You are currently viewing बाळाचे नाव ठेवताय ? नक्की वाचा

बाळाचे नाव ठेवताय ? नक्की वाचा | IMPORTANCE OF NAMKARAN

काहींच्या मते नावात काय आहे? अशी चर्चा असते कि नावात जर ताकद असेल तर राम रावण आणि कृष्ण कंस ह्यांची नाव राशी हि एकच होती. मग दोघांमध्ये फरक का?

काही जण आपल्या मुलांची नावे जर मुलगा झाला तर आईच्या पहिल्या अक्षरावरून ठेवतात आणि मुलगी झाली तर वडिलांच्या पहिल्या अक्षराचा उपयोग करतात.

काही जण हा अधिकार आपल्या बाळाच्या आत्याला देतात नाव तिच्या इच्छेने ठेवले जाते. काही जण जन्मराशी वरून नाव ठेवतात आणि काही जण नक्षत्र वरून सुद्धा नाव ठेवतात.

काही जणांच्या मते जी राशी बाळाची येते त्यावरून जन्मराशीवरून नाव ठेवू नये असे सांगण्यात येते कारण जारण मरण करणी त्या नावाने करण्याची काही समाजात प्रथा असते. म्हणून त्याच्या नक्षत्र आणि राशी ला धोका पोहचू नये ह्यासाठी जन्मराशीचे नाव हे गुपित ठेवले जाते आणि बाळाला हाक मारण्याचे नाव हे वेगळे ठेवले जाते.

नाव हे एकदा ठेवले तर ते त्या व्यक्तीच्या शेवटपर्यंत राहते आणि त्याच्या मृत्यूनंतर सुद्धा त्याची डेथ सर्टिफिकेट त्याच नावानी घेतली जाते म्हणजे नावात किती दम आहे हे आपणास कळले असेलच.

जरी १०० जणांचे एकच नाव असेल तर सर्वांचे भविष्य हे सारखे होणार नाही पण जर त्याच्या पत्रिकेवरून नाव ठेवले तर त्याच्या कर्माला ते नाव सूट होईल. म्हणजे एकाच राशीवरून सर्वांचे नाव जर सारखे असेल तर त्यात एक नक्की राम आणि दुसरा रावण होऊ शकतो कारण ते नाव एकाला सूट झाले आणि एकाने त्या नावावरून आपले कर्म बदलले.

तसे आपल्या माहितीसाठी सांगतो कि राम आणि कृष्ण हे त्यांच्या राशीवरून ठेवलेले नाव नाही कारण राशीवरून नाव ठेवण्याची प्रथा हि सध्या प्रचलित झाली असे माझे मत आहे.

राशी वरून कसे नाव ठेवतात हे खाली दिलेल्या चार्ट वरून आपणास सहज समजून येईल.

rashi name letters

जर वरील प्रमाणे नावे ठेवली तर एकाच राशीच्या सर्वाना ते सूट होणार नाही हे मी आधीच आपल्याला समजून सांगितले आहे. त्याचे उदाहरण घ्यायचे असल्यास जर कुणाचा अमावस्येला जन्म झाला असेल आणि त्याच्या चन्द्र राशीवरून नाव ठेवले. किंवा कुणाचा चंद्र निर्बली असेल आणि त्याचे नाव त्यांच्या चंद्र राशीवरून ठेवले तर गडबड होऊ शकेल आणि त्याला त्या राशीचे चांगले व्हायब्रेशन मिळण्यास मदत होणार नाही उलट नुकसानच होईल.

समजा चंद्राबरोबर एक दोन क्रूर घर बसले असतील तरी ती जन्माच्या वेळी त्या राशीचा मालक जर ६, ८, १२ घरात बसला असेल तर ती आलेली राशी त्या बाळाला सूट होणार नाही तर मग राशी जी आली आहे त्या राशीवरून नाव ठेवण्याचा हट्ट का?

कदाचित अपल्याला समजले असेल कि मी काय समजविण्याचा प्रयत्न करत आहे.

आता आपल्याला मी काय काय पहावे एखाद्या निष्णात ज्योतिषाने किंवा तज्ज्ञाने जाणकाराने ते समजावितो जेणेकरून त्या बाळाला उत्तम असे नाव दिले जाईल.

