लग्न झाल्यावर कित्येक जोडप्याना बाळ होण्यासाठी वण वण भटकताना पहिले आहे. हा डॉक्टर बघ तो ज्योतिषी बघ असे करून ते थकून गेलेले दिसतात. जर ह्या जोडप्याना कोणताही मेडिकल इशू / शारीरिक इशू नसेल आणि बाळ होत नसेल तर खालील लिखाण हे आपल्यासाठी आहे. (Trying for baby? Then don’t do this.)
- पत्रिकेचे ५ वे स्थान संतान च्या सुखाचे संतान होण्याचे असते.
- एकादश स्थान हे पत्रिकेचे लाभ स्थान असते.
- दुसरे स्थान हे कुटुंब स्थान असते.
- चौथे स्थान हे प्रॉपर्टीज चे असते.
हेही वाचा : तुमचा विवाह कुणाबरोबर होण्याचा संभव असतो .
जेव्हा आम्ही पाहतो कि हि तिन्ही स्थाने दशा महादशा मध्ये ऍक्टिव्हेट असतात आणि तरी बाळ होत नाही तर असे वाटते कि आमचा ज्योतिष अभ्यास हा चुकीचा होत आहे. पण ४/५ वेळा जेव्हा ती जोडपी येत असतात तेव्हा एक दोन प्रश्न अजून विचारतात कि आमच्या घराचे / प्रॉपर्टीज चे / गावच्या जमिनीचे काय होईल? झाले घोडे इथेच अडलेले असते.
एक लक्षात घ्या पत्रिकेचे ५ वे स्थान हे संततीचे असते आणि त्याच्या मागील ४थे स्थान हे घर जमीन / प्रॉपर्टीज चे असते. ज्योतिष नियमाप्रमाणे कोणत्याही स्थानाच्या मागील स्थान हे त्या स्थानाच्या सिम्टम्स चा नाश करते. आणि ते ज्योतिषांकडे आलेल्या वरील जोडपी त्यांच्याकडे बाळाचा प्रश्न असताना ४थ्या स्थानाच्या ऍक्टिव्हिटीचा जास्त विचार करत असतात. म्हणजे घर घे जमीन घे, प्रॉपर्टीज चा जास्तीत जास्त विचार कर, किंवा ११/११ महिन्यांनी काही जोडपी परिस्थिती मुळे घरे बदलत राहतात. किंवा घरासाठी बँकेत लोन च्या मागे असतात.
हे जर तुम्ही सुद्धा करत असाल तर आधी हे थांबवा. तुम्ही ५ व्या स्थानाच्या प्रयत्नात म्हणजे बाळ होण्याच्या प्रयत्नात असताना चौथ्या स्थानाच्या म्हणजे प्रॉपर्टीज बद्दल कोणतीही ऍक्टिव्हिटी करत असताना कॉन्सिव्ह होणे मुळीच शक्य नाही.
आणि जर असे झाले तरी ते ९ महिने पूर्ण होणे शक्य नाही. तरी कृपया पत्रिकेच्या उलट वागताना तुमची महादशा २/५/११ ह्या स्थानांशी संबंधित असताना फक्त एकच ऍक्टिव्हिटी आधी पूर्ण होऊ द्या.
म्हणून मी नेहमी नवीन जोडप्याना सांगत असतो जेव्हा आपण लग्न कराल तर पहिली ३ वर्षे आपल्याला आधी काय करायचे आहे ते ठरवून घ्या आणि जर वरील बाळ होण्याचे प्रयत्न करत असाल तर ४थ्या स्थानाचा विचार करू नका जास्त.
कुंडली इमेज मध्ये ५ वे स्थान आणि ४थे स्थान हे दाखविले आहे ते पाहून घ्या. हि दोन्ही स्थाने एकत्र ऍक्टिव्हेट करू नका निदान बाळ होईपर्यंत.
धन्यवाद…..!