Table of Contents
रवी मंगळ युती एक निखारा- आग
हे दोन्ही ग्रह एक अग्नी कारक असल्यामुळे अग्नी समान कार्यशील असतात. आपल्या पत्रिकेत जर हे कोणत्याही एका स्थानी असतील तर खालील दिलेला लेख हा आपल्यासाठी असेल.
रवी राजा आहे आणि मंगळ सेनापती. एखादे राज्य चालविताना ह्यांची सर्वात जवळीक जशी असते तशीच पत्रिकेत हे दोन ग्रह एकाच स्थानी अससतील तर त्या व्यक्तीला जास्तीत जास्त उत्तम परिणाम देतात. ह्यात रवी आणि मंगळ डिग्रीने जेव्हढे जवळ असतील तेव्हढे परिणाम उग्र किंवा चांगले असे मिळण्याचे प्रमाण जास्त असते.
रवी मंगळ युती ची सामान्य फळे
राग, हिम्मत, ऑर्डरफुल राहणे, अधिकार प्रवृत्ती, हे सर्व गुणधर्म ह्या युतीने व्यक्तीत आपोआप येतात. ह्या युतीत जास्तीत जास्त घरातील एखादी व्यक्ती सरकारी नोकरीत असेल तर अशा व्यक्तींच्या सर्व गरजा त्याच्यावर अवलंबून असतात.
ह्याचा अर्थ जर हि युती असेल आपल्या पत्रिकेत आणि जर घरात कोणी सरकारी व्यक्ती असेल तर ह्या व्यक्तीला लहानपणापासून अन्न वस्त्र निवारा ह्याची काळजीच करावी लागत नाही. उलट ह्यांच्या ह्या पत्रिकेतील योगामुळे त्या व्यक्तीला आपली सर्विस पूर्ण करण्याचे योग सुद्धा उत्तम मिळतात. जर ह्या युतीवर शनीची किंवा राहूची दृष्टी असेल तर मात्र थोडा त्रास पाहण्यात आला आहे.
हि युती असेल आणि घरात कोणी सरकारी नोकर नसतील तर मात्र जास्त त्रास हा आपल्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी असतात. लहानपणापासून च्या जाबदाऱ्या अशा व्यक्तीवर पडू शकतात ज्याने व्यक्ती त्रस्त होत असतो असे पाहण्यात आले आहे.
ह्या युती असणाऱ्या व्यक्ती साहसी, हिम्मतवान असतात. खोटे बोलणे, असत्याने वागणे किंवा चापलुसी करणे ह्यांना जमत नसते जे असेल ते निडर पणे व्यक्त करतात मागचा पुढचा विचार करत नाहीत.
जेव्हा ह्या युतीशी मंगळाचा संबंध येतो तेव्हा ह्यात वरील सर्व जरी गुण असतील तरी त्याचा स्वतःसाठी उपयोग होताना कठीण होते.
जसे मंगळ रवी आणि बुध एकत्र किंवा मंगळ युतीच्या समोरील स्थानी बुध किंवा बुधाच्या कोणत्याही राशीत ६ आणि ३ मध्ये हि युती असेल तर असे पाहण्यात आले आहे कि व्यक्ती कितीही इमानदारीने वागत असेल आणि हिंमतवान असेल किंवा सत्यता बाळगत असेल तर त्याचा उपयोग होताना पहिला गेला नाही.
- कर्क राशीत ४ नंबर हि युती व्यक्तीला कठोर बनवते. स्वार्थीपणा येतो दयामाया नसते किंवा फार भटकंती होते.
- ५ नंबर सिंह राशी आणि १ नंबर मेष राशीत ह्या युतीची फळे उत्तम मिळतात जर शनी आणि राहू ची दृष्टी नसली तर.
- ७ तुला राशी २ वृषभ राशीत ह्या युतीची फळे स्त्री सुखासाठी उत्तम मानली गेली नाहीत
- ८ नंबर वृश्चिक राशीत जर हि युती असली तर रिसर्च मध्ये चांगली फळे मिळतात. व्यक्ती मोठ्या हुद्द्यावर काम करणाऱ्या पहिल्या गेल्या आहेत.
- ६ आणि ३ कन्या आणि मिथुन राशीची फळे वर दिली आहेत.
- ९ नंबर मध्ये हि युती व्यक्ती एज्युकेटेड पाहण्यात आल्या आणि त्यांनी आपल्या शिक्षणाच्या जोरावर मोठी पदे मिळवली असे पाहण्यात आले.
