You are currently viewing गुरु परिवर्तन २०२०: धनु राशी किंवा धनु लग्न

वरील चंद्र राशी कुंडली किंवा लग्न कुंडली धनु राशी आणि धनु लग्नाची आहे. जर आपण धनु राशीचे आहात किंवा धनु लग्नाचे आहात तर खाली दिलेले गुरु च्या बदलाचे विषय हे आपल्याला दिनांक २०/११/२०२० ते २०/११/२०२१ पर्यंत मिळतील.

दिलेला लेख वाचायच्या अगोदर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून गुरु ची बेसिक माहिती अणि गुरु बदलाचे बेसिक परिणाम वाचून घ्या.

मला समजलेला ज्योतिष मधील गुरु ग्रह

https://shreedattagurujyotish.com/mala-samazalela-jyotish-madhil-guru/

गुरु चा मकर राशीत प्रवेश : दिनांक २० नोव्हेंबर २०२० ते २० नोव्हेंबर २०२१

https://shreedattagurujyotish.com/guru-cha-makar-rashit-pravesh-from-20november-2020-to-20-november-2021/

आपल्या धनु राशी किंवा धनु लग्नाच्या व्यक्तींच्या कुंडलीत गुरु हा मागील एक वर्षे धनु राशीत म्हणजे जिथे ९ लिहिला आहे कुंडलीच्या पहिल्या लग्न स्थानी येथे गुरु होता. आता तो आपल्या कुंडलीत पाहिले स्थान सोडून दुसऱ्या स्थानी आला आहे जिथे १० लिहिले आहे शनी च्या राशीत आणि शनी च्या बरोबर येथे तो दिनांक २१/११/२०२१ पर्यंत राहील.

गुरु आणि शनी ची युती

गुरु आणि शनी ची युती आपल्या दुसऱ्या स्थानी जी आहे त्यात आपल्याला ह्या स्थानातील काही चांगली वाईट दोन्ही फळे देईल. दुसऱ्या स्थानावरून तुमचे धन, कुटुंब आणि वाणी पाहिले जाते.
दिनांक २०/११/२०२० च्या आधी जर आपल्या बद्दल वरील विषय असतील तर ह्यापुढे त्याबद्दल वरील विषयांत आपण मजबूत असाल.

ह्या बद्दलचे ज्या ज्या समस्या आपल्याला ह्या आधी झाल्या असतील त्यात तुम्ही तुमच्या ज्ञानाचा उपयोग उत्तम प्रकारे करून त्या सोडविण्याचा प्रयत्न कराल. पण त्यात काही तरी नवीन केलेच पाहिजे जे तुम्ही आत्तापर्यंत केलेले नसेल असे.

गुरु च्या दोन राशी एक धनु ९ नंबर हे स्थान जिथे आहे तिथून तुमची सर्व ऍक्टिव्हिटी आणि तुम्हाला पाहिले जाते. जेव्हा पहिल्या स्थानाचा मालक दुसऱ्या स्थानात असेल तेव्हा दुसऱ्या स्थानाची ऍक्टिव्हिटी मध्ये हे पूर्ण वर्ष जाईल म्हणजे कुटुंब आणि पैसे बॅलन्स करण्यासाठी ह्या वर्षात तुम्ही आपल्या ज्ञानाचा वापर कराल. फक्त त्यात आत्तापर्यंत जे केले नसेल ते मिळविण्यासाठी तर आत्ता त्यात काहीतरी नवीन करावे लागेल. एव्हढेच कि आपल्याला ह्यात सामाजिक नियम तोडून काही संधी मिळाली तर ती जरूर करा.

गुरु ची १२ नंबर ची मीन राशी तुमच्या पत्रिकेत पाचव्या स्थानी येत आहे त्या मीन राशीचा मालक जेव्हा गोचरीने दुसऱ्या स्थानी येतो तेव्हा चौथ्या स्थानातील धावपळ सुरु होते. त्यात आपली प्रॉपर्टीज आणि घराच्या ४ भिंतीच्या विषयी काही विषय असतील. ह्या वर्षी घरातील काही व्यक्तींशी आपण कोणत्याही एका विषयी तरी फाईट कराल. पण त्यात तुमचे थोडे नुकसान सुद्धा दिसेल कारण शनी ची ३ री दृष्टी हि चतुर्थ स्थानावर आहे. पण ह्यावर्षी जर आपल्याला घर घ्यायचे असेल तर हे वर्ष उत्तम समजा.

