You are currently viewing सूर्य शनी पिता पुत्र युती प्रतियुती

सूर्य शनी पिता पुत्र युती प्रतियुती

आपल्या पत्रिकेत सूर्य शनी एकत्र = युती आहे का ?
आपल्या पत्रिकेत सूर्यासमोर (सूर्यापासून) ७ व्या भावात शनी आहे का = प्रतियुती आहे का ?
तर खाली दिलेले विवेचन आपल्यासाठी नक्की उपयोगी असेल.

नोट — लेख समजाला नाही तरी शेवटचे माझे मत नक्की वाचा

बऱ्याच ज्योतिष शास्त्रकारांच्या मते हि युती करिअर, पिता पुत्र, वैवाहिक सुख, आरोग्य ह्यासाठी चांगली सांगितलेली नाही. ज्या स्थानात हि युती येते त्या स्थानांच्या फळात व्यक्तीला त्रास होतात असे सांगितलेले आहे.

पिता पुत्र ह्यांच्यात नेहमी वाद किंवा एकमेकांमध्ये वैचारिक मतभेद होतात वैवाहिक सुखात पत्नी किंवा पती चा विरह होतो किंवा आरोग्यासाठी मोठी हानी होऊ शकते असे बरेच काही ह्या युतीत लिहून ठेवले आहे.

सूर्य हा पिता आहे आणि शनी हा त्याचा पुत्र ह्या दोघांच्या एकमेकांच्या शत्रुत्वाबद्दल इथे जास्त लिहीत नाही फक्त सूर्याने शनीची आई छाया हिचा अपमान केला होता आणि तेव्हापासून शनी ला आपल्या पित्याचा राग आहे.

  • शनी हा पश्चिम दिशेचा कारक आहे आणि सूर्य हा पूर्व दिशेचा कारक आहे.
  • शनी हा मकर आणि कुंभ म्हणजे पृथ्वी आणि वायू तत्वाच्या राशीचा मालक आहे आणि रवी हा सिंह राशी म्हणजे फक्त अग्नी तत्वाचा मालक आहे.
  • सूर्य उजेड आहे आणि शनी अंधार आहे.
  • दोघांचे जे जे कारकतत्व आहेत ते एकमेकांच्या विरोधी आहेत त्यामुळे ह्या दोघांची युती एकत्र पत्रिकेत असेल तर वरील जी जी फळे दिलेली आहेत ती ती त्या व्यक्तीला मिळण्याची ९०% खात्री मानली गेली आहे.
  • पण काही वेळा हीच युती किंवा प्रतियुती व्यक्तीला एका मोठ्या सामाजिक लेव्हल वर काम करणारा व्यक्ती म्हणून पाहण्यात आले आहे. ह्याला बरीच करणे आहेत.

पत्रिकेच्या १२ स्थानांतून हि फळे वेगवेगळी आहेत तर तुम्ही खालील प्रमाणे ह्या स्थानाच्या फळांचा विचार करावा आणि तसे होत असेल तर ज्योतिषांचा सल्ला घ्यावा.

