण्याचा प्रयत्न जरूर कराल आणि त्यात तुम्ही सफल सुद्धा व्हाल. करिअर मध्ये ह्या वर्षी काही नवीन बदल सुद्धा दिसतील त्याला आपल्याला सामोरे जावे लागेल.

गुरुचे उपाय

मकर राशी आणि मकर लग्न वाल्याना गुरुचे बदलाचे उपाय करताना गुरुवारी आणि शनिवारी गुरु आणि शनी ची दाने करावीत. त्यात गुरु साठी कोणत्याही पिवळ्या वस्तू, वस्त्र , फळे फुले गुरु ला अर्पण करावीत , आणि शनिवारी शनी च्या वस्तू दान कराव्यात. त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://shreedattagurujyotish.com/shanichya-vastu-aani-tyachi-mahiti/

गुरु च्या नक्षत्र भ्रमणाचे मकर राशी आणि मकर लग्नावर होणारे परिणाम देतो

  • २०/११/२०२० ला जेव्हा गुरु मकर राशीत प्रवेश करेल तेव्हा तो उत्तराषाढा नक्षत्री असेल आणि तो ह्या नक्षत्री दिनांक ६/१/२०२१ पर्यंत असेल. हा काळ थोडा पीडा देणारा असू शकतो. ह्यात मकर राशीच्या लग्नाच्या व्यक्तींना वडिलांकडे लक्ष द्यावे लागेल जर त्यांच्या तब्येतीकडे काही तक्रारी असतील तर. आणि स्वतःला सुद्धा जपावे लागेल देहाला थोडा त्रास जाणवू शकतो एखाद्या अचानक आलेल्या संकटांपासून सावध राहा. हा काळ योग्य नाही. मान सन्मानाला ठेच पोहोचू शकेल.
  • पुढे ७/१/२०२१ पासून तो ४/३/२०२१ पर्यंत गुरु श्रवण चंद्राच्या नक्षत्री असेल. ह्यात गुरु च्या ७ व्या दृष्टीत जे जे लिहिले आहे त्यात तुम्ही ऍक्टिव्ह असाल. वैवाहिक काही प्रश्न आधीपासून असतील तर ते जरूर इथे सोडविण्याचे प्रयत्न कराल किंवा नवीन निर्माण होतील सुद्धा.
  • ५/३/२०२१ पासून गुरु २२/५/२०२१ पर्यंत धनिष्ठा मंगळाच्या नक्षत्रात असेल. इथे आपल्याला काही प्रॉपर्टीज घेण्याचे योग दिसतील. नवीन घर खरेदी वगैरे करू शकता. जर अशा ऍक्टिव्हिटीत तुम्ही सामील नसाल तर घरातील सुखासाठी तुम्ही काही प्रयत्न कराल आणि त्यात लाभ होतील.
  • २२/५/२०२१ पासून गुरु २०/७/२०२१ पर्यंत शततारका राहूच्या नक्षत्री असेल. ह्यात ५/३/२०२१ ते २२/५/२०२१ मध्ये ज्या ज्या घटना घडतील तर त्यात आपली डेरिंग वाढेल आणि त्याला आपल्या बुद्धिकौशल्याचा पूर्ण वापर करून सोडविण्याचा प्रयत्न कराल पण इथे थोडे सावधान राहण्याचा सल्ला दिला जातो दगा फटका होऊ शकेल.
  • २०/७/२०२१ पासून गुरु पुन्हा धनिष्ठा नक्षत्री येईल आणि पुढे २/१/२०२२ पर्यंत गुरु ह्याच नक्षत्री असेल. पण मकर मधून २०/११/२०२१ ला निघेल आणि कुंभेत असेल पुढे. हा काळ सर्व मकर राशी लग्न वाल्याना उत्तम जाऊ शकेल. खूप काही करून गेल्याचे समाधान देईल हा काळ.

सर्वात महत्वाचे मकर राशी आणि मकर लग्नवाल्याना

गुरु च्या मकर राशीच्या प्रवेशाच्या सर्वात पहिल्या पोस्ट मध्ये असे लिहिले आहे मी कि —

कुंभ राशीत गुरु ५ एप्रिल २०२१ पासून मार्गी असेल तो दिनांक २० जून २०२१ च्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ८ डिग्री १ अंश आणि ३८ विकला नंतर कुंभ राशीतून उलट फिरण्यास सुरुवात होईल म्हणजे तो कुंभ राशीत वक्री असेल.

पुढे तो २० जून २०२१ पासून उलट फिरत फिरत मागे मागे येत १४ सप्टेंबर ला दुपारी १२:५७ ला कुंभ राशीतून बाहेर पडेल. म्हणजे दिनांक २०/६/२०२१ ते १४/९/२०२१ पर्यंत कुंभ राशीत गुरु वक्री असेल.

वरील कालावधीत मकर राशी आणि मकर लग्न वाल्याना कुटुंब पैसा ह्या दोन गोष्टी महत्वाचे परिणाम देतील. आपल्या पत्रिकेत गुरु जर वक्री असेल तर तुम्हाला हा कालावधी फार काही देऊन जाईल तुम्ही आपल्या ऍक्टिव्हिटी मध्ये सफल व्हाल.

गुरु चे हे भ्रमण आपल्या सर्वाना उत्तम ज्ञान आरोग्य आणि धन देऊन सुखी करो हीच प्रार्थना.

धन्यवाद…..!

Leave a Reply