You are currently viewing सूर्य राहू युती एक ग्रहण दोष

सूर्य राहू युती- सूर्य हा पत्रिकेत आत्मा मानला गेला आहे, सूर्य हा प्रकाश आहे, सूर्य हा ऊर्जेचा स्तोत्र आहे, सूर्य हा पिता आणि पितरांचा कारक आहे. मग अशा सूर्याबरोबर जेव्हा आपल्या पत्रिकेत राहू बसलेला दिसतो तेव्हा वरील सर्व सूर्याचे कारकतत्व हे झाकले जातात म्हणजे त्यांना ग्रहण लागणे स्वाभाविक असते.

surya rahu yuti

जेव्हा अशी सूर्य राहू ची युती पत्रिकेत पाहण्यात येते तेव्हा ती कोणत्या भावात झाली आहे आणि कोणत्या राशीत झाली आहे ह्यावर त्या त्या युतीची वेगवेगळी फळे अनुभवास येतात.

त्यामुळे हे जरी आपल्याला कळत नसेल तर नुसती हि युती एकत्र दिसली तरी खालील विषयात आपल्यलाला सावधान करणे महत्वाचे दिसते. जर अशा काही गोष्टी आपल्याबरोबर ह्या युती मुळे होत असतील तर नक्की योग्य ज्योतिषांकडून पत्रिका विश्लेषण करून घ्यावी.

 • हि युती म्हणजे पत्रिकेतील पितृदोष (माझ्या ब्लॉग वरील पितृदोष च्या ४ पोस्ट नक्की वाचा आणि उपाय सुद्धा).
 • हि युती ज्या स्थानात असेल त्या स्थानातील फळे व्यक्तीला एकतर मिळतच नाहीत किंवा त्यात जास्त संघर्ष करावा लागतो.
 • हि युती जर कर्क वृश्चिक आणि मीन राशीत म्हणजे जल राशीत असेल तर भटकंती.
 • हि युती जर वृषभ कन्या मकर राशीत असेल तर स्थिरता देते चांगल्या किंवा वाईट दोन्ही गोष्टीं साठी.
 • हि युती जर मिथुन तुला कुंभ राशीत असेल तर आपल्या टार्गेट साठी ह्या व्यक्ती भयंकर भटकंती करतात आणि यश मिळवितात.
 • हि युती जर मेष सिंह आणि धनु राशीत असेल तर जीवनात फार ताप होतो ह्यांना फार तपावे लागते.
 • हि युती कोठेही असली तर फार जिद्दी बनवते व्यक्तीला, हि जिद्द चांगल्या गोष्टींसाठी कि वाईट गोष्टींसाठी हे त्या सूर्य आणि राहू च्या स्थितीवर अवलंबून असेल.
 • हि युती आपल्या परंपरेच्या विरुद्ध वागण्यासाठी प्रेरित करणारी युती मानली गेली आहे. म्हणून अशा युतीच्या पत्रिकेतील व्यक्ती नेहमी काही परंपरा रूढी मोडण्याच्या स्थितीत दिसतात.
 • ह्या युतीत जीवनात काही रिलेशन वर सुद्धा परिणाम होताना दिसले आहेत.
 • लाळ गळने, तोंडात जास्त चिकट थुकीचा स्त्राव बोलताना दिसणे अशा अवस्थेत सूर्य पीडित होतो कोणत्या ना कोणत्या ग्रहाने तेव्हा हे सुद्धा राहू रवी च्या युतीत पाहण्यात आले आहे.
 • हि युती जास्त अग्रेसिव्ह वृत्ती निर्माण करते, राग द्वेष असणारी व्यक्ती पाहण्यात आली आहे.
 • हि युती असताना राजकारणात किंवा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती ह्या फार समाजासाठी धोकादायक बनतात. अशा व्यक्ती निडर प्रवृत्तीच्या दिसतात. दया माया नसणे ह्यांच्यातील एक अवगुण असू शकतो.
 • हि युती उत्तम परिणाम देत असेल तर व्यक्ती फक्त स्वतःसाठी स्वार्थी असू शकतो.

तेव्हा जर आपल्या पत्रिकेत हि युती असेल तर नक्की वरील गोष्टी आपणास दिसत असतील तर त्यावर खालील उपाय नक्की करत राहावेत.

सामान्यतः ह्यात पितृदोषाचे सर्व उपाय काम करत असतात आणि चांगले परिणाम देतात ह्यातील निगेटिव्हिटी दूर करण्यास ह्याचा नक्की उपयोग करता येतो.

अशा दोषात नेहमी सूर्याला जास्त स्ट्रॉंग करावे लागते कित्येक वर्षे गायत्री जप सूर्याला जल देणे आणि गहू गूळ तांबे ह्याचे दान करणे ह्या दोषातील त्रास कमी होण्यास मदत होते.

अशा दोषात पित्यास किंवा पुत्रास त्याच्या करिअर मध्ये किंवा आरोग्यास त्रास होत असेल तर वेगळे राहण्याचा सल्ला दिला जातो.

ह्या युती घराण्यासाठी उत्तम नसतात तेव्हा कुलदेवी, एखादी घराण्यातील परंपरा, उपासना ह्यात खंड दिसतो किंवा मागील मृत पावलेल्या व्यक्तीचे मरणोत्तर संस्कार झाले नसल्याचे पाहण्यात येते. अशा गोष्टींचा विचार करून तेथून जर त्रास असतील त्यात योग्य व्यक्तीचा सल्ला घ्यावा.

हि युती ज्यांच्या पत्रिकेत असेल तर असे सुद्धा पाहण्यात आले आहे कि त्यांच्या सक्ख्या काकाचे जीवनमान एकतर खूप चांगले नसते किंवा खूप चांगलं असते. त्याप्रमाणे हा योग पत्रिकेत फलद्रुप होतो कॉपी पेस्ट म्हणून त्यांचे जीवनमान पुन्हा पेस्ट होण्याची शक्यता फार असते.

अशा पत्रिकेतील वडिलांचे वडील आजोबा ह्यांचा संसार चेक करावा लागतो त्यात घडलेल्या घटना चेक करून पुढील भविष्य वर्तवता येते.

धन्यवाद…..!

Leave a Reply