- ११/३/७ नंबर च्या राशीत हि युती असेल तर मेडिकल किंवा पोलीस न्यायाधीश पाहण्यात आले.
शनी पासून हि युती ३ऱ्या १०व्या आणि ७ व्या स्थानी असेल तर व्यक्तीला ३६ किंवा ४२ पर्यंत ह्या युतीची चांगली फळे फार मेहनत करून प्राप्त होतात. शनी ज्या स्थानातून दृष्टी टाकेल त्या स्थानाच्या फळाबद्दल हा विषय असेल.
राहू पासून हि युती ८ व्या ९ व्या ५ व्या ७ व्या ठिकाणी असेल तर कोणत्याही एका रिलेशन साठी व्यक्ती हैराण असतो आपल्या जीवनात. आणि असे होत नसेल तर वैवाहिक सुखात तरी धावपळ होते स्थिरता मिळविण्यासाठी. पुढे ३६ किंवा ४२ पर्यंत वाट पाहावी लागते. राहू ज्या स्थानातून दृष्टी टाकत असतो त्या स्थानाच्या फळाबद्दल हा विषय असतो.
रवी मंगळ स्थानिक फळे
आता ज्या स्थानात हि युती असेल त्याची फळे सांगतो.
- द्वितीय चतुर्थ अष्टम स्थानी ह्या युतीची फळे लहानपणापासून पित्याला कष्ट , पित्याच्या आर्थिक अडचणी, शारीरिक व्याधी, दुर्घटना,
- पंचम स्थानी ५ नंबर मध्ये सिंह राशीत हि युती असेल म्हणजे मेष लग्न असेल तर पित्यासाठी वैवाहिक सुखात कष्ट.
- प्रथम स्थानी तृतीय स्थानी,पंचम, सप्तम,नवम आणि लाभ स्थानी संतान सुखासाठी थोडा त्रास होतो. इथेच ह्या क्रमांकाच्या राशी असतील १/३/५/३/७/९/११ तर स्त्रीला संतती होताना त्रास होतो.
- पंचम दशम आणि लाभ स्थानी ह्या युतीत मोठे अधिकारी पहिले गेले आहेत जर त्यात १/५/९ ह्या राशी असतील तर.
- व्यय स्थानी (१२व्या) दानधर्म करणारे व्यक्ती दिसतात. त्यात ३/७/११/८ हे राशीचे नंबर असतील तर.
- तृतीय स्थानी आणि नवम स्थानी ह्या युती भावंडांसाठी मारक आहेत. पण बहिणीसाठी तारक आहेत. जर तिथे पुरुष राशी १/३/५/७/९/११ असतील तर असे परिणाम दिसतील. ह्याच तृतीय आणि नवम स्थानी पिता गेल्यानंतर पैसे कमवितात. जर हि युती इथेच स्त्री राशीत असली तर २/४/६/८/१० मध्ये एका बहिणीची जबाबदारी घ्यावी लागते. तिला त्रास असतो. ह्याच स्थानी पित्याबरोबर चांगले संबंध दिसत नाहीत.
- सप्तम आणि दशम स्थानी १ नंबर मेष ५ सिंह १० मकर राशीत जन्मतः पित्याला त्रास होतो. राजकारणात जाण्याची संधी दिसते मोठा झाल्यावर. तेथे चांगली प्रगती होते.
सल्ला करिअर साठी
- प्रथम सरकारी नोकरी साठी तयारी करू शकता कोणत्याही क्षेत्रात जिथे श्रम जास्त लागतील अशा क्षेत्री. म्हणजे तिन्ही सैन्य, पोलीस, सेक्युरिटी वगैरे.
- ह्या युतीचा संबंध जर गुरु शी असेल तर (गुरु ची दृष्टी किंवा गुरु च्या राशीत) तर चांगले शिक्षण घेऊन मोठ्या पदावर काम मिळते.
- ह्या युतीत करिअर झाल्यानंतरच लग्न करणे उत्तम नंतर पुढे त्रास होण्याचा संभव असतो.
- ह्या युतीशी राहू चा संबंध आला तर जन्म स्थानापासून दूर जाऊन करिअर करावे. वडिलांपासून दूर जावे म्हणजे वडील असे पर्यंत त्यांना सुद्धा त्रास नसेल.
- ह्या युतीशी चंद्राचा संबध असेल तर आईपासून दूर जाऊन करिअर करावे.
- ह्या युती ची फळे योग्य ज्योतिषांकडून जाणून घेतली तर पुढे संतान सुख आणि करिअर ह्याबद्दल अधिक जाणून घ्यावे.
धन्यवाद…..!