You are currently viewing शनी कुंभ राशी भ्रमण – जान २०२३ ते मार्च २०२५ | मीन राशी साडेसाती चे पहिले चरण


मीन राशी साडेसाती चे पहिले चरण | Shani Transit for Meen Rashi

जर आपण मीन राशीचे आहात किंवा आपण कोणत्याही राशीचे असाल आणि आपली कुंडली मीन लग्नाची असेल तर खाली दिलेले शनी कुंभ प्रवेशाचे विवेचन हे आपल्या साठी जान २०२३ ते मार्च २०२५ पर्यंत असेल.

जेव्हा शनी कुंभ राशीत असेल जान २०२३ ते मार्च २०२५ पर्यन्त तेव्हा गुरु राहू आणि केतू हे कोणत्या राशीत आहेत त्याप्रमाणे शनी चे फळ प्रत्येक राशीला मिळण्याचा संभव असेल.

मीन राशीला किंवा लग्नाला गुरु राहू केतू यांची गोचरी दिली आहे. त्यावरून शनी आपल्याला कसे फळ देईल हे सुद्धा समजण्यास मदत होईल.

  • गुरु २२/४/२०२३ पर्यंत मीन राशीत.– मीन लग्न किंवा राशी कुंडलीत प्रथम स्थानी.
  • गुरु मेष राशीत १/५/२०२४ पर्यंत असेल.– मीन लग्न किंवा राशी कुंडलीत द्वितीय स्थानी.
  • गुरु वृषभ राशी १/५/२०२४ ते १४/५/२०२५ पर्यंत असेल. — मीन लग्न किंवा राशी कुंडलीत तिसऱ्या स्थानी.
  • राहू ३०/१०/२०२३ पर्यंत मेष राशीत असेल — मीन लग्न किंवा राशी कुंडलीत दुसऱ्या स्थानी.
  • केतू ३०/१०/२०२३ पर्यंत तुला राशीत — मीन लग्न किंवा राशी कुंडलीत अष्टम स्थानी.
  • राहू ३०/१०/२०२३ ते १८/५/२०२५ पर्यंत मीन राशीत — मीन लग्न किंवा राशी कुंडलीत प्रथम स्थानी.
  • केतू ३०/१०/२०२३ ते १८/८/२०२५ पर्यंत कन्या राशीत –मीन लग्न किंवा राशी कुंडलीत सप्तम स्थानी.

आपली राशी किंवा आपले लग्न मीन असेल तर हि १२ नंबर ची राशी जलतत्वाची आहे. शनीच्या साडेसाती मध्ये शनी जलतत्त्व आणि अग्नीतत्व राशींना जास्त प्रमाणात प्रखर फळे देत असतो. ती सर्व फळे आपल्या पत्रिकेतील शनी च्या स्थितीवर सुद्धा अवलंबून असतात.

येथे आपणास दिनांक १७/१/२०२३ ते २९/३/२०२५ पर्यंत शनी कुंभ राशीत असताना काय फळ देऊ शकतो ते देण्याचा प्रयन्त असेल.
येथे फक्त विषय मांडले जातील जे आपल्यासमोर ह्या साडेसातीच्या पहिल्या चरणात येतील. दुसरे आणि तिसरे चरण साडेसातीचे इथे देण्यात आलेले नाही ह्याची कृपया नोंद घ्यावी .

  • मीन राशीला साडेसाती चे दुसरे चरण २९/३/२०२५ ते २३/२/२०२८ पर्यंत असेल.
  • मीन राशीला साडेसाती चे तिसरे चरण २३/२/२०२८ ते १७/४/२०३० पर्यंत असेल.

वर दिलेल्या कुंडलीत जी आपली लग्न कुंडली किंवा राशी कुंडली असेल तर शनी चे भ्रमण कुंभ राशीतून ११ नंबर च्या राशीतून होत आहे ते स्थान आपल्या पत्रिकेचे १२ वे स्थान आहे. ह्या स्थानावरून व्यक्तीचे होणारे खर्च, व्यक्तीकडून जाणाऱ्या गोष्टी, विदेश यात्रा, जेल यात्रा, हॉस्पिटल, मोक्ष हे विषय पहिले जातात.

