You are currently viewing मला समजलेला तुमच्या पत्रिकेतील बुध

आपला बुध आणि आपला पैसा, बुद्धी, कॅल्क्युलेशन, व्यापार, बहीण, मुलगी, आत्या

बुध ग्रह आहे ज्यास नीट त्यास सर्व मार्ग सुचती सुभट – शनी माहात्म्यातील एक वाक्य”

  • वैदिक, कृष्णमूर्ती, लालकिताब आणि नुमरोलॉजि + वास्तू पद्धतीने एकत्र बुधाचा अभ्यास

बुध खालील गोष्टींचा कारक असतो

विद्वत्ता , वाद विवाद, दात , मान , खांदे , त्वचा , युवा, बैचेन , चंचल , बुद्धिमान, चतुर, कॉमेडियन, मनोरंजन, बोलका, विश्लेषात्मक,तार्किक, वैज्ञानिक , गणनात्मक, हसमुख, बहुमुखी, हजरजवाबपणा, मीलनसार, लेखाकार, लेखक, ज्योतिषी, व्यापारी, बनिया, कम्युनिकेशन स्किल, इलेकट्रोनिक उपकरणे, कॉम्पुटर , टेक्नोलोंजि, वाणिज्य(कॉमर्स), शेअर मार्केट, वित्त, न्युज चॅनेल, पत्रकारिता , सोशिअल मीडिया, बँकिंग, कॉम्युनिकेशन, बहीण, आत्या, मुलगी, लहान मुली ह्या सर्व गोष्टी बुध ग्रहाशी संबंधित आहेत.

ज्या व्यक्तींचा पत्रिकेत बुध खूप चांगला असतो त्या व्यक्तींची बुद्धी खूप चांगली असेल, स्मरणशक्ती उत्तम असेल तो व्यक्ती जीवनात सफलता मिळवतोच कारण नियम असा आहे कि आपले निर्णय चुकतात तेव्हा आपण बऱ्याच वेळा मागे हटतो. बुध चांगला असेल तर बुद्धी चा उपयोग करून आलेल्या संकटाचा सामना तो व्यक्ती नक्की करून त्या संकटातून बाहेर येतोच.

जीवनात पैसा कसा आणि किती मिळवेल हे कुंडलीतल्या बुधावर अवलंबून असते. कुंडलीत जर बुध मंद असेल अशा व्यक्ती आपल्या बुद्धीचा भरपूर उपयोग करीत नाही त्यामुळे जे शिखर त्यास गाठायचे आहे तिथे तो पोहचतच नाही कारण असा व्यक्ती आपल्याकडे असलेल्या बुद्धीचा वापर करताना छोट्या छोट्या गोष्टीत अडकून आपली मेहनत किंवा प्रयत्न असफलतेकडे नेत असतो. ह्याचा अर्थ असा नाही कि तो पैसा प्रतिष्ठा मिळविणार नाही किंवा तो हुशार नाही असे नसेल कदाचित पण त्यास ज्या उंचीपर्यंत पोहचायचे असते तिथे तो जातच नाही किंवा ज्यावेळी मोठे निर्णय घ्यायचे असतात तिथे तो एकतर निर्णय घेत नाही किंवा त्यात फसला जातो.

पत्रिकेतील ३/८/९/१२ ह्या स्थानां मधील बुध असेल तर तो मंद बुध मानला जातो. किंवा बुधाबरोबर राहू किंवा केतू किंवा गुरु असेल तरी हे मानावेच लागते कि बुध मंद आहे. (वैदिक ज्योतिषात बुध गुरु हि युती उत्तम मानली गेली आहे पण ती फक्त उत्तम शिक्षणासाठी आणि सर्टिफाय होण्यास मदत करते हे नक्की) कुंडलीत बुध ज्या ग्रहाबरोबर बसलेला असतो त्याचे कारकतत्व घेतो म्हणजे त्याच्यासारखे परिणाम देण्यास सुरुवात करतो.

हेही वाचा : बुद्धादित्य योग : एक शुभ योग

कोणत्या कोणत्या कारणांनी बुध हा चांगले परिणाम देत नाही?

