You are currently viewing वक्री गुरु चा प्रभाव करिअर ची लॉटरी केव्हा केव्हा लागेल

शिक्षणाचा उपयोग करिअर साठी किती? वक्री गुरु चा प्रभाव करिअर ची लॉटरी केव्हा केव्हा लागेल.
EFFECT OF VAKRI – RETRO GURU FOR EDUCATION PART

vakri guru
vakri guru

मुळात आज शिक्षण घेताना नेहमी करिअर चा विचार केला जातो कि मी कॉमर्स घेऊ कि आर्टस् घेऊ कि सायन्स ला जाऊ. पण कुणी असा विचार करते का कि मी जे शिक्षण घेणार आहे त्याचा उपयोग माझ्या करिअर मध्ये किती होईल. गुरु वक्री असेल तर त्याचा माझ्या पत्रिकेवर काय परिणाम होईल? ह्याचे विवेचन खालील लेखात वाचून सहज कळेल.

गुरु वक्री कसा हे कुणालाही समजण्यासाठी वर दिलेली इमेज आपल्याला मदत करू शकेल.

वक्री गुरु

ज्या पत्रिकेत गुरु वक्री असेल अशा कित्येक पत्रिका पाहताना शिक्षण घेऊन करिअर साठी त्या सर्टिफिकेट चा उपयोग करताना दिसतात त्यांना घेतलेल्या शिक्षणामधून सेम करिअर मध्ये जाताना ४/५ वर्षे ग्याप पडतो. ह्या ४/५ वर्षात एकतर ते दुसऱ्या कोणत्यातरी क्षेत्रात स्वतःला ट्राय करत असतात किंवा जर घेतलेल्या सर्टिफिकेट च्या करिअर मध्ये असतील तर तिथे त्या ४/५ वर्षे तरी समाधानी नसतात.
सल्ला — जर जास्तच जिद्द असेल कि जे शिक्षण घेतले आहे त्यातच प्रगती करण्यासाठी निदान ३/४ वर्षे तरी सतत प्रयत्न करावा. नंतर आपली जिद्द फळाला येईल नक्की. किंवा अगदीच काही होत नसेल तर लगेच दुसरा एखादा कोर्से करून त्यात आपली प्रगती करण्याचा प्रयत्न करावा.

हेही वाचा :- मला समजलेला ज्योतिष मधील गुरु ग्रह

वक्री गुरुचा अर्थ असा कि आपण जेव्हा जन्म घेतला तेव्हा त्याची स्थिती गती हि मंद होती आणि तो इतर ग्रहांच्या गणनेनुसार मागे मागे पडत गेला. ह्या स्थितीत गुरुची जी कारकतत्वे असतात ती व्यक्तीला मिळण्यास उशीर होतो किंवा त्यात जास्त प्रयत्न करावा लागतो हे नक्की. म्हणून व्यक्तीची कधी कधी खूप चिडचिड होते आणि त्यामुळे त्याचा प्राथमिक शिक्षणावर परिणाम होतो जर हा झाला नाही तर आणि शिक्षण पूर्ण झाले तरी पुढे त्याच मार्गाने करिअर करण्यासाठी पैसा मिळविण्यासाठी अडचणी निर्माण होतात.

काही पत्रिका वक्री गुरु असताना बऱ्याच अंशी करिअर मध्ये खूप नावाजलेल्या पाहिल्या तेव्हा त्यांनी बेसिक शिक्षण हे गरजेपुरता घेऊन नंतर दुसऱ्या एखाद्या शिक्षणाकडे कल दाखवून स्वतःला करिअर पैसा ह्या विषयात चांगले प्रेसेंट केलेले दिसले.

तेव्हा पालकांना नम्र विनंती कि ज्या ज्या मुलांच्या पत्रिकेत गुरु वक्री असेल तर नक्की ह्याचा विचार करून योग्य ज्योतिषांचा सल्ला घ्यावा हि विनंती.

लॉटरी केव्हा लागेल

प्रत्येक वर्षी गुरुहा एका राशीतून दुसऱ्या राशीत जात असतोच. कारण गुरूला एका राशीत साधारण एक वर्ष लागते. ह्या कालावधीत तो कमीत कमी ७०/८० दिवस तरी त्या राशीत आपला स्पीड कमी कमी करून मागे मागे जात असतो किंवा त्याचे मार्गक्रमण हे स्लो होते तेव्हा गुरु वक्री आहे असे मानतात. हि परिस्तिथी असताना आपला जन्म झालेला असतो आणि पत्रिकेत गुरु वक्री आहे असे दाखवतात.
पण तुम्ही जेव्हा खूप मेहनत करून करिअर साठी प्रयत्न करता तेव्हा जेव्हा गुरु त्या वर्षी कोण्या पिरियड मध्ये वक्री आहे हे पहा आणि त्याच्या काही दिवसात मस्त मजल मारा नक्की त्या वेळी घेतलेले निर्णय हे तुम्हाला लॉटरी लावल्याशिवाय राहणार नाही.

कारण जेव्हा अवकाशातील गुरु वक्री असेल आणि तुमच्या पत्रिकेतील जन्माचा गुरु सुद्धा वक्री होता तर हि स्थिती (- + – = +) होते.
म्हणून प्रत्येक वर्षी गुरु जेव्हा वक्री असेल तो एक लॉटरी लागण्याचा पिरियड असतो. कोणत्या ना कोणत्या वर्षी तरी त्यात चांगला परिणाम दिसेल हे नक्की.

ह्याची गणना पंचांग मध्ये पाहून सहज समजू शकेल. त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून प्रत्येक वर्षाला गुरु केव्हा रेट्रो होतो ते पाहू शकता. https://www.drikpanchang.com/planet/retrograde/guru-retrograde-date-time.html

२९ जुलै ते २४ नोव्हेंबर गुरु वक्री असेल २०२२ मध्ये. म्हणजे वरील जन्म घेणाऱ्या बालकांच्या पत्रिकेत गुरु हा वक्री म्हणून लिहून येईल.

गुरु वक्री नसताना सुद्धा जर आपल्याला वरील विषय जाणवले तरी त्या मागे इतर ग्रह सुद्धा कारणीभूत होतात. पण तरी गुरु कसा आहे हे नक्की चेक करावा.

धन्यवाद…..!

Leave a Reply