You are currently viewing नीच गुरु आणि शिक्षण व्यवस्था

नीच गुरु ची व्याख्या

पत्रिकेत नीच गुरु ची व्याख्या म्हणजे गुरु १० नंबर बरोबर लिहिला असेल म्हणजे तो शनीच्या मकर राशीत असताना आपला जन्म झाला आहे हे दाखवितो. जर तो ५ डिग्री पर्यंत असेल तर तो इथे परम नीच होतो.

नीच गुरु चा पूर्ण अभ्यास कसा करावा?

  • नीच गुरुचा अभ्यास करताना तो किती डिग्री वर आहे?
  • नीच गुरु कोणत्या स्थानात (१० नंबर) मकर राशीत आला आहे.?
  • नीच गुरु त्या लग्न पत्रिकेत कारक आहे का?
  • नीच गुरुवर कोणत्या कोणत्या ग्रहांची दृष्टी आहे.?
  • नीच गुरु नवमांश कुंडलीत कसा आहे?
  • गुरु कोणत्या नक्षत्रात आहे? जर तो मकर राशीत आहे तर तो उत्तराषाढा किंवा श्रवण किंवा धनिष्ठा ह्या पैकी एका नक्षत्री असेल.

गुरु पासून व्यक्तीला मिळणारी कारकत्वें

  • गुरु व्यक्तीला ज्ञानी बनवतो
  • गुरु व्यक्तीला अध्यात्माकडे वळवतो
  • गुरु व्यक्तीला पूजापाठ, धर्म ह्यावर विश्वास जागृत करवतो.
  • गुरु व्यक्तीला सात्विक ठेवतो.
  • गुरु व्यक्तीला परिवार देतो आणि पारिवारिक ठेवतो.
  • गुरु व्यक्तीला चांगले संबंध प्रस्थापित करण्यास मदत करतो

शिक्षण आणि नीच गुरुची सामान्य/असामान्य फळे

  • शिक्षण घेत असताना अशा नीच अवस्थेतील गुरु शिक्षण व्यवस्थेत बऱ्याच अडचणी निर्माण करेल.
  • किंवा शिक्षण झाले तरी त्या ज्ञानाचा सदुपयोग करण्यास अडचणी येऊ शकतील.
  • काही जणांना विद्यार्थी दशेत आपले आचरण आणि शिक्षण व्यवस्थेतील नियम पाळणे कठीण होऊन बसते. हे घराण्यातील संस्कारांवर सुद्धा कमी जास्त परिणाम दाखवितात.
  • काही विद्यार्थीदशेतील मुले ह्यात शिक्षण सोडून वेगळेच शिकण्याकडे आपला कल दाखवितात.
  • काही विद्यार्थी नीच गुरुच्या अवस्थेत शाळा किंवा कॉलेज ला दांडी मारून कोणत्या तरी भानगडी करताना सुद्धा दिसले.
  • काही नीच गुरुवाले विद्यार्थी दशेत व्यवस्थेशी झगडा करताना दिसले.
  • कॉपी करणारे विद्यार्थी, शिक्षकांना उलट बोलणारे , शैक्षणिक कोणतीही फीस डुबविणारे , विद्यार्थीदशेत नशा करणारे विद्यार्थी हे नीच गुरूच्या प्रभावाखाली मोडतात.

नीच गुरु असेल तर हे सर्व च्या सर्व होणार नाही पण ह्यातील एखादे लक्षण येण्याचे जास्त संकेत मिळतात .

हि सर्व फळे चेक करताना त्या जातकाचे लग्न कोणते, आणि नवमांश कुंडलीत त्याची स्थिती कशी आहे, दशा महादशा कशा आहेत ह्यावर जरूर विचार करावा लागतो.

हेही वाचा :- मला समजलेला ज्योतिष मधील गुरु ग्रह

नीच गुरुच्या बाबतीत माझे मत

नीच ह्याचा अर्थ सामाजिक तत्वावर त्या ग्रहाकडून काही आशा बाळगू नये असे माझे मत आहे म्हणून जर विद्यार्थी दशेतील नीच गुरूच्या अवस्थेतील काही पत्रिका मला वरील काहीच दिसले नाही उलट खूप चांगला अभ्यास, शैक्षणिक प्रगती व्यवस्थित झालेली दिसली तर त्याचे कारण त्या विद्यार्थ्याने काही तरी सामाजिक नियम तोडून केलेले प्रयत्न म्हणजे त्या गुरूला जे लागते ते दिले आहे आणि तो गुरु त्याच्यावर खुश आहे.

