You are currently viewing गुरु परिवर्तन २०२०: तुला राशी किंवा तुला लग्न

वरील चंद्र राशी कुंडली किंवा लग्न कुंडली तुला राशी आणि तुला लग्नाची आहे. जर आपण तुला राशीचे आहात किंवा तुला लग्नाचे आहात तर खाली दिलेले गुरु च्या बदलाचे विषय हे आपल्याला दिनांक २०/११/२०२० ते २०/११/२०२१ पर्यंत मिळतील.

दिलेला लेख वाचायच्या अगोदर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून गुरु ची बेसिक माहिती अणि गुरु बदलाचे बेसिक परिणाम वाचून घ्या.

मला समजलेला ज्योतिष मधील गुरु ग्रह

https://shreedattagurujyotish.com/mala-samazalela-jyotish-madhil-guru/

गुरु चा मकर राशीत प्रवेश : दिनांक २० नोव्हेंबर २०२० ते २० नोव्हेंबर २०२१

https://shreedattagurujyotish.com/guru-cha-makar-rashit-pravesh-from-20november-2020-to-20-november-2021/

आपल्या तुला राशी किंवा तुला लग्नाच्या व्यक्तींच्या कुंडलीत गुरु हा मागील एक वर्षे धनु राशीत म्हणजे जिथे ९ लिहिला आहे कुंडलीच्या तिसऱ्या स्थानी येथे गुरु होता. आता तो आपल्या कुंडलीत तिसरे स्थान सोडून चौथ्या स्थानी आला आहे जिथे १० लिहिले आहे शनी च्या राशीत आणि शनी च्या बरोबर येथे तो दिनांक २१/११/२०२१ पर्यंत राहील. मागील वर्षी गुरूच्या तिसऱ्या घरात असण्याने जे जे त्रास झाले होते त्यावर आता तुम्ही मात करू शकता.

गुरु आणि शनी ची युती

गुरु आणि शनी ची युती आपल्या चौथ्या स्थानी जी आहे त्यात आपल्याला ह्या स्थानातील काही चांगली वाईट दोन्ही फळे देईल. चौथ्या स्थानावरून घरातील वातावरण , मातृ सुख , पर्सनल सुख , प्रॉपर्टीज चे सुख, जनतेत असणारे तुमचे रिलेशन ह्या गोष्टी पाहिल्या जातात.

दिनांक २०/११/२०२० च्या आधी जर आपल्या बद्दल वरील विषय असतील तर ह्यापुढे त्याबद्दल वरील विषयांत आपण मजबूत असाल.

ह्या बद्दलचे ज्या ज्या समस्या आपल्याला ह्या आधी झाल्या असतील त्यात तुम्ही तुमच्या ज्ञानाचा उपयोग उत्तम प्रकारे करून त्या सोडविण्याचा प्रयत्न कराल. पण त्यात काही तरी नवीन केलेच पाहिजे जे तुम्ही आत्तापर्यंत केलेले नसेल असे.

खास — ज्यांचा मागील बरीच वर्षे घराचा प्रश्न असेल त्यांना ह्या कालावधीत तो प्रश्न मिटेल नक्की प्रयत्न करण्यास हरकत नाही.

गुरु च्या दोन राशी एक धनु ९ नंबर हे स्थान जिथे आहे तिथून तुमचे पराक्रम , भाऊबंद , शेजार, छोटे प्रवास, पाहिले जातात ह्या वर्षी हे विषय आपल्यासमोर काही नव्या रूपाने येतील आणि त्यावर तुम्ही चांगले काही तरी करून दाखवाल. मागील वर्षी जी जी धावपळ झाली असेल ती ह्या वर्षी २१/११/२०२१ पर्यंत त्यात तुम्हाला चांगले अनुभव येतील.

गुरु ची १२ नंबर ची मीन राशी तुमच्या पत्रिकेत सहाव्या स्थानी येत आहे त्या मीन राशीचा मालक जेव्हा गोचरीने चौथ्या स्थानी येतो तेव्हा सहाव्या स्थानाची फळे हि सुखावह होऊ शकतील जसे जॉब शत्रू कर्ज आजार म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला चांगल्या प्रकारे हाताळता येतील त्यात मेहनत करून पुढे जाल.

गुरु ची ७ वि दृष्टी

गुरु आणि शनी ची दृष्टी हि आपल्या पत्रिकेच्या 10 व्या कर्म स्थानावर येत आहे जिथे ४ लिहिला आहे शनी ची दृष्टी सुद्धा ह्या स्थानावर येत आहे कोणत्याही करिअर च्या बाबतीत ह्या युतीची दृष्टी हि मेहनत आणि ज्ञान लावून आपल्याला अग्रेसर ठेवण्यात मदत करेल.

एखाद वेळी आपले करिअर सुद्धा बदलताना आपल्याला ह्या वर्षी दिसू शकते त्याची सुद्धा तयारी करा. जर आपण व्यापारी असाल तर ह्या दृष्टीचे फळ आपल्याला आपल्या व्यवसायात बरेच काही नवीन बदल करून आपल्या ज्ञानाचा उपयोग करून प्रगतीपथावर व्यवसाय नेण्याचे दिसेल. पण हे होत असताना काही कौटुंबिक धावपळ आणि मानसिक चिंता जरूर असू शकते.

गुरु ची ५ वि दृष्टी

हि दृष्टी आठव्या स्थानावर जिथे २ लिहिले आहे पण तेथे दिनांक २४/९/२०२० ला जो राहू आला आहे तो १८ महिन्यासाठी म्हणून भाग्य स्थानातील काही बदल हे ह्या वर्षी निश्चित असतील त्यात आपण आपल्या रिसर्च मध्ये अग्रेसर असाल. ह्यात काही अचानक धन लाभ होण्याचे दिसते. ह्या वर्षी जर आपल्याकडे वारसा हक्काचे काही विषय असतील तरी सुद्धा ह्या वर्षी आपण त्यात ऍक्टिव्ह असाल.