जेव्हा शनी सारखा ग्रह येथून भ्रमण करत असतो तेव्हा वरील पैकी जास्तीत जास्त विषय हे आपल्या बद्दल होण्याचे नाकारता येत नाही. शनी हा एक शिस्तबद्ध आणि कायद्याचा न्यायाचा ग्रह आहे तो ह्या विषयी आपणास काही ना काही शिस्त लावेल एव्हढे नक्की.

प्रत्येकाच्या मीन राशीच्या जन्माच्या शनी वरून हे नक्की होते कि विषय काय आहेत. तरी सुद्धा आपण १७/१/२०२३ च्या ८४ दिवस अगोदर च्या सर्व घटना डोळ्यासमोर आणल्या तर ह्यातील एखाद्या विषयी आपण व्यस्त झाला असाल तर ते विषय इथे ऍक्टिव्हेट होतील ह्यात शंका नाही.

शनी इथे येऊन आपले खर्च जेव्हा वाढवीत असतो तेव्हा अजिबात इनकम चा विचार करू नये मीन राशी आणि लग्न वाल्यांनी. कारण पैसा तर येणारच आणि तो मजबूत खर्च सुद्धा होणार. फक्त तो खर्च कोणत्याही दुःखा साठी होऊ नये अशीच शनिदेवाकडे प्रार्थना करा.

  • इथे शनी आल्यावर मीन राशीच्या काही व्यक्ती अध्यात्माकडे वळू शकतात.
  • इथे शनी आल्यावर मीन राशीच्या काही व्यक्ती ज्यांनी आधी बरीच वर्षे चुकीच्या मार्गाने पैसा मिळविला असेल तो सर्व संपण्याची चिन्हे आहेत.
  • इथे शनी असताना कोणत्याहि मागील चुकांची बेरीज पुन्हा करू नये कारण आता चुका करून चालणार नाही. तो लगेच धरून आपटेल आणि सरळ कायद्याच्या कचाट्यात याल तेव्हा जरा जपून.
  • इथे शनी असताना जर मीन राशीची व्यक्ती हि आपल्या जन्म स्थानापासून दूर असेल तर तिच्यासाठी नवनवीन भाग्योदयाच्या वाटा समोर येतील.
  • इथे शनी असताना ज्या मीन राशीच्या व्यक्ती ५८ च्या पुढे आहेत त्यांची रिटायरमेंट सुखाची जाईल फक्त आरोग्याकडे लक्ष द्यावे.
  • इथे शनी असताना काही मीन राशीच्या व्यक्तींच्या आधीच्या आजारपणात जास्त खर्च होऊ शकतील. पण ते योग्यच होतील असे माझे मत आहे कारण शनी आपल्या मुलत्रिकोण राशीतून जात आहे.
  • इथे शनी आल्यावर काही मीन राशीच्या व्यक्तींना एकापेक्षा अधिक मार्गाने धन प्राप्ती मिळविण्याचे योग येत आहेत.
  • जर आपण विद्यार्थी दशेत असाल तर घरापासूनच लांब सुरु असलेले शिक्षण फायदेशीर ठरू शकेल. किंवा ह्यात आपले डिसिजन तसे होण्यास मदत होईल.
  • डावा कान आणि डावा डोळा इथे आपणास सांभाळावा लागतो कारण शनी इथे आल्यावर त्या अवयवांवर सुद्धा काहीतरी आपणास प्रयोग करावे लागतील तर त्याची काळजी घ्यावी.

शनी च्या दृष्टी

जन्म स्थानाच्या वेळी आपल्या पत्रिकेत शनी जेथे बसला असेल तेथे तो चांगली फळे देतो आणि त्या संबंधित घटना आपल्याकडून करवून घेतो.

जन्म स्थानाच्या वेळी शनी ज्या राशीत असतो त्या राशीपासून ३ ऱ्या, ७ व्या आणि १० व्या स्थानावर आपली दृष्टी टाकतो. ह्या शनी च्या तिन्ही दृष्ट्या चांगल्या मानल्या गेलेल्या नाहीत. त्या त्या स्थानापासूनच्या विषयी व्यक्ती थोडा हैराण असतो आपल्या जीवनात. किंवा त्या स्थानातील चांगल्या परिणामांसाठी व्यक्ती सतत मेहनत करीत असतो. हे कोणत्या कोणत्या स्थानावर त्याची दृष्टी पडली आहे ह्यावर अवलंबून असते.

