You are currently viewing गुरु परिवर्तन २०२०: कुंभ राशी किंवा कुंभ लग्न

वरील चंद्र राशी कुंडली किंवा लग्न कुंडली कुंभ राशी आणि कुंभ लग्नाची आहे. जर आपण कुंभ राशीचे आहात किंवा कुंभ लग्नाचे आहात तर खाली दिलेले गुरु च्या बदलाचे विषय हे आपल्याला दिनांक २०/११/२०२० ते २०/११/२०२१ पर्यंत मिळतील.

दिलेला लेख वाचायच्या अगोदर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून गुरु ची बेसिक माहिती अणि गुरु बदलाचे बेसिक परिणाम वाचून घ्या.

मला समजलेला ज्योतिष मधील गुरु ग्रह

https://shreedattagurujyotish.com/mala-samazalela-jyotish-madhil-guru/

गुरु चा मकर राशीत प्रवेश : दिनांक २० नोव्हेंबर २०२० ते २० नोव्हेंबर २०२१

https://shreedattagurujyotish.com/guru-cha-makar-rashit-pravesh-from-20november-2020-to-20-november-2021/

आपल्या कुंभ राशी किंवा कुंभ लग्नाच्या व्यक्तींच्या कुंडलीत गुरु हा मागील एक वर्षे धनु राशीत म्हणजे जिथे ९ लिहिला आहे कुंडलीच्या अकराव्या (लाभ) स्थानी येथे गुरु होता. आता तो आपल्या कुंडलीत लाभ स्थान सोडून बाराव्या स्थानी आला आहे जिथे १० लिहिले आहे शनी च्या राशीत आणि शनी बरोबर येथे तो दिनांक २१/११/२०२१ पर्यंत राहील.

गुरु आणि शनी ची युती

गुरु आणि शनी ची युती आपल्या बाराव्या स्थानी जी आहे त्यात आपल्याला ह्या स्थानातील काही चांगली वाईट दोन्ही फळे देईल. बाराव्या स्थानावरून परदेश गमन, गुंतवणूक, आपल्याकडून जाणाऱ्या सर्व गोष्टी पहिल्या जातात. हे विषय ह्या वर्षी आपल्यासमोर येतील.

येथील गुरु आणि शनी ची युती जे जे मकर लग्न किंवा मकर राशी च्या व्यक्ती आहेत त्यांना आपल्या जन्मस्थानापासून लांब राहून खूप काही चांगले करता येईल. त्यांच्या बुद्धिमत्तेला तिथे चांगला वाव मिळेल असे माझे मत आहे.

म्हणून अशा सर्व व्यक्तींना सल्ला दिला जातो कि आपण जर मागील काही वर्षे आपल्या जन्मस्थानातील व्यक्तींच्याच सर्कल मध्ये राहून काहीच करता आलेले नसेल आत्तापर्यंत तर कोणत्याही प्रोसेस क्लिअर करण्यासाठी थोडे लांब जाऊन प्रयत्न करण्यास हरकत नाही. आणि असा अनुभव किंवा असे काही प्रोसेस आपल्या समोर जरूर येतील दिनांक २१/११/२०२१ च्या अगोदर. त्याचा जरूर लाभ घ्या.

गुरु च्या दोन राशी एक धनु ९ नंबर हे स्थान जिथे आहे तिथून तुमच्या गेलेल्या किंवा जाणाऱ्या गोष्टी पहिल्या जातात. हे लाभ स्थान असते म्हणून जेव्हा गुरु मागील वर्षी इथे होता तेव्हा इथून गुरु च्या कारकत्वाच्या ज्या ज्या गोष्टी आपल्याला मिळाल्या असतील त्या तुम्ही आता त्या सर्व गोष्टी बुक कराल म्हणजे डम्प कराल.

