You are currently viewing राहू-केतू राशी परिवर्तन : ३० ऑक्टोबर २०२३ ते १८ मे २०२५

राहू-केतू राशी परिवर्तन ३० ऑक्टोबर २०२३ ते १८ मे २०२५

ग्रहांचे एका राशीतुन दुसऱ्या राशीत आगमन होणाऱ्या स्थितीला त्या ग्रहाचे राशी परिवर्तन (गोचर) म्हणतात.

गुरु एका राशीत साधारण एक वर्षे असतो.
शनी एका राशी साधारण अडीच वर्षे असतो नंतर तो दुसऱ्या राशीत आगमन करतो
राहू/केतू एका राशीत साधारण १८ महिने असतात. मात्र हे दोन्ही छायाग्रह वक्री अवस्थेतून मागे मागे येत मागच्या राशीत जात असतात म्हणजे उलटे प्रवास करतात.

दिनांक ३०/१०/२०२३ ला राहू मीन राशीत जाणार आहे जो आधी मागील १८ महिने मेष राशीत होता आणि केतू कन्या राशीत जाईल जो आधी तूळ राशीतून १८ महिने उलट प्रवास करत होता.

मुख्यतः माणसाच्या आयुष्यातील महत्वाच्या घटना पाहण्यासाठी शनी गुरु राहू केतू चे गोचर हे एव्हढ्यासाठीच पाहतात कारण ते त्या त्या राशीत बराच काळ भ्रमण करत असतात.

शनी सध्या १७ जानेवारी २०२३ पासून २८ मार्च २०२५ पर्यंत कुंभ राशीत असेल नंतर तो मीन राशीत पुढे अडीच वर्षे असेल.
गुरु सध्या २२ एप्रिल २०२३ पासून १ मे २०२४ पर्यंत मेष राशीत आहे नंतर तो वृषभ राशीत जाईल.

आता राहू गोचर बद्दल.

राहू १८ एप्रिल २०२२ पासून ते ३० ऑक्टोबर २०२३ पर्यंत मेष राशीत होता आणि केतू सुद्धा ह्याच कालावधीत तुला राशीतून मागे मागे येत होता.

आता राहू मेष ह्या मंगळाच्या अग्नितत्वाच्या राशीतून मीन ह्या गुरूच्या जलतत्वाच्या राशीत येत आहे
२२ एप्रिल २०२३ पासून मेष राशीत राहू गुरु ची युती होती ती आता तुटणार आहे कारण राहू मीन राशीत जाईल.

प्रत्येक राशी आणि लग्न कुंडली प्रमाणे प्रत्येक राशी आणि लग्नाच्या व्यक्तीला हे राहू गोचर चे साधारण त्याच्या समोर काय विषय असतील हे इथे मांडण्याचा प्रयत्न असेल. जे १००% तसेच होणार नाही कारण तुमच्या मूळ पत्रिकेत राहू आणि केतूची स्थिती मला माहित नसते. तो कुठे बसला आहे त्याच्या डिग्री काय होत्या जन्माच्या वेळी हे सुद्धा माहित नसते. त्यामुळे इथे फक्त जे विषय मांडत आहे जर ते विषय पुढील १८ महिने म्हणजे १८ मे २०२५ पर्यंत आपल्या समोर असतील तर जरूर निष्णात ज्योतिषांचा सल्ला अवश्य घ्यावा.

ह्यात राहू च्या चांगल्या आणि वाईट दोन्ही बाजूंचा विचार होणार आहे.

नोट इथे पुढील प्रत्येक राशीच्या आणि लग्नाच्या पोस्ट वाचताना आपल्याला दोन्ही पोस्ट वाचायला लागतील.
म्हणजे समजा तुमची राशी मेष आहे तर पोस्ट अशी असेल मेष राशी / मेष लग्न , पण तुमचे लग्न जर तुला असेल तर तुला राशी आणि तुला लग्न ची सुद्धा पोस्ट वाचायला लागेल हे लक्षात घ्या.

जर दोन्ही ठिकाणी खूप चांगले असेल तर हे गोचर चांगले जाईल पण दोन्ही ठिकाणी खूप कठीण विषय असेल तर मात्र काळजीचे असेल.
तरी सुद्धा फायनल डिसिजन हे आपल्या स्वतःच्या मूळ पत्रिकेवरूनच काढता येईल.

