Table of Contents
मेष राशी / लग्न : राहू परिवर्तन ३० ऑक्टोबर २०२३ ते १८ मे २०२५
राहू चे १८ महिन्याचे मीन राशीतून जे भ्रमण होत आहे त्याचे टाइम टेबल वरील लिंक मध्ये वाचून घ्या.
मेष राशी आणि लग्न साठी हे मीन राशीतून होणारे भ्रमण पुढे देत आहे.
जर आपली राशी मेष असेल किंवा आपली राशी दुसरी कोणतीही असेल पण जर आपले लग्न मेष असेल तर खाली दिलेले विवेचन हे आपल्यासाठी आहे.
वर दिलेली कुंडली इमेज हि मेष राशी किंवा मेष लग्नाची आहे. जर आपली मेष राशी नसली तरी जर मेष लग्न असेल तर आपली लग्न कुंडली हि अशी असू शकेल.
नोट — मी इथे चांगले आणि वाईट दोन्ही बाजू मांडेन. आपल्याला राशी कुंडली आणि लग्न कुंडली दोन्ही चेक करावी लागेल. ह्यासाठी आपली राशी कोणती आणि आपले लग्न कोणते हे आपणास माहित हवे. जर राशी कुंडलीत आणि लग्न कुंडलीत एखादा विषय हा दोन्ही ठिकाणी चांगला असेल तर ती गोष्ट पॉसिटीव्ह समजावी आणि दोन्ही ठिकाणी वाईट असेल तर काळजी घ्यावी लागेल. तरी सुद्धा आपल्या मूळ कुंडलीत राहू जिथे जन्माच्या वेळी आहे ते पाहूनच फायनल डिसिजन घ्यावे हि विनंती. जे विषय इथे मांडण्यात येतील त्या घटना घडण्यासाठी आपली परिस्थिती आणि आपले वय त्यास सूट होत असतील तरच त्या घडतील नाहीतर घडणार नाही.
नोट — २५/३/२००५ ते १२/१०/२००५ ह्या कालावधीत राहु १८ वर्षापूर्वी मीन राशीतून भ्रमण करत होता त्यावेळी शनी कर्क राशीतून भ्रमण करत होता — राहू ची ७ वि दृष्टी ज्या स्थानावर येत होती तिथेच शनी आपली ३ री दृष्टी टाकत होता. आणि ते स्थान ६ वे स्थान होते जिथे शनी आणि राहू दोघे एकदम पाहत होते त्या स्थानाला. २५/३/२००५ पासून च्या १८ महिन्याच्या कालावधीत मेष राशी आणि मेष लग्नाला ६ व्या स्थानावरून नोकरी – आजार – स्पर्धा – कर्ज – शत्रू ह्यातील एक तरी विषय खूप चांगला किंवा खूप वाईट गेलाच असेल आठवून पहा. आणि शक्य झाले तर कॉमेंट करा.
आता पुढे …….चांगले चांगले काय होईल ते पाहू
दिनांक ३० ऑक्टोबर २०२३ ते १८ मे २०२५ पर्यंत राहू मीन राशीत आहे आणि आपल्या मेष राशी कुंडलीत किंवा मेष लग्न कुंडलीत मीन राशी हि कुंडलीच्या १२व्या (व्यय स्थानी येत आहे) हे स्थान लॉसेस चे, परदेश गमन चे, गुंतवणुकीचे आहे. ह्यात जेव्हा १८ महिन्यासाठी राहू येत आहे तेव्हा हे विषय आपल्या समोर असू शकतील. ज्यांचे परदेश गमनाची काही कामे पेंडिंग असतील त्यांना हा विषय सुटू शकेल.
मेष राशी किंवा मेष लग्नाच्या व्यक्तींना ह्या कालावधीत गुंतवणूक करण्याच्या अनेक संधी प्राप्त होतील त्यात ते अति अग्रेसिव्ह असतील. मात्र सांभाळून कारण राहू ज्या स्थानात येतो त्या स्थानाच्या विषयाबद्दल जास्त अटॅचमेंट देतो.
राहूची ४ थ्या स्थानावर ५ वि दृष्टी
राहू वरील दिलेल्या कालावधीत मीन राशीत असताना कुंडली इमेज मध्ये दाखविल्याप्रमाणे तिथून तो चौथ्या स्थानाला पाहणार आहे. म्हणजे जिथे ४ नंबर लिहिले आहे. म्हणजे हे स्थान आता आपले ऍक्टिव्हेट राहू करणार. चांगले असे होईल कि ह्या स्थानाबद्दलचे जे जे विषय असतील जे आधी पेंडिंग होते ते सर्व सुटतील. जसे ह्या स्थानाचे विषय — घरातील वातावरण , मातृ सुख, जन्म स्थान, सर्व पर्सनल सुखे , प्रॉपर्टीज, वाहन. हे विषय आपल्यासमोर नक्की येतील. आणि त्यास काही इशू असतील तर हिरहिरीने सोडवाल सुद्धा.