गुरु ची ७ वि दृष्टी

गुरु आणि शनी ची दृष्टी हि आपल्या पत्रिकेच्या ८ व्या स्थानावर येत आहे जिथे ४ लिहिला आहे शनी ची दृष्टी सुद्धा ह्या स्थानावर येत आहे कोणत्याही नवीन सर्चिंग मध्ये तुम्ही ऍक्टिव्हेट व्हाल. काही गुपित गोष्टी पुन्हा आपल्या समोर ह्याच वर्षी येतील. त्या ओपन होताना आपल्याला काही त्रास जाणवेल. पण आपल्या ह्या स्थानावर शनी ची दृष्टी थोडी मानसिक त्रास देते आहे. शरीराच्या गुप्त भागांवर काही त्रास होण्याचा संभव नाकारता येत नाही तरी गुरु ची हि दृष्टी त्यातून ह्याच वर्षी बाहेर काढेल नक्की.

गुरु ची ५ वि दृष्टी

हि दृष्टी सहाव्या स्थानावर जिथे २ लिहिले आहे पण तेथे दिनांक २४/९/२०२० ला जो राहू आला आहे तो १८ महिन्यासाठी म्हणून आपल्या समोर जॉब, कर्ज, स्पर्धा, काही आजार हे विषय असू शकतील पण त्यात तुम्ही ह्या विषयी जर मागील वर्षी हैराण असाल तर हे विषय ह्या वर्षी चांगले सोडविता येतील एव्हढे नक्की. गुरु ची नीच दृष्टी इथे आपल्याला सकारात्मक निर्णय घेऊन त्यात मजबूत असाल.

गुरु ची ९ वि दृष्टी

हि तुमच्या पत्रिकेत जिथे ६ नंबर आहे तेथे येत आहे हे पत्रिकेचे दहावे (कर्म) स्थान असते गुरु ची इथे पडणारी दृष्टी हि नीच आहे. त्यामुळे आपल्या करिअर विषयी आपण खूप चांगले रिझल्ट येथे मिळवाल.

गुरु हा तुमचा लग्नेश आहे म्हणून तुम्ही ह्या वर्षी खूप चांगले प्रेझेंटेशन इथे द्याल. त्यात राहू ची सुद्धा दृष्टी असेल म्हणून काही स्पर्धा होतील आणि काही वाद विवाद होण्याचे सुद्धा असेल पण त्यात तुम्ही सरस असाल.

जर तुम्ही व्यापारी असाल तर आपल्या व्यवसायात खूप चांगली प्रगती कराल. पण पैसा टिकताना कठीण कारण बाराव्या स्थानातील केतू इथे वर्षभर असेल. त्यासाठी तुम्ही पैशा संबंधी उत्तम निर्णय घ्या आणि पुढे जा.

गुरुचे उपाय

धनु राशी आणि धनु लग्न वाल्याना गुरुचे बदलाचे उपाय करताना गुरुवारी आणि शनिवारी गुरु आणि शनी ची दाने करावीत. त्यात गुरु साठी कोणत्याही पिवळ्या वस्तू, वस्त्र , फळे फुले गुरु ला अर्पण करावीत , आणि शनिवारी शनी च्या वस्तू दान कराव्यात. त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://shreedattagurujyotish.com/shanichya-vastu-aani-tyachi-mahiti/