  • प्रथम स्थानातील युती : ह्यात आपल्या प्रत्येक सादरीकरणाला ऍक्टिव्हिटीला त्रास होत आहे का ते पाहावे. आपल्याला शारीरिक त्रास होत आहे का ते पाहावे. ह्यात नक्की एक फलित समोर आलेले आहे कि आईला फार कष्ट सांगितले गेले आहेत.
  • द्वितीय स्थानातील युती : ह्यात कुटुंब स्थानात फार उलथापालथ करणारी हि युती मानली जाते. लहानपणी कुटुंबासाठी हि युती उत्तम नाही. जर असे होत नसेल तर मोठेपणी हि आर्थिक कष्ट देणारी युती होऊ शकते.
  • तृतीय स्थानातील युती : हि पत्रिकेत लहान भावंडाना त्रासदायक युती आहे. आपल्या पराक्रमा साठी हि युती उत्तम असेल असे माझे मत आहे पण जर वेगवेगळ्या शहरात जाऊन आपले पराक्रम शो होत असतील तर आपल्यासारखा पराक्रमी कोणी नसेल.
  • चतुर्थ स्थानातील युती : हि युती आपल्याला कुटुंबापासून दूर करणारी युती होऊ शकते कुटुंबासाठी कष्ट असणारी हि युती मानली गेली आहे.
  • पंचम स्थानातील युती : इथे हि युती आपल्या करिअर आणि शैक्षणिक बाबींसाठी योग्य नाही आपली योग्यता समाजाला दिसतच नसेल तर हि युती त्रासदायक ठरेल.
  • षष्ठ स्थानातील युती : इथे हि युती फार चांगली मानली गेलेली नव्हे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीबरोबर विच्छेद होणारच असे ह्या युतीत पाहण्यात आले आहे. आपल्या सर्व्हिस साठी हि युती चांगली किंवा वाईट हे दोन्ही परिणाम देऊ शकेल. हे पत्रिकेच्या लग्न स्थानावर प्रथम स्थळाच्या मालकावर अवलंबून असेल कि कोण कोणाचा शत्रू मित्र आहे ते.
  • सप्तम स्थानातील युती : इथे हि युती वैवाहिक सुखासाठी चांगली मानली गेली नाही पत्रिकेतील इतर योग पाहून वैवाहिक सुखाचा निर्णय देता येतो. ह्या युतीत एक नक्की जातकाला मिळते कि वैवाहिक सुखात भयंकर जबाबदाऱ्या व्यक्तीच्या खांद्यावर येतात.
  • अष्टम स्थानातील युती : इथे हि युती चांगली नाही. हि युती व्यक्तीला आपल्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टी गुप्त ठेवाव्या लागतात अशी परिस्थिती निर्माण होते. कारण त्या गोष्टी समाजासमोर आल्या तर त्यात त्याला त्रास होतो. पत्रिकेत आरोगयाचा त्रास ह्यात होऊ शकतो.
  • नवम स्थानातील युती : इथे हि युती पित्यासाठी उत्तम नाही जर सूर्य त्या कुंडलीत कारक असेल तर भाग्योदयासाठी कष्ट सांगितले गेले आहेत.
  • दशम स्थानातील युती : इथे हि युती कर्म स्थानासाठी खूप चांगली असेल पण आयुष्यात एक स्थिती अशी उत्पन्न होते कि व्यक्तीला आपले सर्व घालवून पुन्हा सुरुवात करावी लागते.ह्या युतीत सूर्य शनी दोघेही ह्या स्थानी दिगबली होतात. म्हणून मोठ्या मोठ्या पदावर काम करणाऱ्या लोकांच्या पत्रिकेत इथे हि युती पाहण्यात आलेली आहे. पण त्यांना रिलेशन चे सुख किती आहे ह्यावर प्रश्न चिन्ह येते कारण शनी ची ७ वी दृष्टी ४ थ्या स्थानावर जिथून घरातले सुख आणि मातृसुख पाहतात, शनी ची दृटी १० वी वैवाहिक सुखावर, शनी ची तिसरी दृटी स्वतःच्या पर्सनल जमापुंजीवर येते.
  • लाभ स्थानातील युती : इथे हि युती व्यक्तीला ऊर्जा आणि मेहनत करून बऱ्याच प्रकारचे लाभ आयुष्यात मिळविण्यासाठी प्रेरित करते आणि जीवनात त्याला अनेक प्रकारचे लाभ होतात. पण हि युती संतान सुखासाठी उत्तम नाही. आणि स्वतःच्या हेल्थसाठी सुद्धा नाही.
  • द्वादश स्थानातील युती : इथे हि युती अजिबात चांगली मानली गेली नाही. व्यक्तीला आयुष्यात रिकामा ठेवणारी हि युती आहे. कुटुंबासाठी सुद्धा हि युती चांगली मानली गेली नाही. असे होत असेल तर कुटुंबात राहूच नये असा माझा सल्ला.