मात्र शनी जेव्हा एखाद्या स्थानावर मर्यादित कालावधीत गोचरीने भ्रमण करतो तेव्हा त्याची दृष्टी ज्या ज्या स्थानावर येत असते तेथून तो त्या व्यक्तीला उजेडात आणतो त्या स्थानाच्या ऍक्टिव्हिटी मध्ये त्या २.५ वर्षाच्या कालावधीत तो त्या त्या गोष्टी त्याच्याकडून करवून घेतो. आणि तो जेथे बसलेला असतो त्या विषयी चे विषय सुद्धा व्यक्तीला त्याच्या प्रगतीसाठी मदत करतात.

मीन राशी आणि मीन लग्न कुंडली साठी शनी बाराव्या स्थानातून आपल्या कुटुंब स्थानाला पाहत आहे. जिथे १ नंबर लिहिले आहे. तेथे मंगळाची मेष राशी येते आणि सध्या तेथे ३०/१०/२०२३ पर्यंत राहू सुद्धा आहे. हा प्रकार आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या धन मिळविण्याच्या बाबतीत आपल्याला रोल मध्ये आणेल हे नक्की. आपल्यावर कुटुंबाची जबाबदारी आल्यामुळे कुटुंबासाठी वेळ न देणे किंवा कुटुंबापासून लांब राहणे होऊ शकेल. काही जणांच्या कुटुंबामध्ये आधीपासूनच काही वाद असतील तर त्यास विच्छेद सुद्धा आणू शकतो.

कुटुंबात येणारा पैसा खर्च करताना मात्र सावधानता बाळगावी. इथे कुणालाही पैसा देताना १० वेळा विचार करावा पुन्हा येणे नव्हे.
कुटुंबासाठी काही फिक्स डिपॉझिट तोडण्याचा ऑक्टोबर २०२३ पर्यंत कालावधी नाकारता येत नाही
आपले म्हणणे कुटुंबातील इतर व्यक्तींना समजविण्याचा थोडा त्रास होईल. जास्त भानगडीत पडू नये हा सल्ला.
इथून राहू ऑक्टोबर नंतर निघाल्यावर काही परिस्तिथी सुधारेल तोपर्यंत सावधान.
आरोग्याच्या बाबतील तोंड आणि तोंडातील अवयवांवर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. उजवा डोळा उजवा कान विशेष काळजी घ्यावी.
पैसा जपून इन्व्हेस्ट करावा हा सल्ला.

शनी ची सातवी दृष्टी

हि जिथे ५ सिंह राशी आहे तिथे येत आहे. रोगस्थानावर शनी ची दृष्टी आपल्या शरीराकडे विशेष लक्ष देण्याची हि वेळ आहे योग्य व्यायाम चांगले खाणे पिणे ह्या नियमाने जास्त त्रास होणार नाही. हे स्थान आपल्या सर्विसेस आणि जॉब चे सुद्धा आहे. त्यात विशेष मेहनत घ्यावी लागेल. तेथील एखादी जबाबदारी आपल्यावर येऊ शकेल हे नक्की.

ह्या शनीच्या भ्रमणात २०२३ आणि २०२४ मधील १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर आपल्या सर्व्हिसेस किंवा आपली हेल्थ ह्यावर काही मोठ्या घटना आपल्याला त्रास देऊ शकतील. सावधान राहावे मोठे निर्णय नकोत. कारण ह्याच दरम्यान सूर्य सिंह राशीत येतो आणि तो ह्यावेळी शनीच्या अष्टमात असेल.