  • व्यक्ती जेव्हा जन्म घेत असतो तेव्हा त्याची नाळ कापली जाते. जेव्हा हि नाळ कापताना किंवा कापल्यावर जर त्या बाळाला काही इन्फेकशन किंवा कावीळ झाली असेल तर अशा बालकाचा बुध नक्कीच वरील प्रमाणे मंद असेल. ३ दिवसात जर बरे झाले नाही तर हा बुध अगदीच मंद मानला जातो.
  • जन्मापासून बाळाला गॅस्ट्रिक प्रॉब्लेम्स असतील तरी हा बुध कुंडलीत चांगले परिणाम देत नाही. जसा जसा जन्म झाल्यावर ते बाळ मोठे होत जाते आणि जर १४/१५ पर्यंत त्यास खोकला, स्वशनविकार, किंवा कफ इत्यादी आजार वारंवार त्रास देत असतील तरी बुध मंद मानला जातो.
  • बाळ जन्म झाल्यावर जेव्हा त्याच्या जन्माच्या वेळी किन्नर घरी येऊन जर असमाधानी होऊन जात असेल तर पूर्ण आयुष्यभर अशा जातकाचा बुध आयुष्यभर मंद होईल. अशा मुलांनी कधी व्यापार करू नये फक्त नोकरी करत आपले जीवन काढावे.
  • ज्यांचे काम होता होता थांबते त्याचा बुध नेहमीसाठी मंद असतो.
  • ज्या व्यक्ती आपल्या पर्स मध्ये भरपूर कधी न लागणारे छोटे छोटे कागद ठुसून ठुसून भरतात अशा लोकांचा बुध चांगले परिणाम देत नाही.
  • जे लोकं आपल्या घरात जुनी रद्दी साठवून ठेवतात त्यांचा बुध नक्की खराब होत असतो.
  • जर वरील प्रमाणे बुध जर खराब असेल तर व्यक्तीला कोणतेह वादन वाजविण्याचा छंद असेल तरी त्याचा बुध अजून खराब होत असतो.
  • व्यक्ती जर आपल्या घरात खूप मोठ्याने गाणी ऐकत असेल तरी त्याचा बुध खराब आहे असे मानण्यात येत असते
  • शंख शिटी कौडी अशा वस्तू घरात ठेवत असेल , मनी प्लांट घरात लावत असेल आणि त्याचे दात वारंवार खराब होत असतील तर नक्की समजावे कि बुध खराब असल्यामुळे ह्या समस्या येत आहेत.
  • बुध कमजोर असेल तर शरीरात नसांचा त्रास होत असतो.
  • देवी येणे, व्रण येणे, त्वचा रोग होणे, मुरूम होणे हे खराब बुधाची लक्षणे आहेत.
  • काही लोक आपल्या गच्चीवर घरातले मडके खराब झाल्यावर उलटे ठेवतात त्याने सुद्धा बुध खराब होत असतो
  • ज्या व्यक्तीची बहीण आणि मुलगी ह्याच्या हेल्थ करिअर किंवा वैवाहिक सुखात जीवनात खूप त्रास असतील तर नक्की समजावे त्याचा बुध हा वरील प्रमाणे खराब अवस्थेत असेल.
  • कधी कधी काही व्यक्ती आपल्या घरातील जुनी शिडी काढून टाकतात आणि नवीन बनवतात तेव्हा सुद्धा बुध चांगली फळे देत नाही. अशा वेळी नवीन आधी बनवून जुनी नंतर काढणे हा उपाय आहे. किंवा बुध चे उपाय करून हे कार्य करावे.
  • जर कुंडलीत बुध खराब असेल तर अशा व्यक्तींनी आपल्या घरात कधीही पोपट पिंजऱ्यात अडकवून पाळू नये गंभीर समस्या निर्माण होतात.
  • ज्या महिला काही कपडे किंवा वस्तू बाजारातून आणल्यानंतर त्यात समाधान मिळवीत नाहीत आणि जे पुरुष मोठे डील झाल्यावर ते डील कॅन्सल करतात अशांचा बुध हा कुंडलीत नक्की खराब अवस्थेत असतो. किंवा चांगला असेल तरी तो खराब होतो.
  • बुध खराब असेल तर अशा व्यक्ती गुटखा पान किंवा एखादे व्यसन सतत तोंडावाटे घेत असतात तरी बुध अशा व्यक्तींना सपोर्ट करत नाही.
  • एखाद्या शिक्षणावर फोकस करता येत नाही किंवा शिक्षणात निर्णय सतत बदलत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पत्रिकेत बुध खराब असल्यामुळे असे होण्याचे प्रमाण जास्त असते.
  • बुध खराब असेल तर दक्षिणेचा दरवाजा असेल तर आर्थिक परिस्थिती चांगली नसते त्यांनी उत्तर दिशेला दरवाजा असणारे घर घ्यावे.
  • ज्या व्यक्तींचा बुध खराब असतो अशा व्यक्ती चिडचिड करण्याऱ्या सुद्धा पाहिल्या जातात. किंवा मोठ्या मोठ्या गोष्टी करणाऱ्या आढळतात. अशा व्यक्ती लोकांना फुकट सल्ला देणाऱ्या सुद्धा पाहिल्या गेल्या आहेत.