आता कोणत्या स्थितीत हि युती अति चांगली

त्यासाठी शनी आणि सूर्याच्या डिग्रीज पाहाव्या लागतात. शनी आणि सूर्य कोणत्या स्थानांचे मालक होऊन कोणत्या स्थानात हि युती आहे त्यावर हे अवलंबून आहे.त्यासाठी शनी पत्रिकेत अकारक नसावा म्हणून ह्या युत्या मेष,वृश्चिक, कर्क,सिंह लग्नाला चांगल्या मानल्या गेल्या नाहीत. सर्वात वृषभ लग्नाला हि युती चांगली मानली गेली आहे. त्यापॆक्षा कमी तुला लग्नाला आणि त्यापेक्षा कमी कन्या आणि मिथुनेला आणि त्यापेक्षा कमी धनु आणि मीन लग्नाला.

सूर्य शनी प्रतियुती बद्दल

सूर्य च्या समोर शनी ह्याला सूर्य शनी प्रतियुती म्हणतात. वेगवेगळ्या स्थानातून ह्या ह्या प्रतियुती असतात पत्रिकेत ह्या प्रतियुती ला युतीचीच काही वेळा फळे मिळतात. ह्यात सूर्य आणि शनी मध्ये नेहमी शनी वक्री अवस्थेत असेल. म्हणून जर लग्न स्थानाचा मित्र शनी असेल. पत्रिकेत शनी कारक असेल तर ह्या प्रतियुती सुद्धा व्यक्तीला योग्य ती चांगली फळे देतात.

शेवटी माझे मत जे पटेलच असे नाही

  • बऱ्याच सूर्य शनी प्रतियुती मध्ये वडील आणि पुत्राचा एकाचाच भाग्योदय होताना दिसला.
  • बऱ्याच वेळा अशा युती प्रतियुती असणाऱ्या कुंडलीत जर ती मुलीची पत्रिका असेल तर करिअर किंवा मुलं होणे बाप असेपर्यंत दिसले नाही. असेच जर एखाद्या मुलीच्या पत्रिकेत आपणास मिळाले तर नक्की ह्याचा विचार करावा आणि योग्य तो सल्ला घ्यावा. ह्यात वडिलांच्या पैशातून करिअर करूच नये किंवा लग्न सुद्धा करू नये हा एक उपाय मी नेहमी सुचवितो.
  • बऱ्याच वेळा अशा युती प्रतियुती कुंडलीत पिता पुत्र एकत्र न राहण्याचा मी सल्ला देतो. जर खूप काही त्रास होत असतील तर करून पाहण्यास हरकत नसते.
  • बऱ्याच वेळा पिता गेल्यानंतर पत्रिकेत कर्म स्थान ऍक्टिव्हेट होत असते असे पाहण्यात आले आहे.
  • बऱ्याच वेळा इथे जर कुटुंबात एकाच्या पत्रिकेत हि युती प्रतियुती दिसली तर इतर जणांच्या पत्रिकेत किंवा शनी सूर्य हे एकमेकांच्या नक्षत्रात असतात आणि मागील पिढ्यांचे दोष हे ज्यांच्या पत्रिकेत असतात त्यांना चैन ने हे दोष पास ऑन होतात म्हणजे त्यांचा काही ह्या जन्मीचा दोष नसला तरी मागील पिढ्याचे कर्म हे त्यांना भोगावेच लागते ज्या घराण्यात ह्यांनी जन्म घेतला आहे.

अशी बरीच किचकट कारणे ह्या युती प्रतियुती मध्ये आहेत तेव्हा आपल्याला जे जे अनुभव येतील त्यावर विचार करून किंवा अनुभव येण्याच्या अगोदर योग्य ज्योतिषांचा सल्ला घेणे हितावह ठरेल.

धन्यवाद…..!

Leave a Reply