गुरु ची ९ वि दृष्टी

हि तुमच्या पत्रिकेत जिथे ६ नंबर आहे तेथे येत आहे हे पत्रिकेचे बारावे स्थान असते गुरु ची इथे पडणारी दृष्टी हि नीच आहे. त्यामुळे ज्यांना विदेश प्रवास करायचा असेल त्यांना हा कालावधी उत्तम असेल. गुंतवणूक होईल. आपल्या जन्म स्थानापासून लांब प्रॉपर्टीज मध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा कालावधी उत्तम असेल. विद्यार्थ्यांना बाहेर शिक्षण करण्यासाठी सुद्धा हा काळ उत्तम असेल.

गुरुचे उपाय

तुला राशी आणि तुला लग्न वाल्याना गुरुचे बदलाचे उपाय करताना असा सल्ला दिला जातो कि प्रत्येक गुरुवारी पिवळी राई एक मुठी घेऊन स्वतःवरून किंवा डोक्यावरून ३ वेळा फिरवून वाहत्या पाण्यात सोडावे वाहते पाणी नसेल तर पिंपळाच्या झाडाकडे स्पर्श न करता बाजूला ठेऊन यावे. हा उपाय जेव्हा तुमचे काही काम होत नसेल किंवा काही वेगळे त्रास असतील तेव्हा करून पाहावा.

गुरु च्या नक्षत्र भ्रमणाचे तुला राशी आणि तुला लग्नावर होणारे परिणाम देतो

  • २०/११/२०२० ला जेव्हा गुरु मकर राशीत प्रवेश करेल तेव्हा तो उत्तराषाढा नक्षत्री असेल आणि तो ह्या नक्षत्री दिनांक ६/१/२०२१ पर्यंत असेल. ह्यात आपल्याला काही विशिष्ट लाभ होतील पण ते थोड्या वेळासाठी असतील ६/१/२०२१ पर्यंत त्याचा अनुभव येईल.
  • पुढे ७/१/२०२१ पासून तो ४/३/२०२१ पर्यंत गुरु श्रवण चंद्राच्या नक्षत्री असेल. ह्यात गुरु च्या ७ व्या दृष्टीत जे जे लिहिले आहे त्यात तुम्ही ऍक्टिव्ह असाल.
  • ५/३/२०२१ पासून गुरु २२/५/२०२१ पर्यंत धनिष्ठा मंगळाच्या नक्षत्रात असेल. ह्यात वैवाहिक विषय आणि कुटुंबाचे विषय डोकं वर काढतील त्यात तुम्ही त्रस्त असाल. कुटुंबासाठी एखादी धावपळ किंवा खर्च दिसेल.
  • २२/५/२०२१ पासून गुरु २०/७/२०२१ पर्यंत शततारका राहूच्या नक्षत्री असेल. ह्यात ५/३/२०२१ ते २२/२०२१ मध्ये ज्या ज्या घटना घडतील तर त्यात त्रास होण्याचा बराच संभव असेल. वर लिहिलेला वारसा हक्क विषय इथे जास्त ऍक्टिव्ह होईल.
  • २०/७/२०२१ पासून गुरु पुन्हा धनिष्ठा नक्षत्री येईल आणि पुढे २/१/२०२२ पर्यंत गुरु ह्याच नक्षत्री असेल. पण मकर मधून २०/११/२०२१ ला निघेल आणि कुंभेत असेल पुढे. ह्या कालावधीत ज्यांचा विवाह नुकताच झालेला असेल २०/११/२०२० नंतर त्यांना काही कौटुंबिक त्रास होण्याचा संभव आहे. बऱ्याच जणांना तुला राशी आणि तुला लग्न वाल्याना घर सोडण्याचा किंवा पती पत्नीचा दुराव्याचे विषय इथे येऊ शकतील.

सर्वात महत्वाचे तुला राशी आणि तुला लग्नवाल्याना

गुरु च्या मकर राशीच्या प्रवेशाच्या सर्वात पहिल्या पोस्ट मध्ये असे लिहिले आहे मी कि —

कुंभ राशीत गुरु ५ एप्रिल २०२१ पासून मार्गी असेल तो दिनांक २० जून २०२१ च्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ८ डिग्री १ अंश आणि ३८ विकला नंतर कुंभ राशीतून उलट फिरण्यास सुरुवात होईल म्हणजे तो कुंभ राशीत वक्री असेल.

पुढे तो २० जून २०२१ पासून उलट फिरत फिरत मागे मागे येत १४ सप्टेंबर ला दुपारी १२:५७ ला कुंभ राशीतून बाहेर पडेल. म्हणजे दिनांक २०/६/२०२१ ते १४/९/२०२१ पर्यंत कुंभ राशीत गुरु वक्री असेल.

ह्यात तुला लग्न आणि तुला राशीला आपल्या संतान सुखाची धावपळ होऊ शकते जे जे विद्यार्थी दशेत असतील त्यांना हा काळ उत्तम नाही जास्त मेहनत करावी लागेल. आपल्या पत्रिकेत जर गुरु वक्री असेल तर २०/६/२०२१ ते १४/९/२०२१ हा काळ आपल्यासाठी फार उत्तम असेल. जे कराल ते आपल्या ज्ञानाच्या जोरावर यश खेचून आणाल.

गुरु चे हे भ्रमण आपल्या सर्वाना उत्तम ज्ञान आरोग्य आणि धन देऊन सुखी करो हीच प्रार्थना.

धन्यवाद…..!

Leave a Reply