वैदिक ज्योतिष किंवा कृष्णमूर्ती पद्धती नुसार बुध ग्रह चेक करताना मला काही रिझल्ट १००% मिळाले.

१) बुध जर ७ व्या भावाचा उपनक्षत्र स्वामी असेल तर विवाहाच्या वेळी मागे पुढे १५ दिवसात मोठ्या घटना गडबडीच्या जरूर घडतात. कितीही तयारी केली तरी गोंधळ हा होतोच होतो.

२) ७ व्या भावाचा उपनक्षत्र स्वामी जर बुध असेल तर २ विवाह हे नक्की होत असतात. ९०%

३) ७ व्या भावाचा उपनक्षत्र स्वामी जर बुध असेल तर पती हा व्यापारी असू शकेल किंवा तो मुलींच्या पत्रिकेत पती लहान वयाचा मिळण्याचे योग समजण्यास हरकत नसते ह्याच एका कारणाने २ विवाह होण्याचे टाळले जाते.

४) मुलींच्या पत्रिकेत ५ व्या भावाचा उपनक्षत्र स्वामी जर बुध असेल तर किंवा ५ व्या भावात बुध असेल तर मुलं होण्यास त्रास असतो अशा मुलींना श्वेत प्रदर चा त्रास असतो.

५) बुध हा ६ व्या घरात असेल किंवा के पी प्रमाणे तो उपनक्षत्र स्वामी असेल तर एकापेक्षा अनेक आजार अशा व्यक्तींना होतात एकच कोणता आजार नसतो. आणि ह्या व्यक्ती एकापेक्षा अनेक औषधांचा सपोर्ट घेत असतात. किंवा काही न काही औषधे स्वतःच्या मर्जीने घेत असतात.

६) ६ व्या स्थानात बुध असणाऱ्या पालकांची मुले घरात असतील तर त्यांच्या हातात सतत कैची असते आणि ती मुले कात्रीने सतत कागद कापत बसतात.

७) बुध जर तिसऱ्या स्थानात असेल तर अशा व्यक्तीचे कम्युनिकेशन स्किल उत्तम असते. व्यापारात असेल तर त्याचा पाय एका ठिकाणी नसतो फिरतीचा व्यापार करणारे असू शकतील. कष्ट करूनच कार्य होत असतात खूप मेहनत करावी लागते.

८) बुध शनी बरोबर असेल आणि दोन्ही ग्रहांमध्ये ३ किंवा ३ डिग्री च्या खाली अंतर असेल जसे बुध १ डिग्री आणि शनी २ डिग्री दोघांमधील अंतर ३ पेक्षा जास्त होत नाही अशा वेळी जर मुलगा असेल तर त्यास कधीही लहानपणापासून मुलींचे कपडे घालू नये किंवा जास्त नट्टापट्टा करू नये किंवा बाहुल्यांबरोबर खेळण्यास सांगू नये किंवा मुलींमध्ये जास्त वावर त्याचा असेल तर कमी करावा नाहीतर अशी मुले नंतर मुलींसारखे वागताना दिसतात नंतर त्यातून त्यांना बाहेर काढणे कठीण होते.

९) बुध रवी (सूर्य) जर पत्रिकेत एकाच घरात असतील आणि त्यांच्या डिग्री मध्ये वरील प्रमाणे १२ डिग्री पेक्षा जास्त अंतर असेल तर हा एक बुधातीत्य योग होतो अशा व्यक्तीला कधीही आयुष्यात उदरनिर्वाहाची काळजी नसते. पण जर हे अंतर १२ डिग्री पेक्षा कमी असेल तर अशाच व्यक्ती रोजच्या उदर्निवाहाची काळजी घेत असतात. पुढील उदरनिर्वाहाचे फिक्स करताना त्यांना त्रास होत असतो. हा बुधातीत्य योग मानू नये.