  • प्रथम त्याचा चंद्र पाहावा त्याची डिग्री पहावी त्या चंद्रात किती बळ आहे ते पहावे आणि नक्की करावे कि चंद्र राशीवरून नाव ठेवावे कि नाही.
  • नंतर त्याचे नक्षत्र चेक करावे त्या नक्षत्राचे अक्षर सुद्धा काही मदत करू शकेल का त्या नक्षत्रात कोणते क्रूर ग्रह आलेत का ते सुद्धा चेक करावे.
  • वरील दोन्ही मध्ये नाव ठेवताना जरा जरी अडथळा वाटला तर त्या नावाचे पहिले अक्षर शोधण्यासाठी कुंडलीचे पहिले स्थान, पंचम स्थान आणि भाग्य स्थान ह्यात किती ताकद आहे हे पाहून सरळ सर्वात जास्त बलवान असलेल्या राशीचे लग्नस्थानावरून पंचमस्थानावरून किंवा भाग्यस्थानावरून नाव ठेवावे.
  • काही जण आपल्या मुलाचे नाव श्रीमंत ठेवतात किंवा धनाढ्य लोकांची नावे हि आपल्या मुलांना देतात हे बरोबर नाही कारण दुसरे स्थान जर मजबूत नसेल तर त्याचा पुढं हशा होऊ शकेल जर त्याच्याकडे योग्य प्रमाणात पैसाच नसेल. तर अशी चूक करताना नेहमी कुंडलीचे दुसरे स्थान नेहमी चेक करावे.
  • काही जण हिरो हिरोईन च्या नावाने आपल्या बाळाचे नाव ठेवतात. पण ते योग्य नाही असे मला वाटते.
  • काही जणांना देवांची नावे ठेवण्याची सुद्धा सवय असते पण नंतर त्या आचरणात मुले दिसली नाही तर मात्र त्यांना त्या नावाचा त्रास होऊ शकेल म्हणून ह्या बाबतीत माझे मत आपणास कदाचित पटणार नाही. मी माझे विचार मांडले निर्णय आपला असेल.

नुमरॉलॉजि आणि नावाचे स्पेल्लिंग

नुमरॉलॉजि प्रमाणे सुद्धा हे चेक करावे कि आपल्या बाळाच्या नावाची स्पेल्लिंग हि किती अंकावर जाते त्या अंकाची व्हायब्रेशन हि बाळाच्या मूलांक आणि भाग्यांकाशी निगडित आहे का.

ह्यात असाहि विचार करण्यात येतॊ कि जर आपण बाळाचे नाव आणि आईवडिलांचे चे नाव हे सूट होत आहे का कारण त्यांच्या नावाचे पहिले अक्षरावर किंवा त्यांच्या नावात असलेल्या स्पेल्लिंग ची संख्या हि पालकांच्या नावाच्या अक्षराला किंवा त्यांच्या नुमरॉलॉजि प्रमाणे पहावी.

ह्या सर्व बाजू नक्की आपण एखाद्या तज्ज्ञाची मदत घेऊन नक्की करा जेव्हा आपण आपल्या बाळाचे नाव ठेवाल. काही जण त्यात सुद्धा कंजुषी करताना दिसतात जेव्हा लोक एखाद्या ज्योतिषाची किंवा ब्राह्मणाची मदत घेतात. बाळाच्या बारशाला लोक २०/२५ हजार सुद्धा खर्च करतील पण एव्हढी मेहनत करून जो बाळाचे नाव सुचवेल त्यास त्याने किरकोळ दक्षिणा देण्यास सुद्धा दोन पाऊले मागे घेतात.

प्रत्येकाने ज्योतिषांना विचारूनच नाव ठेवण्याची गरज आहे असे मला वाटत नाही. पण जे नाव ठेवत आहेत त्याचा अर्थ आपल्याला माहित असला पाहिजे हीच अपेक्षा.

हेही वाचा:- मूलांक आणि भाग्यांकाचा मेळ आपल्याकडे आहे का ?

धन्यवाद…..!
श्री दत्तगुरु ज्योतिष
9821817768
7506737519

Leave a Reply