You are currently viewing चंद्र शनी युती : एक विषयोग

चंद्र शनी युती एक विषयोग

वरील कुंडली इमेज मध्ये सर्व स्थानात चंद्र शनी युती दाखविली आहे आपल्या पत्रिकेत हि युती कोणत्याही एका स्थानी असेल. ह्या युतीला विषयोग युती म्हणतात.

आपल्या पत्रिकेत हि युती असेल तर खाली दिलेली अचूक माहिती आपल्या साठी असेल आणि त्या त्या गोष्टी आपल्याबरोबर होत असतील तर नक्की ह्यावर विचार करावा.

  • अशा विषयोग युतीत अपयश हा पहिला प्रकार सांगण्यात येतो.
  • कोणत्याही टार्गेट साठी आधी त्यावर खूप मेहनत घ्यावी लागते आणि नंतर त्यातले विष पिऊन त्यावर यश प्राप्त करून घ्यावे लागणे म्हणजे विषयोग.
  • ह्यात केव्हा केव्हा व्यक्ती अति डिप्रेशन मध्ये जाऊ शकतो. मानसिक त्रास सहन करून जीवनात त्रस्त होण्याचा हा प्रकार असू शकतो.
  • ह्यात अशा व्यक्तीच्या आईला तिच्या संसारात कष्ट पाहण्यात आलेले दिसतात. काही मातांना तिच्या जीवनातील एका तारेवरची कसरत दिसते. मुलाबाळांची जबाबदारी एकट्याला उचलावी लागते. असा कोणताच प्रकार नसेल तर आईच्या तब्येतीवर ह्याचे परिणाम चांगले नसतात.

विशेष नोट — वरील सर्व विवेचनात काही कमी जास्त फरक जाणवू शकेल चंद्र आणि शनी च्या डिग्री वर हे अवलंबून असेल किंवा ते कोणत्या स्थानी आहेत ह्यावर वेगवेगळे विषय असतील किंवा शनी चंद्र ह्या युतीवर इतर ग्रहांचा होणारा परिणाम पहिला जातो.

विषयोग ह्यावर माझे मत

हि युती ज्यांच्या पत्रिकेत असेल जरी खूप मानसिक कष्ट होऊन अपयशी झाल्यानंतर व्यक्ती त्यात अति कणखर होतो आणि नंतर त्याला शेवटी यश मिळतेच असे माझे मत आहे. ह्या युतीमुळे काही जणांच्या पत्रिकेत उत्तम पैसा सुद्धा पाहण्यात आला आहे.

ह्या युती असणाऱ्या पत्रिका ज्यांच्या असतील त्यांना एक सल्ला नक्की दिला जातो कि त्यांनी आई ची सर्विस जास्त घेऊ नये. शिक्षण करिअर करण्यास त्यात पात्र होण्यासाठी स्वतः मेहनत घेऊन नंतर आईला सुख द्यावे आणि ते सुद्धा लांब राहून. हा दोष किंवा नियम कुठपर्यंत पाळावा तर आईच्या वयाच्या ४८ पर्यंत तरी असे राहावे.

अशा पत्रिकेत चंद्र म्हणजे आई हा विषय अति संवेदनशील होतो त्या व्यक्ती साठी आणि असे झाले तर भाग्योदयाला हे चांगले नसते.

अशा पत्रिकेत विवाह सुद्धा करताना मी आईला धावपळ करण्यास सांगत नाही आपल्या मुली किंवा मुलाच्या पत्रिकेत असा विषयोग असेल तर आईला यश प्राप्त होत नाही. किंवा तिला सरळ सांगण्यात येते कि सून आपली खूप सेवा करेल अशी अशा धरून मुलाचे लग्न करू नका. त्रास होईल.

अशा किती तरी बाबी हा एकट्या युतीत पाहण्यात आलेल्या आहेत. तर अशा युतीमुळे काही वरील त्रास असेल तर योग्य ज्योतिषांकडून त्याची शहानिशा करून निर्णय घ्यावा.

उपाय विषयोगाचे

अशा वेळी मुलांच्या पत्रिकेत दोष मिळाला तर नक्की ह्यावर आई ला शिव पिंडीवर काळे तीळ पाण्यात टाकून प्रत्येक शनिवार आणि सोमवारी अभिषेक करण्याचा सल्ला दिला जातो.
आणि पूर्णिमेला चंद्राला मजबूत करण्याचे उपाय सांगितले जातात (हे माझ्या वेब वर आहेत) https://shreedattagurujyotish.com/pournima-remedies/

जर पत्रिका २० नंतरच्या वयात असेल तर पुढे प्रत्येक पूर्णिमेला शिव उपासना करण्याचा सल्ला दिला जातो. किंवा ह्यात अशा व्यक्तीने प्रत्येक सोमवार आपल्या घरात कोठेही बसून आपले मुख नॉर्थ वेस्ट ला करून ।। ॐ सोम सोमाय नमः।। चा १०८ वेळा जाप करण्याचा सल्ला दिला जातो.

चांदी तांदूळ ह्यासारख्या सफेद वस्तूंचे दान योग्य वेळी करत राहणे सुद्धा ह्या दोषाचे परिणाम कमी होण्यास मदत होते. त्याबरोबर शनी चे सुद्धा शनिवारी उपाय करावे लागतात. त्यात पिंपळ सेवा हि उत्तम सांगितली गेली आहे. ह्यात पितृदोषाचे सुद्धा उपाय करण्यास हरकत नसते.

धन्यवाद…..!

Leave a Reply