You are currently viewing कमी मेहनत करून जास्त पैसा? ज्योतिष योग

कमी मेहनत करून जास्त पैसा-कुंडलीचे पहिले स्थान हे आपल्या ऍक्टिव्हिटीचे, प्रयत्नांचे, मेहनतीचे, धावपळीचे आहे. दुसरे स्थान हे धन स्थान आहे.

प्रथम स्थानाचा मालक जर दुसऱ्या स्थानात बसला असेल आणि दुसऱ्या स्थानाचा मालक जर प्रथम स्थानात असेल तर हा योग आपल्या पत्रिकेत आहे असे समजावे. ह्याच योगाला परिवर्तन राजयोग सुद्धा म्हणतात. तसे परिवर्तन राजयोग इतर कोणत्याही दोन स्थानांमध्ये होतात पण हा एक योग आपल्या पत्रिकेत असेल तर फार कमी मेहनत करून जास्त पैसा देण्याचा योग होतो.

आपल्या माहिती साठी उदाहरण कुंडलीत धन स्थान, आणि प्रथम स्थान दाखविले आहे.

प्रथम स्थानात १ लिहिला असेल तर दुसऱ्या स्थानी २ नंबर असेल अशा वेळी प्रथम स्थानी २ चा मालक शुक्र लिहिला असेल आणि दुसऱ्या स्थानी १ चा मालक मंगळ असा लिहिला असेल.

प्रथम स्थानात जो नंबर असतो त्यापुढील स्थानात त्याच्या नंतरचा नंबर असतो. (उलट दिशेने नेहमी राशीचे आकडे लिहितात कुंडलीत)

खालील पैकी आपल्या पत्रिकेत प्रथम स्थानात कोणता राशीचा आकडा आहे ते पहा त्या नंतरचा आकडा हा दुसऱ्या स्थानी असेल त्याचा मालक प्रथम स्थानात आणि प्रथम स्थानाचा मालक हा दुसऱ्या स्थानात लिहिला असेल तर वरील योग नक्की समजावा.

  • १ किंवा ८ असेल तर मंगळ
  • २ किंवा ७ असेल तर शुक्र
  • ३ किंवा ६ असेल तर बुध
  • ४ असेल तर चंद्र
  • ५ असेल तर रवी
  • ९ किंवा १२ असेल तर गुरु
  • १० किंवा ११ असेल तर शनी

जर प्रथम स्थानात १० असेल तर दुसऱ्या स्थानात ११ असेल दोघांचेही मालक हे एकच आहेत म्हणून ह्या लग्न कुंडलीत असा योग होत नाही. हे लक्षात घ्या कारण एकमेकांच्या स्थानांचे स्वामी हे एकदुसऱ्याच्या स्थानांमध्ये दिसले पाहिजेत.

धन्यवाद…..!

Leave a Reply