मंगळवार आणि  तिखट

ज्या व्यक्ती मंगळवारी जास्त तिखट खातात त्या व्यक्तींना कर्ज होण्याची जास्त शक्यता असते. ज्योतिष शास्त्रात मंगळ हा जर लग्न कुंडलीत दुसऱ्या, आठव्या आणि अकराव्या (लाभ स्थानी) स्थानी असेल तर अशा व्यक्तींना तिखट खाण्याची सवय असते. अशा व्यक्तींना तिखट बोलण्याची सुद्धा सवय असते.

जरी पत्रिका माहिती नसली तरी सामान्यतः मंगळवारी तिखट खाऊ नये असा सल्ला देण्यात येतो.

तिखट खाणाऱ्या व्यक्तीला राग फार येतो असे म्हणतात. अभ्यासात असे देखील आढळले आहे ज्या व्यक्ती खास मंगळवारी तिखट खातात अशा व्यक्तींना कुटुंबाची जबाबदारी घेताना कर्ज हे काढावेच लागते. आणि वाणी दोष सुद्धा होतो.

उपाय:- मंगळवारी तिखट कमी खाणे, मंगळवारी गणेशाला दुर्वा आणि एक लाल फुल वाहणे, गणेश मंत्र म्हणणे, लाल वस्तूंचे दान करणे, लाल मसूर आणि गूळ गायीला देणे, मंगळवारी खास हनुमंताचे दर्शन घेऊन हनुमान चालीसा चे पठण केल्याने कर्जाच्या बाबतीत चांगले अनुभव दिसतील.

धन्यवाद…..!

Leave a Reply