राहु ची ६ व्या स्थानवार दृस्टि
कुंडली इमेज मध्ये पहा राहु १२ व्या स्थानातून ६ व्या स्थानवार आपली ७ वि दृस्टि देत आहे ज्या स्थानावरून पत्रिकेत आपले जॉब,कर्ज,आरोग्य बाबतीतले रोग, स्पर्धा, मामा पाहतात. ह्यापैकी एकतरी विषय आपल्या आयुष्यात ह्या १८ महिन्यात होणार हे नक्की. ज्यांना आधीच जॉब स्विच करायचा असेल आणि नवीन ठिकाणी प्रयत्न करायचा असेल तर हा कालावधी उत्तम आहे. आपल्या जन्मस्थानापासूनच्या जास्तीत जास्त लांब असलेल्या संस्थेत किंवा बाहेरील कंपन्यांमध्ये प्रयत्न करायला हरकत नाही. येथे आजारपणाचा असा विषय आहे कि आधीपासून जर कोणत्या आजारपणाने आपण त्रस्त असाल तर त्यावर चांगले उपाय कराल. कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा हा कालावधी चांगला असेल.
राहू ची ८ व्या स्थानावर ९ वी दृष्टी
कुंडली इमेज मध्ये राहू जिथे आहे तिथून तो पत्रिकेतील अष्टम स्थानावर दृष्टी टाकत आहे. मेष राशी किंवा मेष लग्नाच्या व्यक्तींसाठी पुढील १८ महिने हे ह्या स्थानावरील घटनांचा जास्तीत जास्त परिणाम दिसू शकतो ह्याचे कारण कि ह्या स्थानावर शनी सुद्धा अकराव्या लाभ स्थानातून अष्टम स्थानावर १० वी दृष्टी देत आहे. दोन दोन पाप ग्रह जर एकाच स्थानावर ठराविक कालावधीसाठी ऍक्टिव्ह असतील तर त्याचे परिणाम हे बोल्ड दिसून येतात.
पत्रिकेत अष्टम स्थानावरून अपघात, वारसा हक्क, अचानक धनलाभ, कष्ट, मृत्युदायक यातना, गुप्त गोष्टी पहिल्या जातात.
मागील २०२२-२३ ऑक्टोबर पर्यंत जे जे विषय आपण आपल्याबद्दल कुणाला कळायला दिलेले नसतील ते सर्व विषय हे समाजासमोर येणारच तेव्हा सावधान जर त्या पासून आपणास कष्ट होत असतील तर. दुसरे असे अचानक होणारे अपघात हे सुद्धा विषय किंवा अचानक समोर येणारे विषय ज्याचा तुम्ही आधी कधीच प्लान केला नसेल. हे विषय चांगले सुद्धा असू शकतील. अचानक धनलाभाच्या बाबतीत म्हणायचे झाले तर आपल्याला वारसा हक्काने काही पेंडिंग असेल तर ते तुम्ही स्वतःहून प्रयत्न करून मिळवाल पण त्यात थोडी कटिंग होईल. एखादे मागील आजारावरील कुणाचे ऑपरेशन असेल तर ते सुद्धा तुम्ही प्रयत्न करून कराल.
वरील सर्व गोष्टी ह्या किती चांगल्या किंवा किती वाईट हे आपल्या पत्रिकेत जिथे राहू आणि जिथे शनी लिहिले असतील त्यावरून त्याचे मोजमाप समजेल.
वरील सर्व बॅलन्स करण्यासाठी उपाय — आपण मेष राशीचे आहात तेव्हा कोणत्याही राहू पीडे साठी प्रथम गणेश उपासना मंगळवारी करणे, आणि त्या बरोबर हनुमान चालीसा किंवा हनुमंताची कोणत्याही प्रकारे पूजा अर्चना करणे हे फार महत्वाचे आहे. आणि त्याबरोबर शिव उपासना सुद्धा करणे महत्वाचे असेल रोज किंवा सोमवारी शिव मंदिरात जाऊनच.
एक लक्षात घ्या कि राहू मेष राशी आणि मेष लग्नाच्या व्यक्तींच्या पत्रिकेत कितीही चांगला असला तरी तो खूप काही चांगले देताना कंजुषी करतो आणि वाईट देताना लगेच देतो म्हणून जेव्हा जेव्हा राहू बदल होतो त्या आधि एक महिना आणि त्या नंतर एक महिना मोठे निर्णय नको .
जर एकदम आपल्या स्वतःच्या जन्मपत्रिकेवरून ह्या राहूचे १८ महिन्याचे फळ जाणून घ्यायचे असेल तर निष्णात ज्योतिषांची मदत जरूर घ्या.
धन्यवाद।
श्री दत्तगुरु ज्योतिष
९८२१८१७७६८
७५०६७३७५१९
Tumcha pratek upay ha yogya asto. Mala swata la tya cha changla anubhav aahe .