शनी ची १० वी दृष्टी

हि आपल्या पत्रिकेत भाग्य स्थानावर असेल जिथे ८ नंबर ची वृश्चिक राशी आहे आणि ती सुद्धा मंगळाची आहे.
अचानक बदल होण्याचा हा कालावधी असू शकेल. भाग्योदयासाठी आपल्याला निर्णय घ्यावा लागेल. आपल्याला हि दृष्टी जन्मस्थानापासून दूर जाऊन उत्तम परिणाम देईल किंवा ज्या व्यक्ती विदेशाशी संबंधित कामे करीत आहेत किंवा विषेश यात्रा करण्याचे नियोजन केले आहे अशाना हि दृष्टी चांगले परिणाम देईल. नवीन घर गाडी घेण्याचे किंवा नवीन ऑफिस फॅक्टरी करण्याचे योग नाकारता येत नाहीत. त्यामुळे शनीची हि दृष्टी आपणास चांगलीच फळे देत आहे काळजी नाही. फक्त इथे वडिलांसाठी हि दृष्टी त्याच्या तब्येतीसाठी किंवा इतर विषयासाठी चांगली नाही. जर आपण एका छताखाली राहत असाल तर नाहीतर काळजी नको.

गुरु वृषभ राशी १/५/२०२४ ते १४/५/२०२५ पर्यंत असेल. — मीन लग्न किंवा राशी कुंडलीत तिसऱ्या स्थानी असताना वरील १० व्या दृष्टीचे विवेचन हे सुखकारक होईल कारण गुरु ची ७ वी दृष्टी आपल्या भाग्य स्थानावर येत आहे ह्याच कालावधीत. घटना नक्की चांगल्या घडतील अशी अशा आहे. ह्यात कुणाचा विवाह अडकला असेल कुणाचे प्रमोशन पेंडिंग असेल किंवा डेव्हलोपमेंट च्या ज्या ज्या गोष्टी आतापर्यंत झाल्या नसतील त्या नक्की होतील नव्हे होणारच. तेव्हा त्याची तयारी आतापासून सुरु करावी.

गुरु २२/४/२०२३ पर्यंत मीन राशीत.– मीन लग्न किंवा राशी कुंडलीत प्रथम स्थानी. ह्या कालावधीत जरा जपून राहावे कारण आपल्या राशीचा मालक मीन राशीतच आहे आपले नाव खराब होणार नाही मात्र त्याच्या मागे शनी आणि पुढे मेष राशीत १ नंबर मध्ये राहू सुद्धा भ्रमण करीत असल्यामुळे गुरु जो तुमच्या राशीचा मालक आहे तो पापकर्तरी योगात फसला आहे. मोठे मोठे निर्णय नको सध्या.
ज्या व्यक्ती मीन राशीच्या राजकारणाशी संबंधित असतील त्यांना ह्या कालावधीत आपल्या चारीत्राकडे कोणी बोट दाखविणार नाही ह्याची काळजी घ्यावी. किंवा आपल्यावर कोणी आरोप करणार नाही ह्याची काळजी नक्की घ्यावी.
हाच कालावधी विद्यार्थ्यांसाठी उत्तम नाही जास्त प्रयत्न करावा लागेल. पण नवीन काही तरी बदल ह्याच कालावधीत विद्यार्थ्यांना दिसतील.

शनी कुंभ राशी प्रवेश नक्षत्र कालगणना

वरील लिंक वर जर आपण शनी च्या प्रत्येक नक्षत्राचा कालावधी पाहिलात तर त्यात ज्या ज्या वेळी शनी वक्री असेल त्या त्या वेळी आपल्याला वर दिलेली फळे हि अचानक आपल्या समोर असतील. ती चांगली किंवा वाईट हे आपल्या जन्माच्या शनीच्या अवस्थेवर अवलंबून आहे. साधारण गणित करायचे झाल्यास एव्हढेच आपण पाहू शकता जर आपल्या पत्रिकेत शनी वक्री असेल आणि इथे भ्रमण काळातील शनी वक्री असताना तो आपल्याला चांगली फळे नक्कीच देतील.

वरील लिंक मध्ये दिलेल्या नक्षत्र भ्रमणाचे परिणाम आपल्या जीवनावर काय होतील ह्यासाठी आपण नक्कीच एखाद्या तज्ज्ञ ज्योतिषाकडून सल्ला घ्या हि विनंती. कारण इथे प्रत्येक नक्षत्राबद्दलचे विवेचन सर्वांसाठी सारखे नसेल.

धन्यवाद…..!
श्री दत्तगुरु ज्योतिष
९८२१८१७७६८

Leave a Reply