गुरु च्या नक्षत्र भ्रमणाचे धनु राशी आणि धनु लग्नावर होणारे परिणाम देतो

  • २०/११/२०२० ला जेव्हा गुरु मकर राशीत प्रवेश करेल तेव्हा तो उत्तराषाढा नक्षत्री असेल आणि तो ह्या नक्षत्री दिनांक ६/१/२०२१ पर्यंत असेल. ह्यात आपल्या भाग्योदयाच्या गोष्टी घडतील काही नवीन कराल नक्की पुढे प्रोग्रेस करण्यासाठी.
  • पुढे ७/१/२०२१ पासून तो ४/३/२०२१ पर्यंत गुरु श्रवण चंद्राच्या नक्षत्री असेल. ह्यात गुरु च्या ७ व्या दृष्टीत जे जे लिहिले आहे त्यात तुम्ही ऍक्टिव्ह असाल. त्याशिवाय हेल्थ आणि प्रॉपर्टीज चे विषय इथे असतील. किंवा घरातील विषय जे आधी लिहिले आहे ४ भिंतीतले ते ह्या कालावधीत दिसतील.
  • ५/३/२०२१ पासून गुरु २२/५/२०२१ पर्यंत धनिष्ठा मंगळाच्या नक्षत्रात असेल. इथे आपण आपले ज्ञान खर्च कराल आणि निर्णय घ्याल. पण त्यात पैसा हा खर्च होणारच आहे हे नक्की. काही वेळा इथे धनु लग्न आणि धनु राशीच्या लोकांसाठी प्रेम हा विषय चांगला दिसत नाही इथे झटपट निर्णय होईल.
  • २२/५/२०२१ पासून गुरु २०/७/२०२१ पर्यंत शततारका राहूच्या नक्षत्री असेल. ह्यात ५/३/२०२१ ते २२/२०२१ मध्ये ज्या ज्या घटना घडतील तर त्यात त्रास होण्याचा बराच संभव असेल. ह्याच कालवधीत आपण आपल्या जॉब किंवा हेल्थ संबंधित निर्णय घ्याल पण २२/५/२०२१ ते २०/७/२०२१ पर्यंत शक्य असल्यास थांबून पाहावे.
  • २०/७/२०२१ पासून गुरु पुन्हा धनिष्ठा नक्षत्री येईल आणि पुढे २/१/२०२२ पर्यंत गुरु ह्याच नक्षत्री असेल. पण मकर मधून २०/११/२०२१ ला निघेल आणि कुंभेत असेल पुढे. ह्या कालावधीत काहींना संतान सुखाबद्दल धावपळी होतील. काहींना आपल्या संतान स्वतःपासून दूर काही शिक्षणासाठी पाठविण्याचा हा कालावधी दिसेल. काहींना परदेश गमन ह्याच कालावधीत दिसेल.

सर्वात महत्वाचे धनु राशी आणि धनु लग्नवाल्याना

गुरु च्या मकर राशीच्या प्रवेशाच्या सर्वात पहिल्या पोस्ट मध्ये असे लिहिले आहे मी कि —

कुंभ राशीत गुरु ५ एप्रिल २०२१ पासून मार्गी असेल तो दिनांक २० जून २०२१ च्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ८ डिग्री १ अंश आणि ३८ विकला नंतर कुंभ राशीतून उलट फिरण्यास सुरुवात होईल म्हणजे तो कुंभ राशीत वक्री असेल.

पुढे तो २० जून २०२१ पासून उलट फिरत फिरत मागे मागे येत १४ सप्टेंबर ला दुपारी १२:५७ ला कुंभ राशीतून बाहेर पडेल. म्हणजे दिनांक २०/६/२०२१ ते १४/९/२०२१ पर्यंत कुंभ राशीत गुरु वक्री असेल.

ह्यात धनु लग्न आणि धनु राशीला आपल्या प्रॉपर्टीज बद्दल किंवा घराच्या एखाद्या सुखाबद्दल आणि तुमच्या हेलबद्दल तुम्ही ऍक्टिव्हेट असाल. आपल्या पत्रिकेत जर गुरु वक्री असेल तर २०/६/२०२१ ते १४/९/२०२१ हा काळ आपल्यासाठी फार उत्तम असेल. जे कराल ते आपल्या ज्ञानाच्या जोरावर यश खेचून आणाल.

गुरु चे हे भ्रमण आपल्या सर्वाना उत्तम ज्ञान आरोग्य आणि धन देऊन सुखी करो हीच प्रार्थना.

धन्यवाद…..!

Leave a Reply