You are currently viewing अश्विन शुद्ध नवरात्री उत्सव- उपवास पद्धती

अश्विन शुद्ध नवरात्री उत्सव– उपवास पद्धती

  • सगळ्यात पहिला कडक उपवास- ह्यात पूर्ण नवरात्री फक्त पाणी किंवा नारळ पाणी घेऊन काही जण उपवास करतात.
  • नंतर त्या खालोखाल- नवरात्रीत ९ दिवसाचे उपवास करत असाल तर ह्यात फळे आणि दूध/पाणी घेऊन उपवास करू शकता कोणतेही शिवजलेले पदार्थ खाऊ नयेत.
  • नंतर त्या खालोखाल- ज्यांना उपवास ९ दिवस जमत नसतो त्यांनी नवरात्री उठता बसता असा उपवास केला तरी चालतो अशी पद्धती आहे — ह्यात पहिल्या दिवशी आणि अष्टमी च्या दिवशी उपवास करतात आणि तो उपवास नवमी ला सोडतात.
  • ह्यात काही जण फक्त अष्टमीचा उपवास सुद्धा धरतात आणि तो दुसऱ्या दिवशी नवमीला सोडतात.
  • नंतर त्याखालोखाल- काही जण ९ च्या ९ दिवस एक वेळ जेवण करतात — रोज उपवास.

कोणतीही एक पद्धती तुम्ही सुद्धा अवलंबू शकता जर शक्य असेल तर आपली तब्येत कशी आहे ह्यावर निर्णय घ्यावा आणि तसे उपवास करावेत. सध्या महामारीच्या पर्वात उगाच नंतर त्रास होईल असे निर्णय घेऊ नयेत. आपली प्रतिकार शक्ती पाहून उपवास करावा. तो करतो म्हणून मी करेन, मलाही जमेल असे करून नये. चांगले चांगले सात्विक पदार्थ खाऊन सुद्धा तुम्ही देवी ची उपासना करू शकता. त्यासाठी पुढील लेखात स्तोत्र उपासना ह्यावर लिहेन.

तरुणांना ह्या उपवासाबद्दल खूप आदर आहे असे असले तरी ह्या उपवासाबद्दल खूप अलर्ट राहा. कारण ह्यात केलेल्या चुका ह्या पुढे त्रासदायक ठरू शकतील. त्यापेक्षा उपवास न केलेला बरा.

ह्यात पूर्ण ब्रम्हचर्य पाळावे लागते.
शब्द जपून वापरावे लागतात.
कोणाशी खोटे बोलणे चुगली करणे अजिबात चालत नाही.
खाण्या पिण्यात अति सात्विक राहावे लागते.
कुठेही मौज मजा करण्यासाठी शक्यतो जाता येत नाही. (हल्ली गरबा हे मौजमजेचा खेळ झाला आहे. खरे पाहता देवीसाठी केलेले जागरण आणि त्यातील काही नृत्यभाग ह्याशिवाय गरबा खेळू नये. हे खास उपवास असणाऱ्यांनी लक्षात घ्यावे) बाकीच्यांना चालेल कारण काहीतरी ते त्यात आपली वेगळी कला सादर करत असतील कदाचित.

सतत दुर्गा, जगदंबेच्या छत्र खाली आहोत असा भास होत राहतो त्यामुळे ह्या उपवासात नामस्मरण अति महत्वाचे असेल. पुरुष असाल तर स्त्रियांचा मान, लहान मुलींचा मान ठेवावा आणि स्त्री असाल तर मनाने आणि शरीराने अति शुद्ध असावे लागेल.

घट ठेवल्यानंतर स्त्रियांना मासिक धर्मात उपवास असेल तर उपवास सुरु ठेवावेत आरती आणि देवी ची इतर सेवा घरातील व्यक्तींकडून करून घ्यावी. ह्यात ५ दिवसांचे पालन करावे.

थोडे शास्त्रोक्त पद्धतीने जमेल तसे उपवास करावेत पण त्यात एखादी चूक झाल्यास लगेच देवीकडे क्षमायाचना करावी.
आणि महत्वाचे असे कि चुका होणारच नाहीत ह्याकडे लक्ष द्यावे.

धन्यवाद…..!

Leave a Reply