You are currently viewing सरस्वती योग | SARSWATI YOGA

सरस्वती योग | SARSWATI YOGA

  • कुंडलीच्या ५ व्या स्थानावरून जर हा योग पाहावयाचा असेल तर त्या स्थानाची ताकद किती आहे हे पाहावे लागेल. ५ व्या स्थानाचा लॉर्ड जर केंद्र स्थानात असेल २/४/७/१० केंद्र स्थानी असेल किंवा स्वतःच्या राशीत असेल किंवा उच्च राशीत असेल किंवा ११ व्या स्थानी असेल किंवा २ ऱ्या स्थानी असेल तर आपल्या पत्रिकेत सरस्वती योग बनतो.
  • पहिल्या स्थानाचा स्वामी आणि ५ व्या स्थानाचा स्वामी हे एकमेकांच्या राशीत बसले असतील म्हणजे ५ व्या स्थानाचा स्वामी १ ल्या स्थानी आणि १ ल्या स्थानाचा स्वामी ५ व्या स्थानात = परिवर्तन योग मध्ये असेल तर आपल्या पत्रिकेत सरस्वती योग बनेल.
  • पहिल्या स्थानाचा स्वामी आणि ५ व्या स्थानाचा स्वामी जर ११ व्या भावात बसले असतील तरी हा सरस्वती योग बनतो.
  • ११ व्या स्थानाचा अधिपती आणि ५ व्या स्थानाचा अधिपती हा जर एकमेकांच्या राशीत असतील = परिवर्तन योग तरी सरस्वती योग बनतो.

हेही वाचा :- अष्टकवर्ग सूर्य भिन्नाष्टक आणि आपली भाग्योदयक दिशा

  • गुरु शुक्र बुध जर केंद्र स्थानी असतील आणि जर ते त्यात स्वतःच्या राशीत किंवा उच्च राशीत असतील तरी सरस्वती योग बनेल.
  • सूर्य आणि बुध एकाच स्थानी असणे. त्यात ते १२ डिग्री पेक्षा लांब असणे. सूर्य किंवा बुध स्वराशीचा किंवा उच्च राशीत एकाच स्थानी असणे. वरील स्थिती ची युती जर १/४/५/७/२/५/९ स्थानी असणे. सूर्य आणि बुधाच्या वरील जास्तीत जास्त स्थिती आपल्याला मजबूत सरस्वती योग देतात.
  • गुरु कर्केचा आणि चंद्र गुरु च्या राशीत (एकमेकांच्या राशीत) असताना एकमेकांना पाहत असतील तर सरस्वती योग होतो. अशा वेळी व्यक्ती आपल्या विद्येने ओळखला जातो आणि विद्येवर त्याचे प्रभुत्व असून हा चांगल्या करिअर मध्ये पाहण्यात येतो. नम्रपणे जीवन व्यतीत करणारा सुद्धा असतो
  • १/५/११ व्या स्थानावर राहू शनी केतू ची दृष्टी नसावी. १/५/११ चे लॉर्ड राहू केतू शनी बरोबर बसलेले नसावेत. १/५/११ चे लॉर्ड हे वक्री नसावेत.

वरील पैकी जर आपल्या पत्रिकेत कुठूनही सरस्वती योग पाहण्यात आला तर अशा व्यक्ती खूप ज्ञानी असतील आणि त्यांच्या स्किल चा उपयोग करून आयुष्य सुंदर बनवतील. विद्यार्थ्यांसाठी हा योग अमृत एक संजीवनी ठरतो.

धन्यवाद…..!

Leave a Reply