१०) प्रथम स्थानातील बुध हा व्यक्तीला हसमुख बनवतो, खूप बोलका चेहरा असतो किंवा अशा व्यक्तींचे वय हे दिसून येत नाही. त्याच्या लेखणीत ताकद असते.

११) दुसऱ्या स्थानातील बुध हा उत्तम टीचर असेल, दात खराब होतात, जीवनात वर खाली जास्त होते, पित्यास हा बुध उत्तम नसतो, अशा व्यक्तींनी घरात गोलाकार वस्तू जास्त ठेवू नयेत किंवा गोल वस्तूंचा साठा करून ठेवू नये.

१२) बुध ६ व्या स्थानात असेल तर अशा व्यक्तीला एक तरी कन्या असते आणि असेल तर तिचा विवाह उत्तर दिशेला करू नये. किंवा स्वतःच्या बहिणीला सुद्धा उत्तर दिशेला विवाह करायला सांगू नये. वैवाहिक सुखात अडथळे.

१३) बुध ६ व्या स्थानात असेल आणि नोकरीच्या शोधात जर प्रयत्न करत असेल त्या व्यक्तीला जर घरातील लहान मुलीने गुलाबाचे फुल दिले तर त्याच्या जॉब चे काम लगेच होते.

१४) बुध ६ व्या स्थानात असेल तर जीवनभर बोलणारे वर्क (करिअर) , किंवा कमिशन चे काम , ट्रेडिंग करत असेल तर त्याची प्रगती होते. अशा व्यक्तींनी अंगमेहनत करू नये.

१५) बुध ८ व्या भावात असेल तर व्यक्तीची बहीण किंवा मुलगी दुखी असते. किंवा जेल हॉस्पिटल च्या यात्रा होऊ शकते. दात दाढ चा त्रास होऊ शकेल.

१६) बुध ९ व्या भावात असेल तर पित्यास त्रास होतो, विदेश गमन होते, बहीण भावासाठी कष्टकारी असेल भाग्यात अडचणी निर्माण करेल.

१७) बुध ११ व्या भावात असेल तर स्त्री ला श्वेत प्रदर चा त्रास होतो. कोणत्याही पुरुष किंवा स्त्री ला ३४ वर्षापर्यंत त्रास.

१८) बुध १२ व्या स्थानात असेल तर असा व्यक्ती काही चेक न करता कोणत्याही कामात उड्या घेतो मागे पुढे कोणत्याही लॉसेस चा विचार करत नाही. स्त्री च्या कुंडलीत येथील बुध चांगली फळे देईल मात्र पती पत्नी दोघांच्या कुंडलीतील येथील बुध आरोग्यास चांगला नाही.

१९) बुध जर ५ व्या स्थानात किंवा ६ व्या स्थानात असेल तर व्यक्ती दुसऱ्या बद्दल विचार न करता लगेच बोलेल ते त्याचे खरे होते चांगले किंवा वाईट दोन्ही. सांभाळून विचार करून बोलावे. अशा व्यक्ती स्वतःबद्दल जर बोलत असतील तर ते खरे होत नाही.

२०) बुध ग्रह जर राहू बरोबर असेल तर अशा व्यक्तींनी खोटं कधी बोलू नये किंवा वायफळ बडबड करू नये मोठेपणा करू नये. जास्तीत जास्त वेजिटेरिअन होण्याचा प्रयत्न करावा.

२१) बुध जर मंगळाबरोबर पत्रिकेत बसला असेल तर जीवनात पैसा मिळतो पण पर्सनल लेव्हल ला जीवनातला एखादा निर्णय एकदा चुकला तर ती गोष्ट २०/२५ वर्षे रिपेअर होत नाही खास हे वयाच्या २२ ते ३० मध्ये चूक होते. जीवनातील एक तरी आयडिया फेल होताना दिसते.मग त्यातून कधीच बाहेर येत नाही व्यक्ती.

२२) बुध शनी पत्रिकेत एकत्र कुठेही असतील तर एक तरी भीती पूर्ण आयुष्यभर असते मनात घर करते. जी कधीच निघत नाही.