गुरु ची १२ नंबर ची मीन राशी तुमच्या पत्रिकेत दुसऱ्या स्थानी आहे त्या मीन राशीचा मालक जेव्हा गोचरीने बाराव्या स्थानी गोचरीने एका वर्षासाठी येतो तेव्हा आपल्या कुटुंब धन ह्याचे विषय आपल्याला कुटुंबापासून दूर कुठे लांब जाऊन मिळवावे असा सल्ला दिला जातो. इथे कुटुंबात थोडे त्रास होण्याचा संभव असतो. पण जर हे अजिबात जमले नाही तर मात्र गुरु चे उपाय करून आपल्याला हे वर्ष काढावे लागेल ज्याने कुटुंब आणि पैसा ह्या गोष्टी आपल्या हातात राहतील. आणि मोठे कोणतेही निर्णय जे तुम्हाला ह्या वर्षी घ्यावेच लागतील असे दिसते त्यात जास्त त्रास होणार नाही.

गुरु ची ७ वि दृष्टी

गुरु आणि शनी ची दृष्टी हि आपल्या पत्रिकेच्या ६ व्या स्थानावर येत आहे जिथे ४ लिहिला आहे शनी ची दृष्टी सुद्धा ह्या स्थानावर येत आहे जिथे ४ लिहिले आहे तिथून कर्ज, जॉब, शत्रू, आपण देणारी कोणतीही इतरांना सर्व्हिस , आजार ह्या गोष्टी पहिल्या जातात. दिनांक २१/११/२०२१ पर्यंत हे काही विषय आपल्या समोर आपल्या वयोमानानुसार असतील.

पण त्यात आपण मेहनत करून त्यात चांगले रिझल्ट मिळवू शकाल. ज्यांना ज्यांना आधी जॉब चे विषय असतील त्यांना हे वर्ष चांगले असेल. पण त्यात काही नवीन निर्णय घ्यावे लागतील. ज्यांना आजाराचे विषय असतील त्यांना सुद्धा त्यावर जास्त प्रयत्न करून त्यातले काही प्रश्न मिटवू शकाल.

गुरु ची ५ वि दृष्टी

हि दृष्टी चौथ्या स्थानावर जिथे २ लिहिले आहे पण तेथे दिनांक २४/९/२०२० ला जो राहू आला आहे तो १८ महिन्यासाठी म्हणून आपल्या समोर प्रॉपर्टीज ,आईचे सुख, घरातील काही विषय, जनमानसात तुमचे महत्व हे विषय असू शकतील त्या त्या वयोमानानुसार.

ज्यांना आपल्या घराचा प्रश्न असेल त्याचा विषय ह्या वर्षी सोडविण्याचे पहाल. घरातील काही मोठे प्रश्न सुद्धा आपण चांगले हाताळून विषय सोडवाल, मातृ सुखात थोडे आपल्याला त्रास होतील. त्यात आईच्या तब्येतीचा विषय असेल तर कार्यशील राहावे लागेल.

गुरु ची ९ वि दृष्टी

हि तुमच्या पत्रिकेत जिथे ६ नंबर आहे तेथे येत आहे हे पत्रिकेचे आठवे स्थान असते गुरु ची इथे पडणारी दृष्टी हि नीच आहे आणि ती बाराव्या स्थानातून आहे. त्यामुळे हे चांगले असते आपल्या काही रिसर्च इथे पूर्ण होतील. पैसा उत्तम मिळेल. काही छोट्या मोठ्या अपघातात इथे आपले रक्षण सुद्धा होईल. विद्यार्थी आपले काही रिसर्च परदेशात जाऊन करायला हरकत नाही जे ह्याची मागील काही वर्षे वाट पाहत होते त्यांना हा कालावधी उत्तम राहील.

गुरुचे उपाय

कुंभ राशी आणि कुंभ लग्न वाल्याना गुरुचे बदलाचे उपाय करताना गुरुवारी आणि शनिवारी गुरु आणि शनी ची दाने करावीत. त्यात गुरु साठी कोणत्याही पिवळ्या वस्तू, वस्त्र , फळे फुले गुरु ला अर्पण करावीत , आणि शनिवारी शनी च्या वस्तू दान कराव्यात. त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://shreedattagurujyotish.com/shanichya-vastu-aani-tyachi-mahiti/