राहू चे गोचर नक्षत्र भ्रमण

दिनांक ३०/१०/२०२३ ला जेव्हा राहू मीन राशीत प्रवेश करेल तेव्हा तो रेवती नक्षत्रात प्रवेश करेल. आणि नंतर ८ जुलै २०२४ पर्यंत रेवती नक्षत्रात असेल.
८/४/२०२४ ते १५/३/२०२५ पर्यंत राहू तो उत्तराभाद्रपदा नक्षत्री असेल.
१५/३/२०२५ ते १८/५/२०२५ पर्यंत राहू पूर्वा भाद्रपदा नक्षत्रात असेल.

रेवती नक्षत्र हे बुधाचे आहे, उत्तराभाद्रपदा हे नक्षत्र शनी चे आहे आणि पूर्वा भाद्रपदा हे नक्षत्र गुरु चे आहे.

जेव्हा जेव्हा राहू नक्षत्र बदलेल तेव्हा तेव्हा तो ज्या ज्या नक्षत्रातून जात असेल त्या नक्षत्राचा स्वामी जिथे आपल्या पत्रिकेत लिहिला आहे तिथे तिथे तशा घटना तो देणार हे नक्की.

राहू ची किंवा केतू ची महादशा ज्या व्यक्तींना असेल त्यांना हे राहू केतू चे गोचर खूप काही देणार आहे चांगले किंवा वाईट हे त्याच्या पत्रिकेवर अवलंबून असेल.

पुढे प्रत्येक राशी/लग्नासाठी राहू चे भ्रमण देणार आहे नक्की वाचा.

 • मेष राशी/लग्न — १२ व्या (व्यय/गुंतवणूक/परदेश गमन) स्थानातून राहू चे भ्रमण १८ महिने.
 • वृषभ राशी/लग्न — ११ व्या स्थानातून (लाभ/इच्छा) राहू चे भ्रमण .
 • मिथुन राशी/लग्न — १० व्या स्थानातून (कर्म/प्रोफेशन) राहू चे भ्रमण.
 • कर्क राशी/लग्न — ९ व्या स्थानातून (भाग्य/पिता) राहू चे भ्रमण.
 • सिंह राशी/लग्न — ८ व्या स्थानातून (पीडा/कष्ट/वारसा हक्क/अचानक घटना) राहू चे भ्रमण.
 • कन्या राशी/लग्न — ७ व्या स्थानातून (विवाह/व्यापार) राहू चे भ्रमण.
 • तूळ राशी/ लग्न — ६ व्या स्थानातून (रोग/नोकरी/स्पर्धा) राहू चे भ्रमण.
 • वृश्चिक राशी/लग्न — ५ व्या स्थानातून (संतान/बुद्धी कौशल्य/विद्या) राहू चे भ्रमण.
 • धनु राशी/लग्न — ४ थ्या स्थानातून (प्रॉपर्टी/सुख/मातृ/प्राथमिक शिक्षण) राहू चे भ्रमण.
 • मकर राशी/लग्न — ३ ऱ्या स्थानातून (पराक्रम/भावंडे/प्रवास/धावपळ) राहू चे भ्रमण.
 • कुंभ राशी/लग्न — २ ऱ्या स्थानातून (पैसा/कुटुंब/वाणी) राहू चे भ्रमण.
 • मीन राशी/लग्न — १ ल्या स्थानातून (व्यक्तिमत्व/हेल्थ/प्रेसेंटेशन/कॅरेक्टर) राहू चे भ्रमण.

आपली राशी आणि लग्न चेक करून घ्या आणि जे जे विषय आपल्या राशी/लग्न च्या समोर लिहिले आहेत ते ते विषय आपल्यासमोर
पुढे १८ महिने येत आहेत का ते चेक करून त्यावर आपल्या पत्रिकेत जन्मस्थानातल्या राहू वरून ते विषय कसे रंग देतील त्यावर अनुभवी ज्योतिषांकडून जाणून घ्या.
मी कॉमन सर्व राशी आणि लग्नावर लिहिणार आहेच.

धन्यवाद…..!

श्री दत्तगुरु ज्योतिष
९८२१८१७७६८
७५०६७३७५१९

Leave a Reply