२३) मीन राशीत म्हणजे १२ नंबर बरोबर बुध पत्रिकेत असेल तर हा बुध नीच राशीत असतो त्यामुळे वैवाहिक सुखासाठी हा अजिबात चांगला नव्हे. ह्यांनी लग्न झाल्याबरोबर लगेच कोणतीही गुंतवणूक व्यापारात किंवा घरासाठी करू नये. फुकट जाते.

२४) लग्न करताना पती पत्नींच्या दोघांच्या जन्मतारखेत जर ५ अंक नसेल किंवा त्याचा मूलांक आणि भाग्यांक जर ५ शी संबंधित नसेल तर अशा पती पत्नीचा लग्न झाल्यापासून ५ वर्षात पैसा हा खूप वाया गेलेला असतो. पुढे जर त्यांना मुलं झाली आणि त्यांनी जर आपल्या जन्मतारखेत ५ अंक आणला नाही तर मात्र हि स्थिती कायम असते सांभाळावे जेव्हा तुम्ही पैशाचे मोठे व्यवहार कराल.

२५) बुध पत्रिकेत वरील कोणत्याही नियमाने खराब असेल तर किंवा आपल्या जन्मतारखेत ५ नंबर कोठेही नसेल आणि आपला मूलांक किंवा भाग्यांक ५ शी सुद्धा संबंधित नसेल तर आपल्या आपल्या घरात ब्रह्मस्थानी पूर्ण घराच्या मधोमध कोणतेही बांधकाम नसावे एखादे त्यावरून जाणारे कन्स्ट्रक्शन हे आपल्या पोटासंबंधित आजारांना आमंत्रण देऊ शकतील.

२६) बुध पत्रिकेत खराब असेल तर घरात उत्तरेला कोठेही टॉयलेट असणे किचन असणे किंवा तेथे लाल वस्तूंचा जास्त भरमार असणे हे त्या घरातून लग्न करून गेलेल्या मुलींच्या वैवाहिक सुखात व्यत्यय आणण्याचा प्रकार आहे.

बुधाचे उपाय

  • जे व्यापार करतात अशा व्यक्तींनी कधीही घरातील तिजोरी खाली ठेवू नये. त्यात ५ बदाम आणि ५ खजूर लाल कपड्यात बांधून ठेवावे त्याने धनाबद्दल चे सर्व कष्ट दूर होतात.
  • ज्या व्यक्तीच्या बहिणींच्या किंवा मुलींच्या आयुष्यात खूप त्रास सुरु आहेत त्यांनी घरात शंख, कौडी,वाद्य, इलेकट्रोनिक बंद वस्तू, रबर प्लांट, मनी प्लांट ठेवू नये.
  • घरात मोठ्या आवाजात गाणी ऐकू नये.
  • नेहमी वरचेवर कन्या पूजन करत राहावे . त्यांना स्टेशनरी किंवा बुक्स देत राहावे.
  • कुंडलीत बुध वाईट परिणाम देत असेल तर पळसाची १०१ पाने घ्यावीत आणि त्यास जलप्रवीत करावे.
  • कुंडलीत जर बुधाबरोबर चंद्र सुद्धा पीडित असेल तर पळसाच्या १०१ पानांना दुधाने धुवावे आणि जलप्रवाहीत करावे.
  • जर वरील उपाय करता आला नाही तर मंगळवारी रात्री झोपताना आपल्या डॊक्या शेजारी अक्खे मूग भिजवून ठेवून द्यावेत आणि सकाळी ते पक्षांना टाकावे.

हे उपाय करत असताना विष्णू सहस्त्रनाम आणि गणेश अथर्वशीर्ष खास बुध ग्रहासाठी वाचनात असावेच.

नोट- वरील विवेचन हे जरी आपल्याशी जुळत नसेल तर त्यास बुध पत्रिकेत केव्हा केव्हा खूप कमी डिग्रीचा किंवा बॉर्डर वर असू शकेल. त्यासाठी आपली कप्स कुंडली सुद्धा चेक करून घ्यावी कि लग्न कुंडलीतील बुध तेथून सरकला आहे का ते एकदा पाहून घ्यावे.
नाहीतर सरळ ज्योतिषांची मदत घ्यावी.

धन्यवाद…..!
श्री दत्तगुरु ज्योतिष

www.shreedattagurujyotish.com

Leave a Reply