नीच करायचेच असेल तर तुम्ही असे करा जे समाजाला काही प्रमाणात उपयोगी पडेल. आणि भोग सुद्धा कमी होईल. जो मागच्या जन्मी पासून मिळालेला असतो.

हि जरी माझी व्याख्या काही जणांना न पटणारी असली तरी त्याचा उपयोग आपल्या विद्यार्थ्यांकडून करून घ्यावा. तो असा कि त्यांना प्राथमिक शिक्षण झाल्याबरोबर एका वेगळ्या सिस्टम मध्ये शिकविण्याचा प्रयत्न करावा जे तुमच्या घराण्यात कोणी केले नसेल. म्हणजेच इथे परंपरा मोडण्याचा प्रकार होतो आणि तो विद्यार्थी सक्सेस होतो.

म्हणजे समजा त्या घराण्यात काका वडील आजोबा पणजोबा ह्यंनी कधीच व्यावसायिक शिक्षण घेतले नसेल तर त्याला हे करायला लावावे म्हणजे इथे नीच गुरु काम करेल. उगाच डॉक्टर चा मुलगा डॉक्टरच झाला पाहिजे ह्याची जिद्द करू नका हे होत नाही. आणि जर झाले तर त्याच्या पुढील भाग्योदय थांबतो. करिअर करून पैसा प्रॉपर्टी मिळेल पण वैवाहिक सुखात कमीपणा येईल.

दुसरे नीच गुरु काही जणांना विद्यार्थी दशेत कमविताना चांगले यश देतो असे लक्षात आले आहे म्हणून आशा विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेतच पैसा कमविण्यासाठी बाहेर पाठवू शकता.

नीच गुरुच्या काही पत्रिका त्याचे ज्ञान लावताना त्याचा उलट सुलट उपयोग करताना दिसले म्हणून हे विद्यार्थी कोणत्याही रासायनिक पद्धतीचे शिक्षण करताना सुद्धा दिसले.

फक्त एक काम करायचे असते कि जे सगळे ज्या मार्गाने जात आहेत तो रूट नीच गुरु धरणार नाही हे नक्की मग आधीच आपण त्याचा मार्ग बदलवा परिणाम तुमच्या समोर असतील.

पुढे नीच गुरु लग्न कसे करावे, पैसा कसा कमवावा, संतती निर्माण करताना जो त्रास होत आहे त्यावर विवेचन करेन.

नोट

नीच गुरु / वक्री गुरु ह्या दोन पोस्ट वाचल्या नंतर जर ह्यातले काहीही पटत नसेल किंवा तसे होत नसेल तरी हा भाग खूप टेन्शन वाढविणारा होतो हे लक्षात घ्या.

जर अशी एखादी पत्रिका आली कि गुरु वक्री आणि घेतलेल्या शिक्षणात तिला करिअर करण्यासाठी काहीच अडचणी आल्या नाहीत किंवा शिक्षण करताना सुद्धा काही अडचणी आल्या नाहीत.

किंवा

जर अशी एखादी पत्रिका आणि कि गुरु नीच आहे आणि वरील कोणतेही दिलेले फळ त्याला न मिळत रेगुलर शिक्षण झाले आणि परंपरागत नियम पळून झाले आणि करिअर सुद्धा त्याच मार्गाने झाले तर मग…….???????

पुढे विवाह होतो का पहा झाला तर टिकतो का पहा. मुले होतात का पहा झाली तर आरोग्य साथ देते का पहा ? ह्यातील एक तरी गोष्ट कधीच मिळताना दिसली नाही.
बऱ्याच पत्रिका वरील विषयात अडकलेल्या मिळत असतील तर चेक करा तुम्ही सर्टिफिकेट कशी मिळवलेली आणि त्या सर्टिफिकेट चा उपयोग करिअर मध्ये कसा करत आहात.

जास्त विचार न करता गुरु नीच किंवा वक्री दिसला तर त्याचे योग्य मार्गदर्शन योग्य ज्योतिषांकडून करून घ्या.

धन्यवाद…..!

This Post Has One Comment

  1. वैभवी

    नीच गुरु १८ अंश , चंद्र १७ अंश , युती १० नंबर १२ व्या घरात असेल तर काय होईल.

Leave a Reply