गुरु च्या नक्षत्र भ्रमणाचे कुंभ राशी आणि कुंभ लग्नावर होणारे परिणाम देतो

  • २०/११/२०२० ला जेव्हा गुरु कुंभ राशीत प्रवेश करेल तेव्हा तो उत्तराषाढा नक्षत्री असेल आणि तो ह्या नक्षत्री दिनांक ६/१/२०२१ पर्यंत असेल. हा काळ आपल्या वैवाहिक विषयाचा असू शकतो किंवा व्यापारी असाल तर त्यासाठीचा असू शकतो. थोडा ताण असेल ६/१/२०२१ पर्यंत थांबा मोठे निर्णय घेऊ नका. ज्यांच्या घरात वडिलांची तब्येत खालावली असेल त्यांना हा कालावधी जास्त चांगला दिसत नाही. लक्ष देणे भाग असेल.
  • पुढे ७/१/२०२१ पासून तो ४/३/२०२१ पर्यंत गुरु श्रवण चंद्राच्या नक्षत्री असेल. ह्यात गुरु च्या ७ व्या दृष्टीत जे जे लिहिले आहे त्यात तुम्ही ऍक्टिव्ह असाल. आपल्या सर्व सर्व्हिसेस इथे ऍक्टिव्हेट असतील.
  • ५/३/२०२१ पासून गुरु २२/५/२०२१ पर्यंत धनिष्ठा मंगळाच्या नक्षत्रात असेल. इथे आपल्याला काही काही कर्म स्थानातील बदल किंवा धावपळ दिसेल. जॉब किंवा व्यापार करण्यासाठी आपण वेगवेगळ्या ठिकाणी प्रयत्नात असाल. काहींना ह्यासाठी छोटे प्रवास करायला लागतील.
  • २२/५/२०२१ पासून गुरु २०/७/२०२१ पर्यंत शततारका राहूच्या नक्षत्री असेल. ह्यात ५/३/२०२१ ते २२/५/२०२१ मध्ये ज्या ज्या घटना घडतील तर त्यात आपली डेरिंग वाढेल आणि त्याला आपल्या बुद्धिकौशल्याचा पूर्ण वापर करून सोडविण्याचा प्रयत्न कराल पण ह्या घडामोडी होत असताना घरातील किंवा घराबद्दल एखादा विषय आपल्यासमोर असेल.
  • २०/७/२०२१ पासून गुरु पुन्हा धनिष्ठा नक्षत्री येईल आणि पुढे २/१/२०२२ पर्यंत गुरु ह्याच नक्षत्री असेल. पण कुंभ मधून २०/११/२०२१ ला निघेल आणि कुंभेत असेल पुढे. हा काळ सर्व कुंभ राशी लग्न वाल्याना उत्तम जाऊ शकेल. करिअर च्या दृष्टीने हा विशेष कालावधी असेल.

सर्वात महत्वाचे कुंभ राशी आणि कुंभ लग्नवाल्याना

गुरु च्या कुंभ राशीच्या प्रवेशाच्या सर्वात पहिल्या पोस्ट मध्ये असे लिहिले आहे मी कि —

कुंभ राशीत गुरु ५ एप्रिल २०२१ पासून मार्गी असेल तो दिनांक २० जून २०२१ च्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ८ डिग्री १ अंश आणि ३८ विकला नंतर कुंभ राशीतून उलट फिरण्यास सुरुवात होईल म्हणजे तो कुंभ राशीत वक्री असेल.

पुढे तो २० जून २०२१ पासून उलट फिरत फिरत मागे मागे येत १४ सप्टेंबर ला दुपारी १२:५७ ला कुंभ राशीतून बाहेर पडेल. म्हणजे दिनांक २०/६/२०२१ ते १४/९/२०२१ पर्यंत कुंभ राशीत गुरु वक्री असेल.

वरील कालावधीत कुंभ राशी आणि कुंभ लग्न वाल्याना कुटुंब पैसा ह्या दोन गोष्टी महत्वाचे परिणाम देतील. आपल्या पत्रिकेत गुरु जर वक्री असेल तर तुम्हाला हा कालावधी फार काही देऊन जाईल तुम्ही आपल्या ऍक्टिव्हिटी मध्ये सफल व्हाल.

गुरु चे हे भ्रमण आपल्या सर्वाना उत्तम ज्ञान आरोग्य आणि धन देऊन सुखी करो हीच प्रार्थना.

धन्यवाद…..!

Leave a Reply