You are currently viewing कर्क राशीचा मंगळ १००% परिणाम देणार

कर्क राशीचा मंगळ १००% परिणाम देणार

वरील लग्न कुंडलीत मंगळ ४ नंबर बरोबर लिहिला आहे. तो सर्व स्थानी लिहिला आहे आपल्या पत्रिकेत कोणत्याही एका स्थानात हा मंगळ ४ नंबर मध्ये म्हणजेच कर्क राशीत असेल.

कर्क राशीचा मंगळ म्हणजे नीच राशीत मंगळ. कोणतेही घराचे स्वप्न पूर्ण करणे हे पत्रिकेत शनी आणि मंगळ वरून पहिले जाते.

आपल्या सुद्धा पत्रिकेत ४ नंबर बरोबर मंगळ लिहिला असेल तर आणि घर घेण्याचे उत्तम योग पत्रिकेत असतील तर तुम्ही घर घेऊ शकता.

अशा व्यक्ती ४/५ घरे सुद्धा घेऊ शकतील पण त्या स्वतःच्या नावावर असलेल्या घरात ते स्वतः राहू शकत नाही हे १००% टक्के. जर राहिले तर त्यांना बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागते असा अभ्यास माझ्या प्रॅक्टिस ने झाला आहे.

  • वरील विधान कमी परिणाम देऊ शकेल जर आपला मंगळ पत्रिकेत ० ते ५ डिग्री वर किंवा २६ ते २९.५९ डिग्री वर असेल.
  • वरील विधानात कमी पणा येईल जेव्हा चतुर्थ स्थान फार मजबूत असेल त्यावर शुभ ग्रहाची उत्तम स्थानातून दृष्टी असेल.
  • वरील विधानात कमी पणा येऊ शकेल जर आपल्या पत्रिकेत नवमांश कुंडलीत मंगळ हा उत्तम असेल.
  • वरील विधानात कमी पणा येऊ शकेल जर आपले वय हे ४२ नंतर असेल.

मात्र हे जरी असेल तरी थोडा तरी परिणाम दिसेलच म्हणून अशा व्यक्तींना एकच सल्ला दिला जातो जर आपला मंगळ ४ नंबर मध्ये लिहिला असेल तर राहण्यासाठी घर घेताना किंवा त्यात वास्तव्यात असताना योग्य ज्योतिषांचा सल्ला घ्या. आणि जरी राहत असाल तरी मंगळाचे उपाय हे करत राहा.

ह्या बद्दल आपल्याला न पटणारे माझे विचार पटले तर उत्तम नाहीतर सोडून द्या.

बरेच जण समाजात एजंट चा व्यवसाय करतात दुसऱ्याला घर मिळवून देण्याचा प्रयत्न ते करत असतात. अशा वेळी खोटे बोलून किंवा काही युक्त्या करून काही जण आपल्या फायद्यासाठी दुसऱ्याला फसवितात.

काही जण दुसऱ्याची प्रॉपर्टीज हडप करतात. भावाभावांत प्रॉपर्टीज च्या हिस्स्यासाठी खून मारामाऱ्या होतात. काही जण गरज नसताना एव्हढ्या जमिनी घरे घेऊन ठेवतात कि त्याचा उपयोग हा ते स्वतः तर करत नाहीत किंवा दुसऱ्याला सुद्धा करायला देत नाहीत.

काही जण जमीन बांगला घरे अशा कोणत्याही व्यवहारात खोटे काम करतात. अशी सर्व कृत्ये हे मागील जन्मात केलेली असतील तर नक्की ह्या जन्मी हा मंगळ ४ नंबर बरोबर पत्रिकेत येतो म्हणजेच कर्क राशीत मंगळ असताना त्यांचा जन्म होतो.

वरील विधान जरी पटले नाही तर अशा व्यक्तींना ह्या जन्मी असा सल्ला देण्यात येतो कि अशा व्यक्तींनी कधीही घर घर करून आपल्या फायद्याच्या गोष्टी पाहू नयेत त्रास होत राहतील. शक्य असल्यास आपल्याकडे असलेली प्रॉपर्टीज घर हे दान करा. हे शक्य नसेल तर ते कुणाला उपयोगात येईल असे कृत्य करा. मग हा मंगळ आपल्याला जास्त त्रास देत नाही.

धन्यवाद…..!

Leave a Reply